Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 26 जानेवारी 2026

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 26 जानेवारी 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 26 जानेवारी 2026; वार : सोमवार
  • भारतीय सौर : 06 माघ शके 1947; तिथि : अष्टमी 21:18; नक्षत्र : अश्विनी 12:32
  • योग : साध्य, शुभ 09:11, 30:19; करण : विष्टी 10:16
  • सूर्य : मकर; चंद्र : मेष;  सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:26
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

दुर्गाष्टमी

भारतीय प्रजासत्ताक दिन

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. मात्र, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.‍ वाचन आणि लेखनात आजचा वेळ घालवा. आरोग्य चांगले असेल. व्यवसायाची परिस्थिती भक्कम असेल. संततीची प्रगती आनंद देईल.

वृषभ – वृषभ राशीच्या जातकांनी आज सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रतिकूल परिस्थिती उद्भवत असून त्यात घरगुती कलह देखील समाविष्ट आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. प्रियजनांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे तुम्हाला काही प्रयत्नांमध्ये यश मिळू शकेल. उत्पन्न आणि खर्च यांत संतुलन राखा.

मिथुन – मिथुन राशीच्या जातकांना आज त्यांच्या कामात प्रगती बघायला मिळेल. एखाद्या निर्णयासाठी केलेले धाडस फलदायी ठरेल. कारकिर्दीत प्रगती कराल. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक संबंध अनुकूल असतील. कुटुंबात एखाद्या नव्या सदस्याचे आगमन होण्याची शक्यता आहे. जमीन, इमारती किंवा वाहन खरेदीचा योग आहे.

कर्क – कर्क राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्यात सुधारणा जाणवेल. तूर्तास गुंतवणुकीची जोखीम घेऊ नका. व्यावसायिकांना आज चांगला वेळ मिळेल. आज जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवा. काही जातकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे.

सिंह – सिंह राशीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. मातुल बाजूकडून पाठिंबा मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या प्रगती साधता येईल. नशीब तुमच्या बाजूने असेल, फक्त लक्ष्य केंद्रीत रहा. कोणत्याही प्रलंबित कामात यश मिळू शकते. चैनीच्या वस्तू खरेदी करणे टाळा.

कन्या – कन्या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. जास्त खर्च मानसिक त्रास देऊ शकतो. अज्ञात भीतीची भावना डोकं वर काढेल. दिवस शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो. आरोग्य सांभाळा, पथ्यपाणी पाळा. ध्यानधारणा आणि योगसाधना करा. व्यवसायाची प्रगती उत्तम असेल.

तुळ – आज तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. काही जातकांना एखादी  चांगली बातमी मिळू शकते. प्रवास फायदेशीर ठरेल. आरोग्यात सुधारणा होईल. तुम्हाला राजकीय लाभ आणि सरकारकडून एखाद्या योजनेसाठी पाठिंबा मिळू शकेल. आज खर्च करण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या जातकांना आज सरकारी यंत्रणेकडून फायदा होईल. वरिष्ठांच्या सहकार्याने एखाद्या मोठ्या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक यशाची शक्यता आहे. मात्र आज आरोग्याकडे लक्ष द्या. जंक फूड आणि बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. आज अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुलाचं परदेशी शिक्षण अन् मातृत्वाची परीक्षा!

धनु – आज नशिबाची मोठी साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरेल. पालकांकडून पाठिंबा मिळेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची  भेट होऊ शकते. आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक आरोग्य यात सुधारणा होईल.

मकर – मकर राशीच्या जातकांच्या मानसिक आरोग्यात आज चढ-उतार होऊ शकतात. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन कराल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याची देखील शक्यता आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक परिस्थिती चांगली राहील.

कुंभ – कुंभ राशीसाठी, आजचा दिवस आर्थिक समृद्धी घेऊन येईल. आज जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात यश मिळेल. प्रियजनांकडून तुम्हाला मोठा पाठिंबा मिळेल. वडीलधाऱ्यांचे देखील आशीर्वाद मिळतील. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मीन – मीन राशीच्या जातकांना आज कोर्टाशी संबंधित कामात यश मिळू शकेल. भावंडांना आर्थिक मदत करावी लागू शकते. मात्र, त्याचबरोबर बचतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा एक शुभ काळ आहे.


दिनविशेष

लोकनायक बापूजी अणे

टीम अवांतर

शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, आधुनिक संस्कृत कवी आणि लोकनायक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. माधव श्रीहरी ऊर्फ बापूजी अणे यांचा जन्म 29 ऑगस्ट 1880 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपूर येथील मॉरिस कॉलेजमध्ये असताना त्यांचा संपर्क लोकमान्य टिळकांशी आला. कॉलेजमध्ये झालेल्या लोकमान्य टिळकांच्या व्याख्यानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. लोकमान्य टिळकांची राजकारणाची परंपरा बापूजींनी चालवलीच, पण त्यांची वेद, पुराण आणि वाङ्मयाच्या अध्ययन-संशोधनाचीही परंपरा त्यांनी पुढे नेली. त्यांनी सरकारी नोकरी न करता अध्यापन करावयाचे ठरविले.

हेही वाचा – लग्नाची बोलणी सुरू झाली, तेवढ्यात आरू म्हणाली…

शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास साधला जावा तसेच, शिक्षण हे देवसेवा आणि देशसेवा यांची जाण निर्माण करण्यास पोषक असावे, असे त्यांचे मत होते. तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी या उदात्त हेतूने त्यांनी यवतमाळ येथे 1928 मध्ये ‘न्यू इंग्लिश हायस्कूल’ ची स्थापना केली. आज त्याचेच नाव ‘लोकनायक बापूजी अणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय’ ठेवण्यात आले आहे.

याशिवाय, यवतमाळ येथील दत्तचौक येथे असलेले स्वतःचे राहते घर शैक्षणिक कार्यासाठी बापूजी अणे यांनी उपलब्ध करून दिले. या ठिकाणी आज लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय सुरू आहे. बापूजी अणे यांनी मराठी तसेच संस्कृत साहित्य क्षेत्रातही मौलिक कार्य केले आहे. ‘गणपती देवता’, प्राचीन संस्कृती विषयक लेख, लोकमान्य टिळक यांच्यावर संस्कृतमध्ये लिहिलेला ‘श्रीतिलकयशोर्णव’ हा 85 तरंगातील सुमारे 12 हजार श्लोकांचा विशाल ग्रंथ म्हणजे महाकाव्यच म्हणावे लागेल. अशा या प्रतिभावान व्यक्तीचे 26 जानेवारी 1968 रोजी निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!