Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 25 जानेवारी 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 25 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 25, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 25 जानेवारी 2026; वार : रविवार
    • भारतीय सौर : 05 माघ शके 1947; तिथि : सप्तमी 23:10; नक्षत्र : रेवती 13:35
    • योग : सिद्ध 11:45; करण : गरज 11:57
    • सूर्य : मकर; चंद्र : मीन 13:35; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:26
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    रथसप्तमी / भानुसप्तमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660

    हेही वाचा – सारं काही मराठीसाठी!


    दिनविशेष

    ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक म.द. हातकणंगलेकर

    टीम अवांतर

    मराठी साहित्य क्षेत्रात समीक्षेचा मानदंड म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1927 रोजी कोल्हापूर येथील हातकणंगले या गावी झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मामाकडे सांगलीत आले आणि सांगलीकर होऊन गेले. 1944 साली ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. नंतर 1946 साली त्यांनी विलिंग्डन कॉलेजात असताना इंटर आर्ट्सच्या परीक्षेत तर्कशास्त्र या विषयासाठीचे प्रसिद्ध असे सेल्बी पारितोषिक मिळविले. नंतर 1948 मध्ये बी.ए परीक्षेत इंग्रजी विषयासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाचे एलिस पारितोषिक मिळाले. 1950 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी आणि मराठी विषयांत एम.ए. पूर्ण केले.

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात त्यांनी अर्धव्याख्याता म्हणून अध्यापन कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे काही काळाने धारवाड येथे अ‍ॅग्रिकल्चरल महाविद्यालयात ते पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले. 1956मध्ये ते विलिंग्डनला परतले आणि 1986 रोजी ते प्राचार्य म्हणून तिथून निवृत्त झाले. मराठीतील अक्षरवाङ्मय इंग्रजीत अनुवादित करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले.

    हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…

    हातकणंगलेकर हे खरंतर इंग्रजीचे प्राध्यापक होते. पण त्यांचा मराठी साहित्याचा व्यासंग देखील खूप दांडगा होता. त्यातूनच त्यांनी ललित लेखनाला प्रारंभ केला आणि पुढे जाऊन ते समीक्षात्मक लेखन करू लागले. तत्कालीन सत्यकथा, समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत, वसंत, वीणा, महाद्वार अशा नियतकालिकांतून त्यांचे लेखन चांगलेच गाजले.

    त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत अनुवाद केले, याशिवाय गो. नी. दांडेकर यांची ‘माचीवरचा बुधा’ आणि व्यंकटेश माडगूळकर यांची ‘सती’ या कादंबर्‍यांचे इंग्रजीत अनुवाद केले.  ‘उघडझाप हे त्यांचे आत्मवृत्त वाचकप्रिय झाले. अशा या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समीक्षकाचे 25 जानेवारी 2015 रोजी निधन झाले.


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn