Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 24 जानेवारी 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 24 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 24, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 24 जानेवारी 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 04 माघ शके 1947; तिथि : षष्ठी 24:39; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 14:15
    • योग : शिव 14:01; करण : कौलव 13:15
    • सूर्य : मकर; चंद्र : मीन; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:25
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस तणावपूर्ण असेल. मात्र संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्याची योजना आखाल. कोणाच्याही सल्ल्याने फसून महत्त्वाची कामे पुढे ढकलू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. योग्य कामांवर तुमची ऊर्जा केंद्रित करा, ती वेळेवर पूर्ण होतील याची खात्री करा. प्रलंबित आर्थिक बाबी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

    वृषभ – नवीन वाहन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायातही चांगला नफा मिळेल. जुने कौटुंबिक वाद मिटतील असे दिसते. मुलांना दिलेले वचन पूर्ण करावे लागेल. वडिलांना बाहेर सहलीला घेऊन जाऊ शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित खटला तुम्ही जिंकण्याची शक्यता आहे.

    मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबातील कोणी सल्ला दिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यावर विचार करा. अनावश्यक धावपळ तुमचा ताण वाढवू शकते. तब्येतीची काळजी घ्या. काही घरगुती वस्तू खरेदी करू शकता. राजकीय पाऊल काळजीपूर्वक उचला.

    कर्क – गुंतवणुकीच्या बाबतीत आजचा दिवस चांगला असेल, परंतु ही गुंतवणूक काही अंशी जोखमीचीही असू शकते, म्हणून या योजनांचा शांतपणे अभ्यास करून निर्णय घ्या. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा, विचारपूर्वक भागीदारी करा. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकतील. आज नवीन घर किंवा दुकान खरेदी करण्याचा नियोजन करू शकता.

    सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. इतरांच्या बाबतीत अनावश्यक हस्तक्षेप करणे टाळा. घरी धार्मिक समारंभ आयोजित केला जाऊ शकतो. गमावलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीबद्दल थोडी चिंता असेल. अविवाहित जातकांचे विवाह ठरू शकतात. अनेक कामांमध्ये सकारात्मक परिणाम अपेक्षित असतील. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने प्रतिष्ठा वाढेल.

    कन्या – आजचा दिवस खर्चाचा असेल. आज डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याने तुमचे गुपित उघड केल्याने नाराजी निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावरचा कामाचा ताण वाढू शकतो. मुलांच्या वर्तनाकडे लक्ष द्या. जोडीदाराशी चांगले संबंध राहतील.

    तुळ – उत्पन्नाच्या बाबतीत आजचा दिवस फारसा चांगला नसेल. बाजारातील चढ-उतार आणि मंदी यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. नवीन घराचे काम सुरू होऊ शकते. प्रवास करताना एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. मालमत्तेचे वाटे हिस्से करताना वडिलांचा सल्ला घ्या. भावंडांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल.

    वृश्चिक – स्वतःच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. कोर्टाच्या प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगा, अनावश्यक वाद टाळा. कामाशी संबंधित नवीन प्रयत्न यशस्वी होतील. मात्र कामाच्या ठिकाणी तुमचे संभाषण मर्यादित ठेवा, महत्त्वाची माहिती शेअर करणे टाळा. सुखसोयी आणि सुविधा यांच्यात वाढ होईल.

    हेही वाचा – कोपिष्ट हत्तीचा माहूत ठरतो बळी

    धनु – आजचा दिवस आव्हानात्मक असेल. कामात वारंवार व्यत्यय येईल. वरिष्ठांबरोबर वाद झाल्यामुळे तुमची बढती रोखली जाऊ शकते. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. चांगली कामगिरी करण्यासाठी संतती मेहनत करत असल्याचे दिसेल. तुम्हाला धर्मादाय कार्यात रस निर्माण होईल. प्रवास फायदेशीर ठरतील.

    मकर – संकटांना तोंड देताना संयम ठेवा. व्यवसायात चांगला नफा होईल. तुम्हाला आवडत्या गोष्टीची भेट मिळू शकते. सरकारी योजनांचा फायदा होईल. प्रलंबित काम पूर्ण होईल. एखाद्या जुन्या मित्राची भेट आनंद देईल. राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, तब्येत सांभाळा.

    कुंभ – नोकरदार जातकांना नोकरीत काही समस्या येऊ शकतात. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध रहा. शेअर बाजारात हुशारीने गुंतवणूक करा. वडिलांनी दिलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण कराल. व्यवसायात चढ-उतार होतील. विद्यार्थ्यांचा मानसिक ताणतणावातून कमी होईल. स्नेह आणि सहकार्याची भावना प्रबळ राहील.

    मीन – आजचा दिवस आरोग्याच्या बाबतीत काळजी निर्माण करणारा असेल. विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. वाहन काळजीपूर्वक चालवा. महत्त्वाची माहिती शेअर करणे टाळा. व्यवसायातील बदल फायदेशीर ठरतील. पाहुण्यांमुळे घरात आनंददायी वातावरण निर्माण होईल. जीवनावश्यक वस्तूंवरील खर्च वाढेल.


    दिनविशेष

    प्रसिद्ध तत्वज्ञ मेघश्याम पुंडलीक रेगे

    टीम अवांतर

    प्रसिद्ध तत्वज्ञ, विचारवंत तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष तथा ‘मराठी विश्वकोशा’चे प्रमुख संपादक मेघश्याम पुंडलीक रेगे यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी कोकणातील आरोंदा (जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. तत्वज्ञानाबरोबरच तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र, नीतिशास्त्र, धर्म, भाषा-साहित्य आदी विषयांचाही त्यांनी सखोल, व्यापक, सर्वांगीण व्यासंग केला होता. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी ए. जे. एअर आणि प्रा. डमेट यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चिन्हांकित तर्कशास्त्र’ (सिम्बॉलिक लॉजिक) या ज्ञानशाखेचा विशेष अभ्यास केला.

    वाईतील प्राज्ञपाठशाळामंडळ आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशी रेगे यांचा घनिष्ठ संबंध होता. 1984मध्ये मुंबईतील कीर्ती महाविद्यालयामधून प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या पुढील कार्यासाठी वाई हे ठिकाण निवडले. तर्कतीर्थांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. तर्कतीर्थांनी ‘नवभारत’ मासिकाची जबाबदारी रेगे यांच्यावर सोपवली. तर्कतीर्थांनंतर रेगे हे प्राज्ञपाठशाळामंडळाचे अध्यक्ष, तसेच ‘धर्मकोश’ प्रकल्पाचे प्रमुख संपादक झाले. त्यांनी प्राज्ञपाठशाळामंडळातर्फे तर्कतीर्थांच्या नावे ‘सर्वधर्म अध्ययन केंद्र’ हा अभिनव प्रकल्प राबवून महाराष्ट्रभरातील विचारवंतांना व्याख्यानासाठी पाचारण केले.

    हेही वाचा – दहा पैशाला एक ‘सिंगल’!

    रेगे यांच्यावर 4 जून 1994 रोजी ‘मराठी विश्वकोशा’चीही जबाबदारी सोपविण्यात आली. ‘मराठी विश्वकोशा’च्या रचनेमागची प्रमुख प्रेरणा ही तर्कतीर्थांची होती. रेगे यांनी ‘विश्वकोशा’च्या 15व्या आणि 16व्या खंडांचे काम मार्गी लावले. यांतील पंधरावा खंड त्यांनी तर्कतीर्थांच्या नावे प्रकाशित केला. तसेच तर्कतीर्थांच्या संकल्पनेतील ‘मराठी कुमार विश्वकोशा’च्या प्रकल्पाचे नियोजन आणि परिचय खंड तयार करण्याचे मोलाचे कार्यही त्यांनी केले.

    रेगे हे बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि शिक्षक-प्रबोधनकार म्हणून प्रसिद्ध होते. ‘आकारिक तर्कशास्त्र’, ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’, ‘तत्वज्ञानातील समस्या’ (मूळ लेखक बर्ट्रंड रसेल), ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’, ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’, ‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’, ‘स्वातंत्र्य, समता आणि न्याय’ ही त्यांची मौलिक ग्रंथसंपदा. ‘प्रा. जी. डी. पारीख संशोधन केंद्र’ (मुंबई) व ‘भारतीय शिक्षण संस्था’ (‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’, पुणे) येथे संचालक म्हणून त्यांनी काम केले. शिवाय ‘न्यू क्वेस्ट’ या वैचारिक मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. रेगे यांना महाराष्ट्र फाऊंडेशन (न्यूयॉर्क) यांच्याकडून वैचारिक साहित्यासाठीचा पहिला पुरस्कार, मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कोकण साहित्यभूषण पुरस्कार इत्यादी मानसन्मान लाभले. सेन्सॉर बोर्ड, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांचे ते अनेक वर्षे सदस्य होते. 28 डिसेंबर 2000 रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn