Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 23 जानेवारी 2026

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 23 जानेवारी 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 23 जानेवारी 2026; वार : शुक्रवार
  • भारतीय सौर : 03 माघ शके 1947; तिथि : पंचमी 25:45; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 14:32
  • योग : परिघ 15:58; करण : बव 14:10
  • सूर्य : मकर; चंद्र : कुंभ 08:33; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:24
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वसंत पंचमी / श्री पंचमी

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. चांगला परतावा मिळविण्यासाठी पैसे हुशारीने गुंतवा. नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर करीअरमधील प्रगतीसाठी गरजेचे आहे. कलात्मक बुद्धिमत्तेचा नीट वापर केल्यास फायदेशीर ठरेल.​​ आरोग्याच्या काळजी घ्या, पथ्यपाणी सांभाळा. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.

वृषभ – वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्हीकडे आज यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. परदेशातील व्यापाराने जोडलेल्यांना आज मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करता येईल.

मिथुन – आज कोणतेही अडथळे तुमची प्रगती रोखू शकणार नाहीत. व्यावसायिक आव्हानांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या संपत्तीविषयक खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. कौटुंबिक जीवन चांगले राहील. दुसऱ्यांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल.

कर्क – आजचा दिवस आनंदाचा जाईल. कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक जीवन यात संतुलन राखणे आवश्यक आहे. तुमची आर्थिक बाजू आणि आरोग्य दोन्हीत सकारात्मक बदल होतील. महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या भरघोस नफा मिळेल. जुनी उधारीही वसूल होईल.

सिंह – आजचा दिवस अनेक सुखद आश्चर्ये घेऊन येईल. वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करा. सकारात्मक विचारसरणी आणि तुमच्या कौशल्यांवरचा विश्वास महत्त्वाचा असेल. आर्थिक परिस्थिती सुज्ञपणे हाताळा.

कन्या – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आव्हानांनी खचून जाऊ नका, तीच तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. सध्या कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीचा विचार करू नका. नातेसंबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे किंवा एखाद्याला गृहित धरणे, यामुळे संबंध बिघडतात, हे लक्षात ठेवा.

तुळ – मोठ्या बदलांसाठी तयार राहा, कारण अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत. नोकरदारांना आपले कौशल्य तुम्हाला दाखवता येईल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा.  मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत संपूर्ण माहिती कशी मिळेल यावर लक्ष केंद्रित करा.

हेही वाचा – तुझं माझ्याकडे लक्षच नसतं…

वृश्चिक – आज तुमची सर्व कामे आत्मविश्वासाने पूर्ण करा.  नव्या संकल्पना फलप्रद ठरतील.  वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी, समस्यांवर नाही तर उपायांवर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराशी याबाबत चर्चा करा. आज आरोग्य चांगले राहील. एखाद्या गरजूला मदत केली तर, लोक त्याची दखल घेतील.

धनु – आज तुम्हाला सावधगिरीने पावले उचलण्याची  गरज आहे. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. वैवाहिक नात्याशी संबंधित समस्या आज सोडवा. आज व्यवसाय आणि व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित करा. नव्या प्रकल्पांबाबत मौन बाळगा, अन्यथा अडचणी उद्भवू शकतील.

मकर – आज प्रत्येक संधीचा फायदा घ्या. व्यावसायिक जीवनातील ताणतणाव टाळा. योग आणि ध्यानधारणा करणे फायद्याचे ठरेल. कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम कामगिरी करत नवीन जबाबदाऱ्या पार पाडाल. पैसा जपून खर्च करा. एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका.

कुंभ – दिवसभर किरकोळ आरोग्य समस्यांनी त्रास होऊ शकतो. खर्च वाढू शकतो. तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधून समस्या कशा दूर करता येतील याचा विचार करा. ऑफिसचा ताण घेणे कमी करा.

मीन – वैयक्तिक आयुष्य आणि करिअरमध्ये आज अनपेक्षित संधी येऊ शकतात. जीवनात बदल महत्त्वाची भूमिका बजावतील. तुमची सर्जनशीलता नवीन मार्गांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. आज होणाऱ्या बदलांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी सकारात्मक राहा.

दिनविशेष

ख्यातनाम संगीतकार शंकरराव व्यास

टीम अवांतर

ख्यातनाम संगीतकार आणि  संगीतविषयक लेखक शंकरराव व्यास यांचा जन्म 23 जानेवारी 1898 रोजी कोल्हापूर येथे झाला. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या कोल्हापूरात झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमास शंकरराव गेले होते. ते विष्णूबुवांच्या गाण्याने इतके प्रभावित झाले की, वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांचे शिष्यत्व पत्करले.

शंकरराव मुंबईच्या गांधर्व महाविद्यालयात त्यांनी संगीताचे सर्वांगीण शिक्षण घेतले. तेथे शिकत असताना गायनाबरोबरच मँडोलिन आणि सतार या वाद्यवादनामध्येही त्यांनी प्रावीण्य मिळविले. विद्यालय व्यवस्थापनामधील त्यांचा यशस्वी सहभाग पाहून पलुस्कर यांनी शंकररावांवर लाहोर येथील गांधर्व महाविद्यालयाची जबाबदारी सोपवली. ती त्यांनी उत्तम तऱ्हेने पार पाडली.

हेही वाचा – तिचा पाडवा अन् त्याचा पाडवा…

पुढे शंकरराव 1922 च्या उत्तरार्धात अहमदाबाद येथे स्थायिक झाले आणि तेथे त्यांनी ‘गुजरात संगीत विद्यालयाची’ स्थापना केली. पलुस्कर यांचे 1931 साली निधन झाले. त्यानंतर त्यांच्या शिष्यमंडळींकडून स्थापन करण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळा’मध्ये व्ही. ए. कशाळकर, पंडित नारायणराव खरे, वि. ना. पटवर्धन आदी शिष्यांबरोबरच शंकरराव व्यास यांचाही पुढाकार होता. 1938 सालापासून सुमारे दहा वर्षे त्यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. 1937 मध्ये त्यांनी आणि त्यांचे बंधू गायक नारायणराव व्यास यांनी व्यास संगीत विद्यालयाची स्थापना केली.

भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रारंभीच्या संगीतकारांमध्ये शंकरराव व्यास यांची गणना होते. अहमदाबादमध्ये संगीतविषयक कार्य करीत असताना प्रख्यात चित्रकार कनू देसाई यांच्याशी त्यांची मैत्री झाली. त्यावेळ कनू देसाई मुंबईच्या ‘प्रकाश पिक्चर्स’मध्ये कलादिग्दर्शक होते. त्यांनी शंकररावांना चित्रपटांना संगीत देण्याची संधी दिली. प्रकाश पिक्चर्सच्या पहिल्या सामाजिक चित्रपटास व्यास यांनीच संगीत दिले. त्यानंतर त्यांनी 5 मराठी, 3 गुजराथी आणि 32 हिंदी चित्रपटांना संगीत दिले. यांच्या गायन, वादनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या. प्रसिद्ध ‘वैष्णव जन तो’ या भजनाची चाल शंकरराव यांचीच!

संगीत कला विहार या 1947 साली सुरू झालेल्या मासिकाचे पहिले संपादक शंकररावच होते. या प्राथमिक संगीत (भाग 1 व 2), माध्यमिक संगीत (भाग 1 व 2), संगीत व्यासकृती भाग 1 ते 4 ,ख्याल और तराणे भाग 1 व 2, सितारलहरी आदी ग्रंथांचे त्यांनी लेखन केले. 17 डिसेंबर 1956 रोजी शंकररावांचे अहमदाबाद येथे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!