दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 21 मार्च 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 30 फाल्गुन शके 1948; तिथि : तृतीया 23:56; नक्षत्र : अश्विनी 24:37;
- योग : ऐंद्र 19:01; करण : तैतिल 13:15;
- सूर्य : मीन; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:44; सूर्यास्त : 18:49;
- पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
गौरी तृतीया
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिन विशेष
श्रेष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते
टीम अवांतर
श्रेष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म 17 एप्रिल 1891 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील किन्हळ येथे झाला. बी. ए., एल्एल्. बी. झाल्यानंतर 1919 मध्ये डॉ. केतकर यांच्या ‘ज्ञानकोशमंडळा’त काम करण्यासाठी ते पुण्यात आले. त्यानंतर काही काळ याच मंडळाच्या विद्यासेवक या मासिकाचे ते संपादक होते. ज्ञानकोशमंडळातील काम सुरू असतानाच पुणे येथील सरस्वतीमंदिर या शिक्षणसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. 1928मध्ये ज्ञानकोशमंडळातून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्र कोशमंडळाची त्यांनी स्थापना केली.
डॉ. केतकरांसारख्या महापंडितांबरोबर अनेक वर्षे काम केल्यामुळे दाते यांना कोशरचनेच्या पद्धतशीर कामाचा अनुभव लाभला. त्याला त्यांनी अखंड परिश्रमाची जोड दिल्यामुळे आणि चिं. ग. कर्वे यांच्यासारखे समानशील जोडीदार लाभल्यामुळे दाते यांच्या हातून अनेक प्रकारचे कोश तयार होऊन मराठी भाषेचे हे दालन समृद्ध झाले.
हेही वाचा – Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…
मराठीतील बहुतेक शब्दांचा समावेश असल्यामुळे समाधानकारक ठरलेला दाते–कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश एकूण सात खंडांत प्रसिद्ध झाला. त्याचा पुरवणी खंडही प्रसिद्ध झाला. कर्वे यांच्या साहाय्याने तयार केलेला सुलभ विश्वकोश सहा भागांत प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (दोन खंड) आणि शास्त्रीय परिभाषा कोश ही याच द्वयीने निर्माण केलेली कोशसंपदा होय. दाते यांनी रा. त्र्यं. देशमुख यांच्या सहकार्याने, 1810 ते 1917 या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यातील लेखांची, तसेच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकारनामांची सूची महाराष्ट्रीय वाङ्मयसूचि (1919) या नावाने तयार केली.
चिं. ग. कर्वे यांच्या सहकार्याने डॉ. केतकरांचे सानिध्य हे केतकरांचे गुणदोषविवेचक अल्पचरित्रही त्यांनी लिहिले आहे. याखेरीज पिता–पुत्र संबंध हे एक सामाजिक स्वरूपाचे लेखन दाते यांनी केलेले आहे. आयुष्याच्या अखेरीस त्यांनी संक्षिप्त शब्दकोशाचे काम हाती घेतले होते, पण ते अपुरेच राहिले.
सोलापूर येथे 1941 साली भरलेल्या मुद्रकसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. भाषाशास्त्रातील विद्वत्तेमुळे भारतीय राज्यघटनेचे हिंदी आणि मराठी अनुवाद करण्यासाठी नेमलेल्या समित्यांचे सभासद म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष होते. 21 मार्च 1973 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत होतील. व्यावसायिकांनी आमिषाला बळी पडून नव्या सौद्यांच्या मागे पडू नये. ज्यांनी जोखीम उचलून आर्थिक गुंतवणूक केली असेल, त्यांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. गरोदर स्त्रियांनी चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या राशीच्या वृद्ध जातकांच्या आपल्या जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतील.
वृषभ – जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. त्यामुळे खचून जाऊ नका. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. कठीण काळात पत्नी पाठबळ देईल. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम करण्यावर भर द्या.
मिथुन – नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल. परंतु सहकारी तुमचा हा ताण कमी करण्यासाठी मदत करतील. व्यवसायात नवीन करार करताना सर्व कागदपत्रे तपासून घ्या. तसेच, भागीदारांनाही विश्वासात घ्या. उधळपट्टी करमी करून पैसा जपून वापरा. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस स्मरणीय होईल.
कर्क – नोकरी असा वा व्यवसाय तुम्हाला नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. यामुळे ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या तर, व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांच्या एक पाऊल पुढे राहता येईल. पण त्याचबरोबर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, थट्टा-मस्करीत केलेल्या एखाद्या वक्तव्यामुळे एखाद्याचे मन दुखावले जाऊ शकते. तब्येतीची काळजी घ्या. पथ्येपाणी सांभाळा.
सिंह – एखाद्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे तसेच समोरच्याला गृहित धरणे यामुळे संबंध बिघडतात, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. कुणाला तरी दिलेले उसने पैसे आज परत मिळू शकतात. मोबाइल बाजूला ठेवून कुटुंबीयांशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यानंतर मन प्रफुल्लीत होईल. वडिलधाऱ्या मंडळींकडून नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने चांगले मार्गदर्शन मिळू शकते.
कन्या – आज अनेक तणावांचा सामना करावा लागण्यीच शक्यता आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठ सहकाऱ्यांशी मतभेद झाल्यामुळे त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल. शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तथापि, मदत करण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. घरात आनंददायी वातावरण ठेवण्यात यश मिळेल.
तुळ – ध्यानधारणा आणि योगाचा फायदा होईल. आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचारपूर्वक खर्च करा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या, आवश्यक कागदपत्रेही सोबत ठेवा. नोतवाईक तसेच मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील.
वृश्चिक – उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होऊ शकतो, स्वत:वर विश्वास ठेवल्यास त्यात आपण सक्षम होऊ शकतो. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला वाटत असेल की, आपण जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. नोकरी-व्यवसायात अनुकूल स्थिती राहील.
धनु – आज गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा. तसेच, नव्या प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. आपल्या निकटच्या व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही.
हेही वाचा – पंखात बळ आणणारी पाठवणी!
मकर – बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आज पैसा तुमच्या हातात टिकणार नाही. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
कुंभ – आर्थिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे नव्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. तुमच्यातील कमतरता तुम्हालाच चांगल्या प्रकारे माहिती असल्याने त्या कमी करण्याची आवश्यकता आहे. नोकरी-व्यवसायात सर्वांना बरोबर घेऊ चालण्याकडे लक्ष द्या.
मीन – आज अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कार्यालयात काम करताना काही समस्या उद्भवतील, पण वास्तववादी राहा. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल.


