Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 17 जानेवारी 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 17 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 17 जानेवारी 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 27 पौष शके 1947; तिथि : चतुर्दशी 24:03; नक्षत्र : मूळ 08:11
    • योग : व्याघात 21:17; करण : विष्टी 11:15
    • सूर्य : मकर; चंद्र : धनु; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:21
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोकं शांत ठेवा. तुम्ही आपल्या गरजांवर बराच खर्च कराल. घराचे नूतनीकरण देखील सुरू करू शकता. कुटुंबातील सर्वजण एकजूटीने तुमच्या मागे उभे राहतील.

    वृषभ – नोकरीच्या ठिकाणी एखाद्या चांगल्या कामासाठी तुमचा सन्मान होईल. तथापि, बोलण्यावर आणि वागण्यावर संयम ठेवा. एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळेल. आवडती वस्तू हरवली असेल तर, ती आज सापडण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाला घेऊन जाण्याची योजना आखाल.

    मिथुन – निर्णय क्षमतेत मोठी सुधारणा होईल. स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने तुम्ही विरोधकांना सहज पराभूत करू शकाल. एखादा जुना आजार पुन्हा डोके वर काढू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. एखादे काम पूर्ण करताना आतापर्यंत आलेल्या समस्या दूर होतील. कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर त्यांना ते लवकरात लवकर परत करा.

    कर्क – आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारींनी त्रस्त असाल. त्यामुळे बाहेरचे खाणे टाळा आणि पोटाची विशेष काळजी घ्या. व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश कराल, ज्यामुळे चांगला नफा मिळेल. तुमचे कुटुंबही तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता.

    सिंह – आजचा दिवस खर्चाने भरलेला असेल. उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करणे उत्तम राहील, कारण यामुळे खर्चाचा ताळमेळ योग्य प्रकारे बसवता येईल. प्रगतीच्या मार्गावर योग्य दिशेने पुढे जाल. भूतकाळातील चुकांमधून तुम्हाला शिकावे लागेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून आज पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ताणातून आराम मिळेल.

    कन्या – एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची आज संधी मिळेल. कोणत्याही गोष्टीवरून अनावश्यक चिडणे टाळा. भावंडांनी कोणत्याही कामाबद्दल सल्ला दिला तर त्याचा नक्की विचार करा. सासरच्या एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतील. काही धार्मिक कार्यातही सहभागी होऊ शकता.

    तुळ – आज कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. मनात काही नवीन कल्पना येतील, ज्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल. एखादा विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतो. कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका. तुमची एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते. तुमच्या मुलांना शैक्षणिक आव्हानांचा सामना करावा लागत असेल तर, ते सोडवण्याचा प्रयत्न करा.

    हेही वाचा – दरवाजे… जन्मापासून मृत्यूपर्यंतचे…

    वृश्चिक – कामाच्या ठिकाणी नवीन समस्या उद्भवू शकतात. संपत्तीत वाढ झाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. जुना रखडलेला व्यवहार तुमच्यासाठी समस्या बनू शकतो. या समस्येमुळे व्यावसायिक कामात विलंब होऊ शकतो. त्यामुळे सावधानता बाळगा. मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवू शकता. तुम्ही समाजातील काही महत्त्वाच्या लोकांना भेटाल.

    धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी जबाबदारीने काम करण्याचा असेल. प्रलंबित कामे पूर्ण केल्यानंतर तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंददायी असेल. तुमचे मित्र तुमच्यासाठी गुंतवणुकीशी संबंधित योजना घेऊन येऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत ठीक नसेल तर आजपासून त्यात सुधारणा होईल.

    मकर – आज तुमचे उत्पन्न वाढेल, याआधी कोणाला पैसे उधारीवर दिले असतील तर ते परत मिळू शकतात. आज भागीदारीत काम करण्याची संधी देखील मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही इतरत्र अर्ज करू शकता. याबाबत इतरांशी बोलण्यापूर्वी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल.

    कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, परंतु तुमचे काम सुरळीतपणे पूर्ण होईल. मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचा विचार करू शकता. अविवाहित लोकांना अनुरूप जोडीदार भेटू शकतो. कामाच्या ठिकाणी राजकारणात सहभागी होण्याचे टाळावे, कारण याचा तुमच्या कामावर परिणाम होईल.

    मीन – तुम्हाला जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. अविवाहितांना त्यांच्या अनुरूप जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्यांना कठोर परिश्रम करत राहावे लागतील. काही चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळू शकेल आणि मित्रमंडळातही हीच भावना राहील. कोणतेही निर्णय घाईघाईने घेणे टाळा.


    दिनविशेष

    भारतीय गणितज्ञ दत्तात्रय कापरेकर

    टीम अवांतर

    दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म १७ जानेवारी १९०५ रोजी (तत्कालीन) ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ठाणे येथे झाले. त्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी दाखल झाले. १९२७मध्ये त्यांना स्वतंत्र संशोधनासाठी दिला जाणारा रँग्लर परांजपे गणित पुरस्कार मिळाला. १९२९मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची गणित विषयातील बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यानंतर कापरेकर देवळालीमध्ये शाळेत शिक्षकाचे काम करू लागले ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत. मात्र प्रगत गणिताचे औपचारिक शिक्षण नसूनही संख्येवरचे अलोट प्रेम आणि चिकाटी या गुणांमुळे त्यांनी आपले संशोधन एकट्याने सतत सुरू ठेवले.

    हेही वाचा – आराध्याचा संघर्षाचा निर्णय… सोबत आहे शिवा!

    कापरेकर यांचे बहुतेक संशोधन कार्य अंकशास्त्रात आहे. १९४९मध्ये त्यांनी ६१७४ या संख्येचा एक मनोरंजक गुणधर्म शोधून काढला. कुठल्याही चारआकडी संख्येने सुरुवात केली तरी जास्तीत जास्त सात टप्प्याxत आपण ६१७४ या उत्तरावर पोहोचतो. चारआकडी संख्येऐवजी तीनआकडी संख्या घेऊन हीच प्रक्रिया केल्यास शेवटी ४९५ ही संख्या मिळते. तरी ६१७४ हा चार आकडी संख्यांचा आणि ४९५ हा तीनआकडी संख्यांचा स्थिरांक आहे. या स्थिरांकांना ‘कापरेकर स्थिरांक’ म्हणतात. याशिवाय कापरेकरांनी ‘स्वयंभू’ (Self-generated) किंवा देवळाली संख्यांचाही शोध लावला.

    कापरेकरांचे बहुतेक संशोधन तुलनेत कमी प्रसिद्ध असलेल्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले अथवा त्यांनी ते खासगीरित्या प्रकाशित केले म्हणून लोकांना ते फारसे माहीत नव्हते. तथापि, मार्च १९७५ मध्ये मार्टीन गार्डनर यांनी सायंटीफीक अमेरिकन  या सुप्रसिद्ध मासिकामध्ये त्यांच्या गणिती खेळ या सदरात कापरेकरांच्या संशोधनावर लेख लिहिला आणि त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्या कार्याकडे वेधले गेले. ४ जुलै १९८६ रोजी या महान गणितज्ज्ञाचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn