Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 16 नोव्हेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 16 नोव्हेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 16, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 16 नोव्हेंबर 2025; वार : रविवार
    • भारतीय सौर : 25 कार्तिक शके 1947; तिथि : द्वादशी 28:47; नक्षत्र : हस्त 26:10
    • योग : प्रीति अहोरात्र; करण : कौलव 15:39
    • सूर्य : तुळ; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:45; सूर्यास्त : 18:00
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660

    हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!


    दिनविशेष

    विज्ञानवादी अभिनेता डॉ. श्रीराम लागू

    टीम अवांतर

    आपल्या समर्थ अभिनयाने रंगभूमी, सिनेमा ही माध्यमे गाजवणाऱ्या डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय आणि नंतर पुण्याच्या  बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयांमधून झाले. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्यावरील शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेऊन पुण्यात 5 वर्षे काम केले. नंतर उच्च शिक्षणासाठी ते कॅनडा आणि इंग्लंड येथे गेले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच श्रीराम लागू यांनी नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांवर लहानपणापासूनच मराठी नाटकांचा प्रभाव होता. त्यावेळचे नामवंत अभिनेते नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मामा पेंडसे आणि मास्टर दीनानाथ आदींच्या अभिनयाचा डॉक्टर लागूंवर प्रचंड प्रभाव होता. त्याच दरम्यान काही अभिनेत्यांकडूनही ते प्रेरित झाले होते. त्यामध्ये पॉल म्युनी, स्पेन्सर ट्रेसी , लॉरेन्स ऑलिव्हिएर, ग्रेटा गार्बो अशी अनेक कलावंतांची नावे घेता येतील. नाटक आणि अनेक रंगकर्मी सतत डॉक्टरांच्या डोक्यात फिरत होते. नंतर, भालबा केळकर यासारख्या समविचारी वरिष्ठ सहकाऱ्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्थेची सुरुवात केली. त्यामुळे 1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथील वैद्यकीय व्यवसाय आणि भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे तसेच रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील काम असा समांतर प्रवास सुरू होता. शेवटी 1969 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्यअभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी केलेली नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांची प्रमुख भूमिका प्रचंड गाजली. मराठी नाटकांव्यतिरिक्त मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकाही रसिकप्रिय ठरल्या. डॉ. लागू यांच्या गाजलेले मराठी चित्रपटांमधील 1972 सालचा पिंजरा, 1974मधील सामना,  तर 1980 मधील सिंहासन यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. सिंहासन, पिंजरा, मुक्ता यासारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला पुरस्काराच्या रुपाने दाद मिळाली. अनकही, अरविंद देसाई की अजीब दास्तान, इक दिन अचानक, कामचोर, घरोंदा, फूल खिले हैं गुलशन गुलशन, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, सरगम, सौतन, इन्कार, दो और दो पाँच यासारख्या हिंदी चित्रपटांमधून ते भारतभर लोकप्रिय झाले. डॉक्टर लागूंना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत 2006 मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, 1997 मध्ये कालिदास पुरस्कार, 2007 मध्ये पुण्यभूषण पुरस्कार, 2010 मध्ये संगीत नाटक अकादमीचा फेलोशिप सन्मान आणि 2013 मध्ये लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. याशिवाय, त्यांचे ‘लमाण’ हे आत्मचरित्रदेखील तितकेच वाचनीय आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असल्याने डॉ. लागू नास्तिक, तर्कसंगत विचारांना मानणारे विज्ञानवादी आणि समाजवादी होते. ते महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलेले होते. ‘देवाला रिटायर करा’ अशी जाहीर भूमिका घेत तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी सतत आवाज उठवला. 17 डिसेंबर 2019 रोजी त्यांचे निधन झाले.

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : नियमित योगाभ्यास

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn