Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 12 नोव्हेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 12 नोव्हेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 12, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 12 नोव्हेंबर 2025; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 21 कार्तिक शके 1947; तिथि : अष्टमी 22:57; नक्षत्र : आश्लेषा 18:34
    • योग : शुक्ल 08:01; करण : बालव 10:56
    • सूर्य : तुळ; चंद्र : कर्क 18:34; सूर्योदय : 06:42; सूर्यास्त : 18:01
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    कालाष्टमी

    कालभैरव जयंती

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – द्वेष भावनेऐवजी मैत्रीपूर्ण संबंधांवर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा पालकांची नाराजी ओढावून घ्याल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. रिकाम्या वेळेत पुस्तक वाचनावर भर द्या, मनाचा ताजेपणा अनुभवाल.

    वृषभ – अनावश्यक चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. आजच्या दिवशी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने देवाण-घेवाणीचा व्यवहार अतिशय सतर्क राहून करा. तुमच्या कामाची आज स्तुती होईल. जोडीदार आणि अन्य कुटुंबीयांकडून पाठबळ मिळेल. एका महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

    मिथुन – बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. विरोधक आज जास्त सक्रिय होतील, पण संघर्षाची स्थिती निर्माण होईल, अशी कृती टाळा. तुमचे हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबर चर्चेची संधी मिळेल, त्यातून चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील.

    कर्क – ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आज आर्थिक बाजू चांगली राहील. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा. कठोर बोलण्यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. त्याऐवजी सामंजस्याची भूमिका घ्या. व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.

    सिंह – कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, अशी परिस्थिती असेल. उत्पन्न वाढीचे काही नवे स्रोत उपलब्ध होतील आणि त्यातून धन लाभ होऊ शकतो. आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर, त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात.

    हेही वाचा – आठवणींचा एक कोपरा हळुवार उघडणारी… ‘शाळा’

    कन्या – कामकाजाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य स्तर वाढवा. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, तसे घेणाऱ्याकडून लिहून घ्या. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील.

    तुळ – घरातील एखाद्या सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात. तुम्हाला त्याच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.

    वृश्चिक – तुमच्या सहकार्याच्या स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी अपेक्षित निकाल मिळेल. तुमच्याकडे महत्त्वाच्या अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, त्यामुळे तुमचे पद महत्त्वाचे ठरेल. बचतीसाठी योग्य गुंतवणुकीचा पर्याय निवडा. तुम्ही क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. परदेशस्थ नातेवाईकांकडून भेटवस्तूमुळे मिळू शकते.

    धनु – नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल, अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. दमछाक करणारा लांबचा प्रवास शक्य असेल तर टाळणे चांगले. कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. रागामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात, याची जाणीव ठेवा.

    मकर – नोकरी तसेच व्यवसायात नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर हा बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे, त्याचा अवलंब करण्याकडे लक्ष द्या. काही प्रमाणात धनलाभ होईल, त्यामुळे आर्थिक ताण कमी होऊ शकतो. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष करू नये.

    कुंभ – आज सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि वरिष्ठ देखील तुमच्या कामाने खूश होतील. व्यावसायिकही आज नफा कमाऊ शकतात. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्या.

    हेही वाचा – बहुरुपी गुलब्या

    मीन – नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस साधारण असेल. आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. लोकांना तुमच्याकडून काय हवे आहे, तेह समजून घ्या. या मदतीच्या भूमिकेमुळे स्वत:कडे सकारात्मकपणे पाहाल.


    दिनविशेष

    लढाऊ समाजसेवक सेनापती बापट

    टीम अवांतर

    सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक आणि लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1880 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे गरीब कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. 1921 ते 1924 या काळात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेट्यात धरणग्रस्त गावांकरिता तसेच शेतकऱ्यांकरिता बापट यांनी सत्याग्रहाचा लढा दिला. या लढ्याचे त्यांनी नेतृत्व केल्याने ‘सेनापती बापट’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. या आंदोलनात तीनदा कारागृहवासाची शिक्षा त्यांना झाली, शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. त्यांचे बी.ए. पर्यंतचे उच्च शिक्षण पुणे येथे झाले. डेक्कन कॉलेजमध्ये असताना, सशस्त्र क्रांतीद्वारे भारत स्वतंत्र करण्याची शपथ तलवारीवर हात ठेवून त्यांनी घेतली होती. बी.ए. झाल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच क्रांतिकारक विचारांचा प्रचार करीत असल्यामुळे शिष्यवृत्ती बंद होऊन शिक्षण अपुरे राहिले. श्यामजी कृष्ण वर्मा या क्रांतिकारक नेत्याशी परिचय होऊन त्यांच्या मदतीने पॅरिस येथे राहून तेथील रशियन क्रांतिकारकांकडून शक्तिशाली बॉम्बची तंत्रविद्या हस्तगत केली. त्या तंत्रविद्येची पुस्तिका भारतात आणि बंगालमधील क्रांतिकारक गटांपर्यंत पोहोचविली. क्रांतिकारकांच्या कटाच्या एका खटल्यात माफीच्या साक्षीदाराने बापटांचे नाव उघडकीस आणल्यामुळे ते 1908 ते 1912 अशी चार वर्षे अज्ञातवासात राहिले. नंतर 1921पर्यंत स्वत:च्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि समाजसेवेचे व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे आणि शौचकूप साफ करणे, हे व्रत त्यांनी जन्मभर स्वीकारले. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. यावेळी कारागृहात असताना आंदोलनाला पूरक अशा तऱ्हेचे साहित्य लिहिले आणि ते प्रकाशित केले. बरेचसे लेखन मराठीत व थोडे इंग्रजीत आणि संस्कृतमध्ये केले आहे. क्रांतिवादी राजकारणाचे समर्थन करणारे, भगवतगीतेच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले, राष्ट्रमुक्ती आणि अन्याय प्रतिकार या दोन मुद्यांना अनुसरून युक्तिवाद केलेले हे साहित्य आहे. योगी अरविंदांचा दिव्यजीवन हा मोठा ग्रंथ बापटांनी प्रसन्न शैलीने मराठीत उतरविला आहे. त्यांचे साहित्य समग्र ग्रंथ (1977) म्हणून साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानाने प्रसिद्ध झाले आहे. 28 नोव्हेंबर 1967 रोजी या थोर समाजसेवकाचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn