दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 22 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 12 जून 2025
वार : गुरूवार
तिथि : प्रतिपदा 14:27
नक्षत्र : मूळ 21:56
योग : शुभ 14:04
करण : तैतील 26:56
सूर्य : वृषभ
चंद्र : धनु
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:16
पक्ष : कृष्ण
मास : ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – विनयशील वागण्याचे कौतुक होईल. योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे. संघर्ष विनाकारण वाढणार नाही, याची काळजी घ्या. खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.
वृषभ – अर्धशिशीच्या रुग्णांनी योग्य उपचार घेण्याची गरज आहे. काही जातकांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. लोन घेण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर, तुमचे काम पूर्ण होईल.
मिथुन – जे जातक जवळच्या नातेवाईकांसोबत एखादा व्यवसाय करत असतील तर त्यांना खूप विचार करून पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. भावा, बहिणींसोबत घरातच खूप चांगला वेळ घालवाल. मात्र व्यसनांपासून दूर रहा.
कर्क – कामाच्या ठिकाणी काही जातकांना माघार घ्यावी लागू शकते. अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. आपल्या कमतरतेवर काम करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा. आई -वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
सिंह – कामाच्या ठिकाणी शब्द अंतिम असेल. मात्र, तरीही आजच्या दिवसातला बराच काळ विचार करण्यात जाईल. त्यामुळे नाहक मनस्ताप वाट्याला येईल. ध्यानधारणा अवश्य करा. दिवसअखेर धनलाभाचा योग आहे.
कन्या – मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील लहान-लहान गोष्टींसाठी मोठा खर्च होऊ शकतो. ज्यामुळे मानसिक तणावात येऊ शकतात. कामाच्या ताणतणावांचे ढग मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी मनाजोगा वेळ देता येणार नाही.
तुळ – बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा. प्रवास करायचा असेल तर, सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. स्वप्ने वास्तवात उतरतील.
वृश्चिक – घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वाहन चालविताना काळजी घ्यावी लागेल. विवाह प्रस्तावाच्या संदर्भात विचारपूर्वक निर्णय घ्या. भागीदारीतील व्यवसाय असेल तर सतर्क रहा, भागीदाराकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.
धनु – प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. मुलांकडून अपेक्षा पूर्ण होतील. विवाहाचे प्रस्ताव येतील. मात्र सगळीकडे नीट चौकशी करून मगच पुढचा निर्णय घ्या. आत्मविश्वासात वाढ होईल, त्यामुळे प्रगतीचा आलेख चढता राहील.
मकर – चैतन्याने सळसळणारा असा दिवस आहे. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात येईल. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटाल. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. भाऊ किंवा बहिणीचीही भेट होण्याची शक्यता आहे.
कुंभ – धन कमावण्याची संधी मिळेल. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत असेल. नवे काम पूर्ण करण्यासाठी एखादी स्त्री सहकारी मदत करेल. सगळ्याच दृष्टीने अनुकूल दिवस आहे. मात्र बाहेरचे, उघड्यावरचे अन्न खाणे टाळा.
मीन – चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा. कार्यक्षेत्रात लक्ष लागणार नाही, त्यामुळे चिंता राहील. मात्र याबाबतीत जास्त विचार करून महत्त्वाचा वेळ खराब करू नका.
दिनविशेष
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, लोकप्रिय लेखक पु. ल. देशपांडे यांचा आज स्मृतीदिन आहे. ते कुशल चित्रपट आणि रंगमंच अभिनेता, पटकथा लेखक, लेखक, संगीतकार, गायक आणि वक्तेदेखील होते. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात, लक्ष्मण त्रिंबक देशपांडे आणि लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे यांच्या पोटी झाला. पुलंनी पार्ले टिळक विद्यालयात शिक्षण घेतले. हायस्कूलनंतर इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये आणि नंतर बीएसाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 1950 मध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) पदवी पूर्ण केली आणि नंतर विलिंग्डन कॉलेज, सांगली येथून मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) पदवी प्राप्त केली. सरकारच्या अख्यत्यारितील दूरदर्शन वाहिनीसाठीही त्यांनी काम केले. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भारतीय दूरचित्रवाणीवर मुलाखत घेणारे ते पहिले होते. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक खूपच लोकप्रिय ठरले. जीवनातील विविध व्यक्तिमत्त्वांचे ते एक चित्रण आहे. बटाट्याची चाळ, अपूर्वाई, असा मी असामी, ती फुलराणी, जावे त्यांच्या देशा, गुण गाईन आवडी, त्यांची अशी अनेक पुस्तके लोकप्रिय आहेत, अशा या प्रतिभावान लेखकाचे 12 जून 2000 रोजी निधन झाले.