दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 11 जुलै 2025, वार : शुक्रवार
भारतीय सौर : 20 आषाढ शके 1947, तिथि : प्रतिपदा 26:08, नक्षत्र : उत्तराषाढा – अहोरात्र
योग : वैधृति 20:43, करण : बालव 14:10
सूर्य : मिथुन, चंद्र : धनु 12.08, सूर्योदय : 06:07, सूर्यास्त : 19:20
पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कार्यालयात अतिरिक्त कामाची जबाबदारी दिली जाऊ शकते. दररोज योग आणि ध्यान करा. आरोग्याच्या संदर्भात हेळसांड करू नका. गुंतवणुकीचे निर्णय हुशारीने घ्या. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कुटुंबीय आणि मित्रमंडळींचा पाठिंबा मिळेल. विद्यार्थी शैक्षणिक प्रयत्नांमध्ये नवीन उंची गाठतील.
वृषभ – आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने नवीन संधी निर्माण होतील. आरोग्य चांगले राहील. घरात शुभ कार्याचे आयोजन केले जाईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत.
मिथुन – दैनंदिन कामातून छोटासा ब्रेक घ्या. दररोज योग आणि ध्यान करा. आरोग्य चांगले राहील. शैक्षणिक जीवनामध्ये नवीन उंची गाठाल. मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. व्यावसायिकांसाठी अत्यंत व्यग्र वेळापत्रक असेल. कामाचा ताण वाढेल. मात्र कार्यालयातील ताण घरी आणू नका.
कर्क – कारकीर्दीत पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळतील. कारकीर्दीतील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. यश मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. कार्यालयातील कामाची आव्हाने वाढू शकतात. कामाच्या संदर्भात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह – आत्मविश्वास वाढेल. कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत केलेल्या कामात यश मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्व काही ठीक राहील. मेहनतीचे चीज होईल. संबंध सुधारतील. प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. अतिरिक्त खर्चामुळे मन अस्वस्थ होईल. कुटुंबात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.
कन्या – कार्यालयातील वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कार्यालयातील कामगिरी उत्कृष्ट असेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबासमवेत वेळ घालवा. नवीन मालमत्ता खरेदी करायची असेल तर ही सर्वोत्तम वेळ आहे. नोकरी बदलण्याची संधी मिळेल. व्यावसायिक जीवनात मोठे बदल होतील.
हेही वाचा – आत्मविश्वास… कधी कमी तर, कधी जास्त
तुळ – कार्यालयातील नवीन कामांची जबाबदारी घ्या. यामुळे विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील. अधिकारी कामाचे कौतुक करतील. कार्यालयीन राजकारणापासून दूर रहा. कामावर लक्ष केंद्रित करा. स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवणूक करा. बोलण्यापूर्वी नीट विचार करून बोला.
वृश्चिक – आरोग्य सुधारेल. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. त्यातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामात घाई करणे टाळा. सर्व कामे पद्धतशीरपणे पार पाडा. भावनिक होऊ नका. एखाद्या कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. वैयक्तिक प्रगतीसाठी अनेक संधी उपलब्ध होतील, मात्र जीवनात अनेक आव्हानेही असतील.
धनु – विचार केल्याशिवाय काहीही बोलू नका. धीर धरा, प्रत्येकवेळी रागावणे टाळा. कोणत्याही परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कार्यालयातील कामांची अतिरिक्त जबाबदारी मिळेल. नातेसंबंधातील गैरसमज संभाषणाच्या माध्यमातून सोडवा. जोडीदारासोबत वेळ घालवा.
मकर – नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ असेल. शांत राहा आणि घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबाच्या पाठिंब्याने कामातील अडथळे दूर होतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल.
कुंभ – मन प्रसन्न राहील. कामे पद्धतशीरपणे पूर्ण करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. कामावर लक्ष केंद्रित करा. यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यवस्थापनात चांगली प्रतिमा राहील. जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबींमध्ये थोडी सावधगिरी बाळगा. गरज भासल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
मीन – कारकिर्दीत यश मिळेल. पैशाचे व्यवस्थापन हुशारीने करा. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागेल. भावनांमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
हेही वाचा – पुढे जायचं तर जुनं मागे टाकावंच लागेल!
दिनविशेष
मेजर राम राघोबा राणे
टीम अवांतर
भारतीय लष्कराचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या परमवीर चक्राचे पहिले जिवंत मानकरी म्हणून मेजर राम राघोबा राणे यांचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे. 26 जून 1918 मध्ये कारवार जिल्ह्यातील चेंदिया गावी राणे यांचा जन्म झाला. वयाच्या 22 व्या वर्षी म्हणजे 1940 साली ते ब्रिटिश इंडियन आर्मीत दाखल झाले. 1948 साली पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये राजौरी भागात केलेला हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय सैन्याला सुरक्षितपणे आगेकूच करता यावी म्हणून 72 तास भूसुरुंग बाजूला करण्याचे अतिशय जोखमीचे काम राणे आणि त्यांच्या चमूने यशस्वीपणे पार पाडले होते. त्यावेळी राम राघोबा राणे 37व्या असॉल्ट फील्ड कंपनीचे सेक्शन कमांडर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत 21 जून 1950 रोजी त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. त्याच्या काहीच महिने आधी सेकंड लेफ्टनंट या पदावरून त्यांना लेफ्टनंटपदी बढती मिळाली होती. 1954 साली ते कॅप्टन झाले. तर, 1968 साली ते मेजर पदावरून निवृत्त झाले. 11 जुलै 1994मध्ये पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. 2023 मध्ये अंदमान निकोबार द्वीपसमूहातील 21 मोठ्या बेटांचे नामकरण करण्यात आले. ही बेटे आता परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जातात. त्यातील एका बेटाला मेजर राम राघोबा राणे यांचे नाव देण्यात आले आहे.