Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 08 नोव्हेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 08 नोव्हेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 8, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 08 नोव्हेंबर 2025; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 17 कार्तिक शके 1947; तिथि : तृतीया 07.32, चतुर्थी 28:25; नक्षत्र : मृगशीर्ष 22:02
    • योग : शिव 18:31; करण : बव 17:55
    • सूर्य : तुळ; चंद्र : वृषभ 11:14; सूर्योदय : 06:40; सूर्यास्त : 18:03
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:41)

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – व्यावसायिक परिस्थिती अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठांकडून फारसा पाठिंबा मिळणार नाही. पण एकट्याने केलेल्या कामामुळे समाधानकारक यश मिळेल. नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे. आरोग्यासाठी व्यसनांचा त्याग करा. अभ्यासात विद्यार्थ्यांचे फार लक्ष लागणार नाही.

    वृषभ – कामातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचा मार्ग सापडेल. चांगल्या कामासाठी मार्ग मोकळा कराल. सकाळी लवकर आपली फायदेशीर कामे पूर्ण करा. मात्र तरी, पैशांची कमतरता जाणवेल. काही जातकांचा नोकरीचा शोध सुरू राहील. आरोग्याच्याही तक्रारी असतील.

    मिथुन – प्रवास फलदायी परिणाम देईल. व्यवसायातील अडथळे मानसिक अशांतता निर्माण करतील. परस्पर संवादातून गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल, तुमचे काम सुलभ गतीने पुढे सरकेल. समाजात तुमच्या प्रती आदर वाढेल. आज स्वतःच्या कामाला प्राधान्य द्या.

    कर्क – प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरतील. काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे मिळू शकतात. आशा आणि उत्साहामुळे कामे झपाट्याने उरकाल. धार्मिक श्रद्धा फलदायी ठरतील. कौटुंबिक वाद टाळा. बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील.

    सिंह – व्यावसायिक समृद्धी आणि आनंद वाढेल. सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल. जास्त कामामुळे व्यग्र राहाल. आर्थिक नफा मिळू शकतो, पण त्यासोबतच खर्च देखील वाढू शकतात. जे काम आज पूर्ण करू शकता, ते उद्यावर टाकू नका हेच तुमच्यासाठी चांगले असेल. जुने मित्रही भेटू शकतात.

    हेही वाचा – पश्चात्तापदग्ध राजयोगिनी कुंती…

    कन्या – कामाच्या वेळापत्रकामुळे तुमच्या आनंद आणि मानसिक शांततेवर परिणाम होईल. त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक असेल. नवीन उपक्रमांच्या संधी वाढतील आणि अनेक दिवसांपासूनच्या इच्छा पूर्ण होतील. नफ्याचा मार्ग मोकळा होईल. कुटुंबातील काही गैरसमज दूर होतील. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.

    तुळ – उत्पन्न आणि खर्च यात समतोल राहील. आरोग्य चांगले राहील. व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत कामावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. शैक्षणिक काम सहज पूर्ण होईल. समाजात आदर वाढेल. प्रियजनांकडून सहकार्य मिळेल. मात्र  पत्नी किंवा मुलांबाबत काही चिंता निर्माण होईल.

    वृश्चिक – व्यवसायाची स्थिती यथातथाच राहील. या काळात सतत नकारात्मक परिणाम मिळत राहतील. शत्रूंची भीती, , मुलांबद्दल चिंता आणि वाया जाणारा वेळ हे घटक या सगळ्यात मोठा हातभार लावतील. पण मनातून समाधानी राहिल्याने यश मिळेल. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. मात्र, कर्ज घेणे टाळा.

    धनु – प्रवासामुळे होणारा फायदा दीर्घकालीन परिणाम देणारा असेल. कामातील अडथळे दूर कराल. हातात उपलब्ध असणाऱ्या सोयी आणि समन्वयामुळे कामात प्रगती होईल. यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कामे पूर्ण करण्यास मदत होईल. दुसरीकडे, विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.

    मकर – व्यवसायात प्रगती होत राहील. व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या परिश्रमांमुळे फायदा होईल. व्यापारातील नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. गुंतागुंतीच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करा.

    कुंभ – व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य निर्माण होईल. मित्रांसोबत सहकार्य केल्यास नफा होईल. पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण होतील. जोखीम टाळणे शहाणपणाचे ठरेल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे लाभदायक ठरेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ.

    हेही वाचा – महाराणी संघमित्राची खोली तर दिसली…

    मीन – कठोर परिश्रमाने ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास फायदा होईल. कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक स्तरावर सतत पाठिंबा मिळेल. आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्यात यशस्वी व्हाल. भावंडांमधील प्रेम वाढेल. जुन्या मित्राच्या भेटीमुळे आजची सायंकाळ बहरून जाईल. सोनेरी दिवसांच्या बालपणीच्या रम्य आठवणीत रंगून जाल.

    दिनविशेष

    संशोधक डॉ. कमल रणदिवे

    टीम अवांतर

    डॉ. कमल जयसिंग रणदिवे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1917 रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. कमल रणदिवे या पहिल्यापासून हुशार होत्या. फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषी महाविद्यालयातून एमएससी केली. त्या काळात शेतकी महाविद्यालयात मुलीने अ‍ॅडमिशन घेणं जरा विलक्षणच होतं! तिथं त्यांनी ‘गुणसूत्रं’ हा विषय अभ्यासाला घेतला. रंगसूत्रं विभाजित होत असताना त्यामध्ये काय बदल होतात आणि त्याचा आनुवंशिक परिणाम काय घडतो, यावर त्यांनी तिथं संशोधन केलं. पुढे गणिततज्ज्ञ जे. टी. रणदिवे यांच्याशी त्यांचे लग्न झाले. कमल रणदिवे यांनी मुंबईतील  टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम केलं. सोबतच त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी पदवी देखील घेतली. डॉ. कमल रणदिवे या भारतीय महिला वैज्ञानिक संघाच्या (IWSA) संस्थापक सदस्य होत्या. त्यांनी कॅन्सर या रोगावर अनेक संशोधने केली. या दरम्यान 1945 मध्ये उंदरांवर संशोधन करताना स्तनांचा कर्करोग आणि अनुवांशिकता यांचा एकमेकांशी असलेला संबंध त्यांनी शोधून काढला.  याला अनेक संशोधकांनी देखील दुजोरा दिला. 1960 च्या दशकात त्यांनी मुंबईत भारतीय कॅन्सर संशोधन केंद्रात भारतातील पहिली प्रयोगशाळा सुरु केली. त्यांचे मार्गदर्शक डॉ. व्ही. आर. खानोलकर हे भारतीय कॅन्सर संशोधन केंद्राचे (आयसीआरसी) संस्थापक होते.  त्यांनी 1949 मध्ये पीएचडी पूर्ण झाल्यानंतर कमल रणदिवे यांना अमेरिकन विद्यापीठात फेलोशिपसाठी प्रवेश घेण्यास प्रोत्साहन देखील दिलं. डॉ कमल रणदिवे यांना पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिप मिळाली आणि त्यांनी इनोव्हेशन लेबर सेल लाइनमधील प्रसिद्ध संशोधक जॉर्ज गे यांच्यासोबत बाल्टीमोरमध्ये जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीमध्ये काम केलं.  भारतात परतल्यावर त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच ‘इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर’मध्ये देशातील पहिली टिश्यू कल्चर; म्हणजेच उती संवर्धनाची प्रयोगशाळा सुरू झाली. लवकरच पेशी जीवशास्त्र, प्रतिकारशक्तीशास्त्र आणि कार्सिनोजेनेसिस यांच्यासाठी देखील स्वतंत्र विभाग सुरू झाले. डॉ. रणदिवे यांनी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांमधून मिळालेले निष्कर्ष हे कर्करोगासाठी पथदर्शी ठरले. रक्ताचा, स्तनांचा किंवा अन्ननलिकेचा कर्करोग या सर्व बाबतीमध्ये ट्युमर विषाणू आणि ग्रंथी यांचा संबंध उघड करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. त्यांनी कुष्ठरोग विषाणूंवर केलेल्या संशोधनांमधूनच भारतात कुष्ठरोग संबंधित लसीमध्ये सुधारणा करण्यात आल्या. कुष्ठरोगावरील या संशोधनासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. 1982मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मानानं गौरवण्यात आलं. 1991 साली कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. 10 एप्रिल 2001 रोजी त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 19, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 एप्रिल 2026; वार : रविवार भारतीय सौर : 29…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 272
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 389
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 562
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.