दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 08 जुलै 2025, वार : मंगळवार
भारतीय सौर : 17 आषाढ शके 1947, तिथि : त्रयोदशी 24:38, नक्षत्र : ज्येष्ठा 27:14
योग : शुक्ल 22:16, करण : कौलव 11:57
सूर्य : मिथुन, चंद्र : वृश्चिक 27:14, सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 19:20
पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
भौम प्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा दिवस. कामात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वेळच्या वेळी आणि हुशारीने कृती केली तर इतरांपेक्षा कामगिरी सरस राहील. कुटुंबातील सदस्यांना काही निवांत वेळ द्या.
वृषभ – नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती उल्लेखनीय ठरेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर, ते परत मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा.
मिथुन – विचारपूर्वक योग्य प्रकल्प हाती घेतले तर आत्मविश्वास वाढेल. अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. तसेच, आर्थिक फायदा संभवतो. धोरणीपणाने वागला नाहीत तर, नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
कर्क – सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे नोकरी-व्यवसायात उत्तम कामगिरी होईल. आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात.
सिंह – पैशांची किंमत चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून बचत खूप कामी येऊ शकते आणि एखाद्य मोठ्या अडचणींमधून सहजपणे बाहेर पडू शकाल. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, कदाचित त्या व्यक्तीला समजून घेण्याची, सहानुभूतीची गरज असू शकते.
कन्या – संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या. बऱ्याच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे ऊर्जा कमी झाली आहे, यावर लक्ष केंद्रीत करा.
हेही वाचा – आकाशातील चित्रा आणि स्वाती नक्षत्र
तुळ – गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच सहभाग जाहीर करा. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळेल आणि त्यानिमित्त प्रभावी, बड्या व्यक्तींशी संपर्क होऊ शकेल.
वृश्चिक – भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र, लहान व्यवसाय करणाऱ्या जातकांना थोडा तोटा होऊ शकतो. तथापि, घाबरण्याची आवश्यकता नाही योग्य मेहनतीचे चांगले फळ नक्कीच मिळेल.
धनु – ‘बिन बुलाया मेहमान’ घरी येऊ शकतो. या पाहुण्याच्या आगमनाने आर्थिक लाभ होऊ शकतो. परंतु बोलताना सांभाळून बोला. कामाच्या ठिकाणी प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. आपल्या मुलांना वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकता.
मकर – अडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे नीतीधैर्य खचेल. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी मूड चांगला राहील. नातेवाईकांबरोबर वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असली तरी, संध्याकाळपर्यंत सगळे काही ठीक होईल.
कुंभ – क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकते. कोणाला पैसे उधार दिले असतील तर, ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
मीन – अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. तुमचे जोडीदार, भागीदार पाठिंबा देतील आणि मदतही करतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग रहा, एखादी महत्त्वाची टीप मिळू शकते.
हेही वाचा – नक्षत्र… मघा, फाल्गुनी, हस्त!
दिनविशेष
टीम अवांतर
लेखक गो. नी. दांडेकर
‘गडसम्राट’ गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचा जन्म 8 जुलै 1916 रोजी विदर्भातील परतवाडा येथे झाला. गोपाळ नीलकंठ दांडेकर यांची ‘गोनीदा’ अशीही ओळख आहे. 1947 मध्ये गोनीदांनी लेखनकार्य सुरू केले. कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. नयनरम्य कोकणावर आधारित पडघवली आणि शितू या कादंबर्या आहेत. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. त्यांनी ‘मृण्मयी’, ‘जैत रे जैत’ तसेच शिवकालावर आधारित पाच कादंबऱ्या लिहिल्या. मावळ, खान्देश वऱ्हाड, कोकण अशा भिन्न भिन्न प्रादेशिकतेचा प्रत्यय देणाऱ्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. गोनीदांनी धार्मिक साहित्य रचनाही केली. 1981 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. 1 जून 1998 रोजी त्यांचे निधन झाले.