Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधआजचे पंचांग आणि दिनविशेष : 05 जून 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष : 05 जून 2025

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

दर्शन कुलकर्णी

 

आज, भारतीय सौर : 15 ज्येष्ठ शके 1947

अर्थात,

दिनांक : 05 जून 2025

वार : गुरुवार

तिथि : दशमी 26:15

नक्षत्र : हस्त, अहोरात्र

योग : सिद्धी 09.12

करण : तैतील 13:02

सूर्य : वृषभ

चंद्र : कन्या

सूर्योदय : 06:00

सूर्यास्त : 19:13

पक्ष : शुक्ल

मास : ज्येष्ठ

ऋतू : ग्रीष्म

सूर्य अयन : उत्तरायण

संवत्सर : विश्वावसू

शालिवाहन शक : 1947

विक्रम संवत : 2081

युगाब्द : 5127

गंगा दाशहरा समाप्त


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – जितके शांत रहाल तेवढे तणावमुक्त रहाल. जुन्या वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल.

वृषभ – मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर उपक्रमांकडे मुलांचा असणारा ओढा पाहून निराशा व्हाल. सहकारी चांगल्या प्रकारे समजून घेतील. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या.

मिथुन –  मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जा‌ण्याचा योग. धनलाभ होण्याची शक्यता आहे. अर्थात, यासोबतच दानही केले पाहिजे; यामुळे मानसिक शांती मिळेल. अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर, कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करा.

कर्क – आयुष्याबद्दल थोडा उदार दृष्टीकोन ठेवा. आपल्या परिस्थितीबद्दल, जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडून असणाऱ्या आशाअपेक्षा उद्ध्वस्त करतात, हे लक्षात ठेवा. नवीन गोष्टी शिकण्याकडे कल असून तो उल्लेखनीय ठरेल.

सिंह – अत्यंत व्यग्र वेळापत्रकातदेखील आरोग्य चांगले असेल. पण तब्येतीला गृहित धरू नका. तब्येतीची काळजी घेणे, ही गरज आहे. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा.

कन्या – घरगुती कामे कंटाळवाणी वाटतील. त्यामुळे मानसिक तणावाला निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांना प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई करावी लागेल.

तुळ – चांगल्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस. मात्र आपला पैसा नेमका कुठे खर्च होत आहे, यावर नजर ठेवण्याची देखील आवश्यकता आहे. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल.

वृश्चिक – एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याची इच्छा होईल. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्याकडून ज्ञान मिळवाल, त्यांचे आशीर्वाद घ्याल. जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

धनु – मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटण्याचा योग येईल. मात्र त्यांच्यासमोर दबून जाऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मात्र तीव्र भावनांना आवर घाला.

मकर – स्वत:ची प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल – आनंद वाटेल आणि अधिक आत्मविश्वास मिळेल. जीवनाची गाडी चांगल्या प्रकारे चालावी अशी इच्छा असेल तर, पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.

कुंभ – आज चैतन्याने भारलेले असाल. तरी, सोबत असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता नक्कीच जाणवेल. परिचयाच्या लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल.

मीन – करमणुकीत रमाल. विविध क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. पैशांची किंमत चांगल्या प्रकारे जाणत असल्याने, केलेली बचत खूप कामी येऊ शकते. त्याच्या मदतीने तुम्ही कुठल्याही मोठ्या अडचणींमधून बाहेर पडाल. वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील.


दिनविशेष

जागतिक पर्यावरण दिन

दरवर्षी 5 जून रोजी जगभर पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा दिवस पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, हा उद्देश त्यामागे आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश आणि संस्था यात सहभागी होऊन विविध उपक्रम हाती घेतात. 1973 साली संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे (UNEP) हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. लोकांना पर्यावरणाचे महत्त्व अधिक प्रभावीपणे समजावून सांगण्याच्या दृष्टीने दरवर्षी या दिवसासाठी एक विशिष्ट संकल्पना निश्चित केली जाते. यंदाची म्हणजे 2025 सालची जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे ‘प्लास्टिक प्रदूषणावर मात करा’. यावर्षीचा दिवस प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी साजरा केला जाईल.

ख्यातनाम हार्मोनियमवादक गोविंदराव टेंबे

प्रख्यात हार्मोनियमवादक, संगीतरचनाकार, गायक-नट आणि साहित्यिक गोविंदराव टेंबे यांचा जन्म 5 जून 1881 रोजी कोल्हापुरातील सांगवडे येथे झाला. 1911-13 या काळात त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रमुख गायकनट म्हणून काम केले. नंतर 1913-15 या दरम्यान गंधर्व नाटक मंडळीत सुरुवातीचे भागीदार तसेच नट म्हणून केल्यावर 1917मध्ये त्यांनी स्वत:च्या ‘शिवराज नाटक मंडळीची स्थापना केली. ‘माझा संगीत व्यासंग’ आणि ‘माझा जीवनविहार’ या पुस्तकांद्वारे आपला जीवनपट रसिकांसमोर उलगडून दाखविला. हार्मोनियमवादनातून गायकीचा भास निर्माण केला. भाऊराव कोल्हटकरांपासून कुमार गंधर्वांपर्यंतचा जमाना पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोविंदरराव टेंबे यांचे 9 ऑक्टोबर 1955 रोजी निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!