Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 04 फेब्रुवारी 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 04 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 4, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 04 फेब्रुवारी 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 15 माघ शके 1947; तिथि : तृतीया 24:09; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 22:12
    • योग : अतिगंड 25:03; करण : वणिज 12:19
    • सूर्य : मकर; चंद्र : सिंह 28:19; सूर्योदय : 07:12; सूर्यास्त : 18:31
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज फक्त स्वतःच्या कामाला प्राधान्य द्या. मोठा आर्थिक फायदा होईल. जुन्या मित्रांना भेटाल. संततीशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. तुमचा सौम्य स्वभाव कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदत करेल. जोडीदाराशी तुमचे नाते अधिक सौहार्दपूर्ण होईल. आज तुम्हाला सर्वांकडून पाठिंबा मिळेल.

    वृषभ – सध्याचा काळ नकारात्मक आहे. मात्र, गुंतागुंतीच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कामात सावधगिरी बाळगा. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी निगडित प्रवास तूर्तास पुढे ढकला. व्यवसायात अडथळे येतील. आरोग्याच्या लहान कुरबुरी सुरू होतील, पथ्यपाणी सांभाळा.

    मिथुन – सध्या सुरू असणाऱ्या घडामोडी काळजीपूर्वक हाताळा. कामाच्या प्रगतीत अडचणी येऊ शकतात. व्यवसायातील अडथळे मानसिक अशांतता निर्माण करतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. संततीची चिंता आणि वाढता खर्च यामुळे अस्वस्थता वाढेल. पण निराश होऊ नका; काळ हे सगळ्या प्रश्नांवरचे उत्तर आहे.

    कर्क – व्यवसायात संयमाने निर्णय घ्या. स्वतःचे काम स्वतः करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. जीवन मौल्यवान आहे, त्यामुळे गाडी चालवताना काळजी घ्या. कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे आयोजन होईल. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक गोड होईल. राज्यस्तरीय एखादा सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

    सिंह – नवीन लोकांच्या होणाऱ्या भेटी भविष्यात फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक जीवन एकमेकांपासून वेगळे ठेवा. व्यावसायिक संबंधांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी स्थान बदलण्याची शक्यता आहे. एखादी आवडती वस्तू, नवीन कपडे किंवा दागिने भेट म्हणून मिळू शकतात.

    हेही वाचा – Bookshelf : एक होता कार्व्हर… विलक्षण कहाणी जिद्दीची, माणुसकीची आणि देशप्रेमाची!

    कन्या – आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. संभाषण करताना संयम ठेवा. आज मन अस्वस्थ असेल. त्यामुळे भावनांवर आधारित निर्णय घेऊ नका. कोणालाही पैसे उधार देणे टाळा. संततीशी संबंधित समस्या यांचा सामना करावा लागेल. कला क्षेत्रातील लोकांना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. व्यवसायिक सहली सध्यातरी पुढे ढकला.

    तुळ – सरकारी पातळीवर आज तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. येणाऱ्या संधींचा फायदा घ्या. आज मन आर्थिक मजबूतीवर केंद्रित असेल. आर्थिक योजना फलदायी ठरतील. थकित निधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबातील जुने वाद संपतील.

    वृश्चिक – आज उत्साहात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. काही सामाजिक कार्य तुमच्या हातून पूर्ण होईल, ज्याने तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. आज मनाविरुद्ध लांबचा प्रवास आणि आव्हानात्मक कामे करावी लागू शकतात. व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कठोर परिश्रमांची आणि समर्पणाची परीक्षा बघितली जाईल.

    धनु – आज व्यवहारात स्पष्टता ठेवा. कुटुंबातील सदस्यांची मोठी मदत मिळेल. व्यवसाय आणि व्यापार अनुकूल राहील. पदोन्नती शक्य आहे. आज सरकारी काम आणि वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक अडचणींपासूनही दिलासा मिळेल. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे भेट म्हणून मिळतील.

    मकर – आजच्या संधी उद्या उपलब्ध नसतील, म्हणून त्यांचा फायदा घ्या. मित्रांसोबत वागताना सावधगिरी बाळगणे उत्तम. मानसिकदृष्ट्या समाधानी राहिल्याने यश मिळेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. शुभ कार्यक्रमांसाठी पैसे खर्च होतील. घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

    कुंभ – व्यवसाय वृद्धी होईल. आजच्या मेहनतीचे भविष्यात फळ मिळेल. इतरांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण कराल. मित्रांकडे दुर्लक्ष करणे अयोग्य ठरेल. तुमच्या नोकरीत एखादी  गुंतागुंत निर्माण होईल. मात्र कीर्ति आणि प्रतिष्ठा वाढू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येऊ शकतात. स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

    मीन – आज मान्यवरांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. बुद्धिमत्ता, शक्ती आणि धैर्य यांचा व्यवसाय किंवा नोकरीसाठी लाभ होईल. व्यवसाय वाढेल आणि नफा होईल. कामात समाधानकारक यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कामे पूर्ण करण्यासाठी मदत मिळेल. व्यावसायिक सहली यशस्वी होतील. अनावश्यक धावपळ टाळणे चांगले.


    दिनविशेष

    स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी

    टीम अवांतर

    प्रख्यात गायक आणि संगीतरचनाकार भीमसेन गुरुराज जोशी यांचा जन्म धारवाड जिल्ह्यातील रोण या गावी 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला. बालपणापासून भीमसेन यांना गायनाचे विलक्षण आकर्षण होते. ते आईसोबत कानडी भजने म्हणत. शाळेत जाता-येताना वाटेवरील ध्वनिमुद्रिकेच्या दुकानात उस्ताद अब्दुल करीमखाँ यांची झिंझोटी रागातली ठुमरीची ध्वनिमुद्रिका आणि 1932 साली पं. सवाई गंधर्व यांची गदगमधील मैफल अशा किराणा घराण्याच्या दोन गायकांची गायकी ऐकून त्यांनी शास्त्रीय संगीत शिकण्याचा ध्यासच घेतला. गाण्याची आत्यंतिक आवड पाहून वडिलांनी गदगमधील अगसरू चन्नाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे भीमसेन यांची गाण्याची शिकवणी सुरू केली. त्यांच्याकडून वर्षभरात 20-21 रागांशी त्यांचा प्राथमिक परिचय झाला. पुढे गुरूच्या शोधात ते घराबाहेर पडले आणि ग्वाल्हेरला हाफीज अलीखाँ यांच्याकडे पोहोचले. त्यांच्याकडच्या वास्तव्यात मारवा रागाची तालीम आणि कृष्णराव पंडित, कुंडलगुरू बाळाभाऊ उमडेकर, राजाभैय्या पूँछवाले यांच्याकडील श्रवणभक्तीने गायनाचे मूलभूत संस्कार त्यांना लाभले. पुढे कलकत्त्याला पहाडी संन्याल या अभिनेत्याने त्यांना गांधारी हा अनवट राग शिकवला. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि मग जालंदरकडे प्रयाण केले. तेथील आर्य संगीत विद्यालयाचे धृपदिये मंगतराम यांच्याकडे धृपद संगीताची तालीम मिळाली. हरिवल्लभ संगीत संमेलनात भेटलेल्या पंडित विनायकबुवा पटवर्धनांनी दिलेला सवाई गंधर्वांकडे गाणे शिकण्याचा सल्ला शिरोधार्य मानून भीमसेन घरी परतले.

    हेही वाचा – निमित्त बँक अकाऊंटचे… राज आणि नेहाच्या भेटीचे!

    त्यानंतर सवाई गंधर्वांकडे त्यांनी निरलसपणे गुरुसेवा करून तसेच अतिशय कष्टाने गानविद्या संपादन केली. गंधर्वांनी पुढच्या शिक्षणाला अचानक नकार दिल्यामुळे भीमसेन रामपूर संस्थानात मुश्ताक हुसेनखाँ साहेबांकडे गेले. तिथे नटमल्हार घोटला. वर्षभराने सवाई गंधर्वांनी भीमसेन यांना पुन्हा बोलावले. त्यानंतर तोडी, मुलतानी आणि पूरिया या तीन रागांचा सराव तीन वर्षे चालला. आसावरी, पूरिया धनश्री, तोडी, पूरिया, भैरवी, नटमल्हार अशा रागांचा गंधर्वांनी केलेला रियाज ऐकून गायनातील काळाचे अचूक भान आणि घराण्याच्या शिस्तीचे धडे भीमसेन यांना मिळाले. त्यांच्या मैफली ऐकून मैफलीच्या गाण्याचे नियोजन कसे करावे, श्रोत्यांनुसार कोणत्या रागांची आणि गानप्रकारांची निवड करावी अशा गोष्टी भीमसेनांनी आत्मसात केल्या. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या पुण्याच्या समारंभात 1946 साली भीमसेन यांना पहिल्यांदाच गायनाची संधी मिळाली.

    हळूहळू भीमसेन जोशींची कीर्ती देश-विदेशांतही पसरत गेली. त्यांच्या मैफलींना सर्वत्र अमाप लोकप्रियता आणि अनेक मानसन्मानही त्यांना लाभले. सवाई गंधर्वांची मूळची स्वरप्रधान, आलापचारीची तसेच माफक आक्रमक अशी गायकी भीमसेन जोशी यांनी अधिक आक्रमक, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासून पकड घेणारी अशी केली. त्यांच्या गायकीच्या या वैशिष्ट्यांमुळेच संगीतेतिहासात त्यांचे स्थान अजरामर झाले आहे.

    पंडित भीमसेन जोशी यांना शासनाकडून पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि 2008 मध्ये ‘भारतरत्न’ अशा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. याशिवाय संगीतरत्न, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार इत्यादी सन्मान त्यांना लाभले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी त्यांना सन्मान्य डी. लिट पदवी प्रदान केली. जेम्स बेवरिज आणि हिंदी कवी गुलजार यांनी भीमसेनांच्या जीवनावर लघुपट बनविला आहे. 24 जानेवारी 2011 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn