Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 02 सप्टेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 02 सप्टेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 2, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 02 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 11 भाद्रपद शके 1947; तिथि : दशमी 27:52; नक्षत्र : मूळ 21:50
    • योग : प्रीति 16:38; करण : तैतिल 15:22
    • सूर्य : सिंह; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:52
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    ज्येष्ठा गौरी विसर्जन (रात्री 09:50 वाजेपर्यंत)

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – दिवस सामान्य असेल. आत्मविश्वासाचा अभाव राहील, त्यामुळे मन अस्वस्थ असू शकते. आर्थिक परिस्थिती बेताची असेल, त्यामुळे पैसे हुशारीने खर्च करा. व्यवसायात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जोडीदारासमवेत उत्तम वेळ घालवाल.

    वृषभ – आजचा दिवस चांगला आहे, असे म्हणता येईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्य सुधारेल. कुटुंबासह एखाद्या सहलीला जाण्याचा बेत आखाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. विविध स्रोतांकडून आर्थिक लाभ होईल.

    मिथुन – दिवस सामान्य राहील. मानसिक ताण येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अतिकाम असेल. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.  कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळेल. व्यवसायातील परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाजू मजबूत बनेल. गुंतवणूक करण्यापूर्वी माहितगाराचा सल्ला घ्या.

    कर्क – आजचा दिवस सामान्य असेल. मानसिक स्थिती चांगली आहे, असे म्हणता येणार नाही. दिवस खूप धावपळीचा असेल. वादविवादांपासून दूर राहा. नोकरीत दुसऱ्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल, परंतु पैसे हुशारीने खर्च करा.

    सिंह –  सिंह राशीच्या जातकांच्या आयुष्यात आज मोठे बदल होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात नफा होईल. कुटुंबासह प्रवासाला जाण्याची योजना आखू शकता. खर्चही वाढेल, परंतु विविध स्रोतांकडून पैसे येतील. करिअरमध्ये वाढ होण्याची संधी मिळेल.

    कन्या – आज मन शांत कसे राहील, याकडे लक्ष द्या. संयम राखण्याचा प्रयत्न करा. घाईघाईत कोणतेही काम करू नका. गाडी हळू चालवा, अतिउत्साही होऊ नका. नोकरी आणि व्यवसायात हुशारीने कामे करा. आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक स्तरावरही सगळे आलबेल असेल.

    हेही वाचा – परोपकार

    तुळ – आजचा दिवस चांगला असेल. मानसिक ताण कमी होईल. संयमाने काम कराल. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक फायदा होईल. प्रगतीच्या संधी मिळतील. आत्मविश्वासाने प्रत्येक काम पूर्ण कराल. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक – दिवस उत्तम आहे. नोकरी आणि व्यवसायात नफा होईल. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्रोतही वाढतील. कुटुंबाच्या पाठिंब्यावर प्रलंबित कामेही पुढे सुरू करता येतील. समाजात आदर वाढेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

    धनु – धनु राशीच्या जातकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मन शांत राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरी आणि व्यवसायातही मोठे बदल दिसून येतील. गुंतवणुकीसाठी दिवस शुभ राहील.

    मकर – मकर राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नोकरी, व्यवसाय, प्रेम, पैसा सर्व आघाड्यांवर चांगले यश मिळेल. आज जे काही काम कराल, त्याचे उत्तम परिणाम बघायला मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. विवाहोत्सुकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

    कुंभ – दिवस संमिश्र राहील. फाजील आत्मविश्वास निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात. मात्र त्याचवेळी उत्पन्न वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवा, वादविवादाच्या परिस्थितीपासून दूर रहा. मानसिक ताण संभवतो. आरोग्याची काळजी घ्या.

    मीन – मीन राशीच्या जातकांनी आज थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. पैसे हुशारीने खर्च करा, नाहीतर कर्ज घ्यायला लागेल. नोकरी आणि व्यवसायात  कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.

    हेही वाचा – माहेर : मी आणि माझं लेकरू!


    दिनविशेष

    प्रतिभावान साहित्यिक श्री. म. माटे

    टीम अवांतर

    बहुविध स्वरूपाचे ललित आणि वैचारिक लेखन करणारे, स्वतंत्र प्रज्ञेचे शैलीकार साहित्यिक, नामवंत प्राध्यापक, अस्पृश्यताविरोधी कार्य करणारे कृतिशील, निष्ठावंत समाजसेवक अशी ओळख असणाऱ्या श्रीपाद महादेव माटे यांचा जन्म विदर्भातील शिरपूर या गावी 2 सप्टेंबर 1886 रोजी झाला. 1935-46 या  कालखंडात पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ते इंग्रजी आणि मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी आणि फलदायी ठरली. 1931 मध्ये केसरीप्रबोध या ग्रंथाचे संपादक म्हणून केलेले काम माटे यांच्या साहित्यिक जीवनाची सुरुवात ठरली. महाराष्ट्र सांवत्सरिक (3 खंड, 1933-35) हा माटे यांनी संपादिलेला आणखी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. नंतर त्यांनी रोहिणी मासिकाचे संपादक म्हणून काम केले. याशिवाय विज्ञानबोध, अस्पृश्यांचा प्रश्न, रसवंतीची जन्मकथा, संत-पंत-तंत, परशुरामचरित्र, गीतातत्त्वविमर्श, रामदासांचे प्रपंचविज्ञान यासारखे ग्रंथ, उपेक्षितांचे अंतरंग, अनामिका, माणुसकीचा गहिवर, भावनांचे पाझर यासारखे कथासंग्रह तर पश्चिमेचा वारा ही एकमेव कादंबरी अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. आपल्या प्रज्ञेस सतत प्रज्वलित आणि स्वतंत्र ठेवून मराठी वाङ्‌मयावर एक चिरंतन मुद्रा उमटविणाऱ्या थोर ज्ञानोपासकांत माटे यांची गणना केली जाते. 25 डिसेंबर 1957 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn