Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    April 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!
    आरोग्य

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरApril 8, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, ब्लू बेबी, ऑपरेशन ब्लू बेबी, निळी मुले, ऑक्सिजनची कमतरता, डॉक्टर हेलेन टॉसिग, डॉक्टर आल्फ्रेड ब्लॅलॅाक, संशोधक व्हिव्हियन थॅामस
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ओपीडीत एक जोडपं बच्चू घेऊन आलं होतं… “कान खाजते, चिडचिड करते, खोकते…” त्यांनी तक्रारी सांगितल्या. सिस्टरनं पॅरामीटर्स चेक केले, सगळं नॅार्मल होतं… पण जवळ जाऊन बघितलं तर बच्चूचे ओठ आणि नखं किंचित निळसर वाटले. पालकांना याबद्दल विचारलं तर म्हणे, ”काल तर जास्त होते आज कमी आहेत.” रंग निळसर असला तरी हा माझ्यासाठी ‘रेड फ्लॅग’ होता.

    शरीराचा कुठलाही भाग निळसर पडणं म्हणजे तिथं ॲाक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याचं लक्षण! बच्चू आता तसं ‘आऊट ॲाफ डेंजर’ असलं तरी मी त्याला बालरोगतज्ज्ञांकडं रेफर केलं… हा, ना करत कसेबसे ते रवाना झाले आणि मला इकडं ‘ब्लू बेबी’ची गोष्ट आठवली.

    1940चं दशक असावं… अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटलच्या एका दालनात रोजच्या प्रमाणे शांतता असली तरी, आजची शांतता थोडी विचित्र होती. कसलं तरी सावट असणारी…!

    दालनातल्या पहिल्याच रूमच्या पलंगावर अगदी नाजूक, फिकट-निळ्या ओठांची दोन वर्षांची मुलगी शांतपणं धिमा श्वास घेत पहुडली होती… तिचा प्रत्येक श्वास म्हणजे “जिंकलं नाही तर, हरलं…” असा जणू युद्धप्रसंगच होता; कारण या मुलीचा आजार होता ‘टेट्रॅलॉजी ॲाफ फॅलोट’ म्हणजे बालकात असणारा जन्मजात हृदयविकार! पण त्या काळी लोक या पेशंटला एकच नाव देत ‘ब्लू बेबी’!!

    खाली गेलेल्या ऑक्सिजन लेव्हलमुळं मुलांचे ओठ निळसर पडत. शरीर कमकुवत होई आणि जिवंत राहण्याची आशा तसतशी कमी होत जाई… वैद्यकीय जगतानंही हात टेकले होते. हृदयावर शस्त्रक्रिया? त्यातही इतक्या लहान बालकांवर? त्या काळी हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी डॉक्टर घाबरून मागे हटत? नो वेऽऽऽ

    हेही वाचा – डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    पण तीन जणांनी मात्र हा नियम मोडायचं ठरवलं. ते थ्री इडियट्स होते एक निडर बालरोगतज्ज्ञ, एक सिद्धहस्त शल्यचिकित्सक आणि एक विलक्षण प्रतिभावान संशोधक! यातली डॉक्टर हेलेन टॉसिग रोज अशा मुलांना पाहून अंमळ वैतागली होती. त्यांचे निळे ओठ, लागलेला दम, मंदावलेल्या हालचाली आणि आयांचे अश्रू-बापाच्या प्रार्थना…

    “हे असं चालू देऊ शकत नाही… आपण रक्ताचा मार्ग बदलू शकतो… जर कोणी धाडस केलं तर?” हेलन रोजच हे वाक्य पुटपुटायची…

    दुसरा डॉक्टर आल्फ्रेड ब्लॅलॅाक… त्या काळातील प्रख्यात शल्यचिकित्सक, पण त्यालाही माहीत होतं की, ‘हृदयावर शस्रक्रिया म्हणजे मृत्यूची सीमा’! पण तरीही एक वाक्य तो रोज म्हणायचा, ”जगातली प्रत्येक सुरक्षित वाट कुणीतरी अवघड मार्गानंच तयार केलीय.”

    यातला तिसरा महानुभाव होता कुठलीही वैद्यकीय पदवी नसलेला, पण अविश्वसनीय कौशल्य असलेला संशोधक व्हिव्हियन थॅामस… या पठ्ठ्यानं प्राण्यांवर प्रयोग करत नवनवीन रक्तमार्ग तयार केले होते!

    हे तिघंही एकमेकांचे हात बनले… विज्ञान, कल्पकता आणि धैर्य एकाच दिशेनं काम करू लागले… अन् तो दिवस उजाडला! ऑपरेशन थिएटरच्या दिव्याखाली पांढऱ्या, पांढऱ्या सावल्या एकत्र मिसळल्या होत्या…

    हेही वाचा – Alcoholism : क्रांतिकारी शोधामागची कथा!

    डॉ. ब्लॅलॉकच्या हातात स्कॅल्पेल होतं आणि मागं शांतपणं उभा होता व्हिव्हियन थॉमस संपूर्ण प्रक्रियेचा अदृश्य मार्गदर्शक… टेबलावर पहुडलेल्या त्या छोट्या मुलीचं शरीर निळसर पडलं होतं, श्वास मंद होता आणि हृदयाचे ठोके अतिशय क्षीण… एक चुकीची हालचाल म्हणजे सगळं समाप्त!

    डॉ. ब्लॅलॉकनं तिच्या इवल्याश्या छातीत छोटी चीर दिली अन् आतून लाल रक्ताचा थेंब हळूच बाहेर आला जणू तो म्हणत होता, ”मला वाहतं ठेवू शकता का?”

    थॉमसनं निर्देश दिले, ”इथे… हो… इथंच आता डाव्या सबक्लेवियन आर्टरीला घट्ट पकडा… पकडलं? नीट… आणि तिला फुफ्फुसाच्या आर्टरीशी जोडा… झालं? झालं का?”

    आणि नंतर सगळं काही मंदावलं… क्षणभर ॲापरेशन थिएटरमध्ये भयाण शांतता पसरली… सगळ्यांनी आपापला श्वास रोखून धरला होता… आणि मग हळूच… मुलीच्या ओठांवरचा निळा रंग कमी होऊ लागला… फिकट झाला… अजून फिका… ते हळूहळू गुलाबी होत होते… एक नवीन रंग… जीवनाचा रंग!

    ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि जगभर ‘ब्लू बेबी ॲापरेशन’ या नावानं नावाजली… हे फक्त वैद्यक इतिहासातलं एक पान नव्हतं तर, हे एक युद्ध होतं… मृत्यूच्या सावलीला पराभूत करण्याचं युद्ध…!

    त्या दिवसानंतर हजारो ‘निळ्या’ मुलांचे आयुष्य फुलू लागलं… निळी पडलेली मुलं पुन्हा एकदा हसू लागली, खेळू लागली… जे त्या काळी केवळ एक स्वप्न होतं, ते वास्तव बनलं होतं. ही फक्त एक वैद्यकीय कथा नाहीये, जी फक्त एखादा प्रसंग सांगते; ही एक बोधप्रद गोष्ट आहे, जी सांगते… जेव्हा विज्ञानासोबत अचाट धैर्य, मानवी कौशल्य आणि करूणा हे सगळं एकत्र उभं रहातात, तेव्हा मृत्यूची ‘निळी सावली’ही मागं हटते!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026 आरोग्य

    टेंन्डो एकियालीस आणि ए. सी. एल.

    April 3, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतूत आळस आणि जडपणा

    April 2, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    By रविंद्र परांजपेApril 4, 2026

    मागील लेखात आपण भ्रामरी प्राणायाम कसा करावा आणि या अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी…

    टेंन्डो एकियालीस आणि ए. सी. एल.

    April 3, 2026

    Ayurveda : वसंत ऋतूत आळस आणि जडपणा

    April 2, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    April 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026

    Bookshelf : …म्हणूनच पडघवली अमर साहित्यकृती!

    April 7, 2026

    नेहाला पाहिजे असलेले पद राजने नाकारले, पण…

    April 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 261
    • अवांतर 180
    • आरोग्य 98
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 377
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 540
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे…
    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे… अवांतर ही वेबसाइट!
    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.
    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!
    – मनोज शरद जोशी

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    April 8, 2026
    Most Popular

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.