Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeशैक्षणिकबालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटासाठी मुक्त व्यवसाय

बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटासाठी मुक्त व्यवसाय

मागील लेखात आपण बालशाळेतील अभ्यासक्रमातील विविध विषयांबद्दल जाणून घेतल्यानंतर मुक्त व्यवसायाचा अर्थ आणि मुक्त व्यवसायाचे स्वरूप समजावून घेतले. तद्नंतर आपण अभ्यासाची सुरुवात खेळगटातील मुक्त व्यवसाय या विषयापासून केली. आता आपण या लेखात शिशुगट या वर्गासाठी मुक्त व्यवसाय या विषयासंबंधी माहिती घेऊयात.

शिशुगटासाठी मुक्त व्यवसाय

खेळगटातून शिशुगटात आलेल्या मुलांना मुक्त व्यवसायाची ओळख झालेली असते. त्यामुळे आता या मुलांना मुक्त व्यवसायातील पुढील आणखीन काही व्यवसाय द्यावे लागतात.

फाडकाम

फाडकामासाठी मुलांना रंगीत पतंगी कागद द्यावे लागतात. अगोदर सांगितल्यानुसार मुलं फाडकाम करताना अंगठा, पहिले बोट आणि मधले बोट यांचा उपयोग करायला हळूहळू शिकतात. अशा फाडकामामुळे मुलांचा लेखनाचा आरंभ सुकर होतो.

हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : मुक्त व्यवसाय

चुरगाळाकाम

मुलांना फाडलेल्या कागदांच्या तुकड्यांचा चुरगाळा करण्यास शिकवावे. यासाठी मुलांना आधी सांगितल्याप्रमाणे तीन बोटांचा वापर करण्यास शिकवावे. मुलांना प्रयत्नांनंतर चुरगाळाकाम जमू लागते. यामुळे हाताच्या बोटांना चांगला व्यायाम मिळतो.

चिकटकाम

कार्डशीटवर चित्र काढून कागदाचे रंगीत तुकडे त्यावर अथवा व्यवसाय वहीवर चिकटवण्यास मुलांना शिकवावे. या रंगीत तुकड्यांतून मुलांना विविध रंगांचा परिचय होतो. हा विज्ञानाचा भाग आहे.

मणी ओवणे

वेगवेगळ्या रंगांचे मणी वायरमधे ओवायला देणे, हा देखील मुक्त व्यवसायातील एक उपक्रम आहे. मणी ओवताना मेंदू, हात आणि डोळे यांचा समन्वय साधला जातो, तसेच रंग परिचयही होतो. मुले हळूहळू वेगवेगळ्या रंगाचे मणी ओवताना रंगसंगती साधायला शिकतात. यातूनच मुलांचा कलात्मक विकास व्हायला सुरुवात होते.

मातीकाम

मातीकाम हा देखील मुक्त व्यवसायातील उपयुक्त उपक्रम आहे. यासाठी शक्यतो शाडू माती घ्यावी. ही माती पाण्यात भिजवून व्यवस्थित मळतात. मातीचे सुरुवातीला छोटे गोल गोळे मग दोरीसारखे लांब गोळे बनविण्यास शिकवावे. नंतर मुलं स्वतःच्या मनाने मातीचे वेगवेगळे आकार बनवतात. मातीकामामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते, मातीकामामुळे मुलांच्या कल्पकतेला चांगला वाव मिळतो. मातीकाम काम झाल्यावर मुलं हात धुऊन स्वच्छ करतात, याकडे विशेष लक्ष द्यावे.

हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रमाची रुपरेषा 

मनोरे लावणे

मुक्त व्यवसायातील हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे. या उपक्रमात गोल, चौकोनी आकाराचे लाकडी किंवा प्लास्टिकचे ठोकळे वापरून मनोरे तयार करण्यास शिकवतात. सर्वात मोठा ठोकळा खाली आणि नंतर आकारानुसार लहान ठोकळे वर अशा पद्धतीने ठोकळे लावताना सुरुवातीला मुलांचा गोंधळ होतो. पण नंतर सरावाने मुलांना मनोरे रचायला जमू लागते. मुले या उपक्रमात देखील मेंदू, बोटे आणि डोळे यांचा समन्वय साधण्यास शिकतात. तसेच, मुलांना विविध रंग आणि लहान मोठा आकार याबद्दल देखील कळू लागते.

अशा रितीने मुक्त व्यवसायातून शिशुगटातील मुलांच्या विशेष कौशल्याची प्रगती होण्यास सुरुवात होते.

पुढील लेखात आपण बालगटातील मुक्त व्यवसाय याबाबत जाणून घेणार आहोत.

क्रमश:

रश्मी परांजपे
रश्मी परांजपे
रश्मी परांजपे वय 65 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!