Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    March 31, 2026

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    ही वाट एकटीची…

    March 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ही वाट एकटीची…
    ललित

    ही वाट एकटीची…

    जितेंद्र अभ्यंकरBy जितेंद्र अभ्यंकरMarch 31, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, एका डॉक्टरची कहाणी, निसर्ग सोबती, निसर्गाची सोबत, निसर्गाचे देखणे रूप, निसर्गाशी जवळीक, निसर्गाशी आपलेपणा, निसर्गाशी मैत्री, निसर्गाशी मैत्रीचे नाते,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ती मेडिकलला शिकत होती. तिचा लहान भाऊ शाळेत जात होता. त्यांचं चौकोनी कुटुंब अशा महत्त्वाच्या वळणावर असतानाच काही कारणाने अकस्मात तिच्या वडिलांची नोकरी गेली. एके दिवशी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊन घरी परत आली. घरी आल्यावर ती दारात सॅंडल काढत असतानाच तिला दिसलं की, तिचे लाडके बाबा शून्य नजरेने आढ्याकडे बघत पलंगावर पडले होते आणि आई कोपऱ्यात बसून पदराने डोळे पुसत होती… आईने तिला गहिवरल्या आवाजात सांगितले की, ‘बाबांची नोकरी गेली.’ पण ती खचली नाही. ती खंबीरपणे बाबांच्या शेजारी बसली. त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली, “बाबा, आजपर्यंत तुम्ही मला जीवापाड सांभाळले. आता माझी पाळी आली आहे, मी दिवसरात्र एक करून शिक्षण घेत तुम्हाला आधार देईन. माझं शिक्षण पूर्ण करून मी खूप पैसे कमवून तुम्हाला सुखात ठेवीन. तुम्ही काळजी करू नका बाबा!” आपल्या कोवळ्या मुलीचं असं परिपक्व बोलणं ऐकून तिच्या बाबांना अक्षरशः गलबलून आलं. ते म्हणाले,”कुठे शिकलीस गं पोरी असं मोठ्या माणसासारखं बोलणं?”

    ती म्हणाली, “तुमचेच संस्कार आहेत बाबा. ही तुमचीच शिकवण आहे आणि परिस्थितीसुद्धा माणसाला खूप काही शिकवत असते.”

    मुलीच्या दिलासा देणाऱ्या बोलण्याने बाबांना एक नवी उमेद मिळाली. ते पलंगावरून उठून पायांत चपला सरकवून दुसरी नोकरी शोधायला बाहेर पडले. बराच वेळ वणवण फिरल्यावर त्यांना कमी पगाराची नोकरी मिळाली. पण तेवढ्या पगारात त्यांच्या कुटुंबाची खूप ओढाताण व्हायला लागली. वेळेचं महत्त्व ओळखून तिने कोचिंग क्लासेसमध्ये पेपर तपासणीसाठी जायला सुरुवात केली. काही काळाने तिने आईला हप्त्यावर शिलाई मशीन घेऊन दिले. आईसुद्धा थोडाफार संसाराला हातभार लावायला लागली. अशा प्रकारे संघर्ष करत तिचं शिक्षण सुरू होतं.

    हेही वाचा – कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…

    तिला आखाती देशांत जाऊन प्रचंड पैसा कमवायचा होता. ते तिचं स्वप्न होतं. त्यासाठी कितीही कष्ट करायची तिची तयारी होती. तिने रात्रंदिवस अभ्यास करत एम.डी.ची पदवी मिळवली. भारतात काही वर्षं अनुभव घेऊन तिने आखाती देशांत नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. एका रिक्रुटमेंट एजंटमार्फत तिला ओमानमध्ये जॉब मिळाला. रॉयल सल्तनत ऑफ ओमानच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये महिना तीन लाख रुपये पगार होता. तिचा आनंद गगनात मावेना. पण काही दिवसांतच तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. ओमानचा व्हिसा येत नव्हता. ती इकडं देव पाण्यात घालून बसली होती. या तगमगीच्या काळात तिची मैत्रिण तिला माझ्याकडे घेऊन आली. मी तिची जन्मपत्रिका बघून व्हिसा अंदाजे कधी येईल, ते सांगितलं. तिच्या जन्मलग्नकुंडलीतील बारावं स्थान अतिशय मजबूत होतं. त्यामुळे ती परदेशी जाणार हे जवळपास निश्चित होतं. मी दिलेल्या अंदाजाच्या आसपास तिचा व्हिसा आला. त्याबरोबर ओमानची राजधानी मस्कतच्या प्लेनचं तिकीटपण आलं. मग ती प्रचंड उत्साहाने आखाताकडे रवाना झाली. काही काळाने रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मला तिचा विसर पडला.

    साधारण एक वर्षाने तिचा मला मेसेज आला…

    ‘माझे कामाचे रूटिन व्यवस्थित चालू आहे. खूप पैसा मिळत आहे. पण कमालीच्या एकाकीपणाने मला ग्रासले आहे. इथे सोशल लाइफची वानवा आहे. कोणाचीही ओळख होणं दुरापास्तच आहे. इथली संस्कृती पूर्ण वेगळी आहे. महाराष्ट्र मंडळांचे कार्यक्रम असतात, ते नावापुरतेच आणि औपचारिक! त्यामुळे माझी घुसमट होत आहे. कामावरून घरी आल्यावर एकटेपणा अक्षरशः अंगावर येतो. सुट्टीच्या दिवशी तर वेड लागेल की, काय अशी अवस्था होते. इथे चहूबाजूला फक्त अफाट वाळवंट आहे. काय करू? प्लीज मला काहीतरी मार्ग सुचवा.’

    हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश!

    मी तिला रिप्लाय दिला…

    “येईल त्या सुट्टीच्या दिवशी लवकर बाहेर पड. थेट शहराबाहेरच्या रस्त्याला लाग. वाळवंट कापत जाणाऱ्या हायवेवरुन भरवेगात जायला खूप मजा येते. काही वेळ ही मजा लुटल्यावर तुला तो दिसेल. तो युगानुयुगे तुझी वाट पाहात वाळवंटात उभा आहे. तो तुला वाळवंटाचं सौंदर्य दाखवेल. भरारणाऱ्या वाऱ्याने वाळवंटात चितारलेल्या नैसर्गिक रांगोळ्या कशा बघायच्या ते शिकवेल. मृगजळामागं धावण्यात काय थ्रिल असतं, ते तो तुला सांगेल. मग मृगजळामागं धावून तुझी दमछाक झाल्यावर तो तुला कष्टाने साठवलेलं पाणी देईल. तेव्हा तुला पाण्याची आणि मैत्रीची किंमत कळेल. तो एकटा, एकाकी दिसत असला तरी निसर्ग त्याचा सखा आहे, हे तुझ्या लक्षात येईल…”

    “आपल्या प्रत्येकाचं असंच असतं. हे अफाट विश्वच आपलं सोबती असतं. आईवडील, नवरा- मुलं, मित्र- मैत्रिणी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपल्यासोबत असतात. तिथून पुढे आपण आणि हे विशाल ब्रम्हांड एवढंच उरतं. तेव्हा तू एकटी, एकाकी अजिबात नाहीस तर, निसर्गाचं प्रत्येक रूप तुझे सोबती आहे. निसर्गात, वाळवंटात रममाण हो. रात्री ताऱ्यांशी गुजगोष्टी कर. तुला एकटेपणा कधीच जाणवणार नाही.”

    रिप्लाय देऊन बरेच दिवस झाले. मी माझ्या उद्योगात रमून गेलो. जवळपास सहा महिन्यांनी माझ्या पत्त्यावर एक पार्सल आलं. मी उत्सुकतेने ते उघडलं. आत एक नितांतसुंदर असं कॅक्टसचं पेंटिंग होतं आणि खाली लिहिलं होतं…

    ” From Oman with Respect…”

    Avatar photo
    जितेंद्र अभ्यंकर

    नाव - जितेंद्र अभ्यंकर गाव - सोलापूर. व्यवसाय - Astrologer मोबाईल नंबर - 8605396156 व्हाॅटसअप नंबर - 8605396156 शिक्षण - इंजिनियर. वैशिष्ट्ये - संपूर्ण स्वतंत्र विचारसरणी , समस्येकडं बघण्याचा समतोल दृष्टिकोन. छंद - समाजमाध्यमांवर व्यक्त होणे व लेखन करणे.

    Related Posts

    इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    March 31, 2026 ललित

    न चुकलेली बस…

    March 30, 2026 ललित

    आमचे आबा आणि त्यांची कुंभकर्णी झोप…

    March 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    By दिलीप कजगांवकरMarch 31, 2026

    भाग – 1 “एक्सक्यूज मी मिस, तुम्ही तुमची पर्स सीटवरून उचलता का प्लीज?” राजने बसमध्ये…

    न चुकलेली बस…

    March 30, 2026

    आमचे आबा आणि त्यांची कुंभकर्णी झोप…

    March 30, 2026

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    March 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    March 31, 2026

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    ही वाट एकटीची…

    March 31, 2026

    Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    March 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 मार्च 2026

    March 31, 2026

    World Idli Day… इडलीकुमारीची कहाणी!

    March 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 253
    • अवांतर 180
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 368
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 188
    • मैत्रीण 17
    • ललित 522
    • शैक्षणिक 74

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    March 31, 2026

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    ही वाट एकटीची…

    March 31, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.