Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, March 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सखीचा मंद झालेला श्वास अन्…
    मैत्रीण

    सखीचा मंद झालेला श्वास अन्…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 9, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सखीशी मैत्री, सखुबाई मैत्रीण, सखी मैत्रीण, सखी आणि हर्षा, सखी हर्षा मैत्री, सखीची मुलगी, सखीशी ताटातूट, सखीशी दुरावा, सखी आयसीयू, सखी ICU,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    माझी एक मैत्रीण होती, सखी. मी तिला बरेचदा सखुबाई म्हणायचे. तशी ती तोंडात चांदीचा नाही तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली. सासर सुद्धा श्रीमंत. नवऱ्याचा मोठा उद्योग. एकुलती एक मुलगी. खूप शिकलेली. हुशार, सुंदर. तशी मी आणि सखी खूप उशिराने भेटलो. मैत्री व्हायला पण उशीरच झाला. सखीची मुलगी माझ्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठी. सखीला वयोमानाप्रमाणे विस्मरण व्हायला लागलं होतं. माझ्यावर खूप जीव तिचा. त्यामुळे तिची मुलगी तिला ब्लॅकमेल करायची… ‘तू जेवलीस तर, तुला हर्षाकडे घेऊन जाईन…’ ‘तू औषधं घेतलीस तर हर्षाला फोन लावून देईन…’ म्हणजे एवढ झालं की, सखी मला सगळ्यांच्या नकळत रात्री-अपरात्री फोन पण करायची. तिच्या लेकीला हे कळलं. ती आता माझ्यावर वैतागायला लागली…

    खरंतर यात माझी काही चूक नव्हती. ती स्वतः आपल्या आईला वेळ देऊ शकत नव्हती. सखी आता मला आई म्हणायला लागली होती. सखी तिच्या स्वतःच्या मुलीचं नाव विसरली. तिच्या आयुष्यात येणाऱ्या, तिला आवडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हर्षा म्हणायला लागली होती. एके दिवशी सखीची मुलगी खूप वैतागलेली होती. मी घरी परतायला निघाले तर, सखीने भोकाड पसरलं… झालं तिची लेक माझ्यावर भडकली अन् म्हणाली, “यापुढे तू आमच्या घरी येऊ नकोस.” भारीच अपमान झाला होता. मी गपगुमान पर्स उचलली आणि घरी जायला निघाले…

    हेही वाचा – Reel पुरत्या नव्हे, Real भावना नातेसंबंधांच्या…

    आता सखी अशा अवस्थेत पोहोचली होती की, ती स्वतः मला कॉल करू शकत नव्हती. तिच्या अटेंडन्टना सांगितलं गेलं होत की, मला कॉल लावून द्यायचा नाही. मी कॉल केल्यावर मला सांगितलं जायचं की, ‘मॅडम झोपल्यात…’ किंवा ‘मॅडमना खाली नेलंय…’ हळूहळू मी माझ्या मनाचा कप्पा सखीसाठी बंद करत गेले. हे असे काही करणं मला फार क्लेशदायक असतं. मी कॉल करणे, घरी जाणे बंद केले. मी माझ्या व्यापात अडकले… कधी कधी तिची आठवण यायची, अस्वस्थ वाटायचं. पण आता मनावर कंट्रोल यायला लागला होता.

    एक दिवस मी शूटला होते. ब्रेकमध्ये फोन चेक करताना मुलीचा miscall दिसला. मनात पाल चुकचुकली. ती मला सहजासहजी कॉल करणारी नव्हती. मी जरा टेन्शनमध्येच तिला कॉल केला. म्हटलं, “अगं सीन सुरू होता. तुझा miscall बघून कॉल केला. बोल तू कशी आहेस? माझी सखी कशी आहे?” ती पार रडवेली झाली होती… “आई सीरियस आहे. तिला भेटून जा प्लीज… तुझ्यात जीव अडकलाय नक्कीच, म्हणून तिची सुटका होत नाहीये.”

    एवढं होईपर्यंत या बाईने मला कळवले सुद्धा नाही. आईबद्दल प्रेम, दया, माया काहीच वाटत नसेल का?  मी हॉस्पिटलची वेळ विचारून घेतली. संध्याकाळी येते म्हणाले. माझं पॅकअप झालं होतं, मी आवरून घरी निघाले. सुन्न झाले होते. काही सुचत नव्हतं. सखीसोबतच्या आठवणी… आम्ही दोघींना मारलेल्या गप्पा… चहा, प्रेम, काळजी, तिचे हट्ट… सगळा सिनेमा डोळ्यासमोरून जात राहिला. घरी येऊन बॅग ठेवली. नवऱ्याला म्हटलं, “सखी सीरियस आहे. मी जाऊन येते.”

    हॉस्पिटल जवळ आलं, तसा मी तिला कॉल केला. तिने फोन घेतलाच नाही. मी विचारात पडले, ‘आता जर ही बया खाली नाही आली मला न्यायला तर, मी वर नाही जाऊ शकणार!’ मी हॉस्पिटलमध्ये शिरले. मोठाला वेटिंग हॉल ओलांडून लिफ्टपाशी आले. मोठी लाइन लागलेली. तिला कॉल केला. म्हटलं, लिफ्टसाठी माझा नंबर येईपर्यंत ती खाली येईल. नशिबाने तिने फोन घेतला, येते म्हणाली खाली.

    ती खाली आली आणि मला सोबतच वर घेऊन गेली, ICU मध्ये! सखी जवळपास बेशुद्धच होती. तिला खूप साऱ्या नळ्या लावलेल्या. विविध उपकरणं सुरू असल्याचे हलके आवाज येत होते. मी आतल्या आत ढासळले होते… मुलीचा खूप राग आलेला, माणसाने एवढं हट्टी, जळकं, कुसकं असू नये.

    मी विचारलं, “सखीला काय होतंय? डॉक्टर काय म्हणाले? घरी कधी पाठवणार?” तिने सांगायला सुरुवात केली. मम्मीला हार्ट अटॅक आला. ती जी बेशुद्ध झाली, ती शुद्धीवर आलीच नाही. एक आठवडा झाला, अशीच आहे, इथे. आज सकाळी डॉक्टर म्हणाले, तिच्या जवळच्या लोकांना बोलावून घ्या. तुझ्याशिवाय कोण आहे तिला जवळचं? तू एकटीच. मी सुद्धा नाही… आणि ती रडायला लागली. मी आधी तिला जवळ घेतलं. सावरायला.

    मग म्हणाले, “अगं हॉस्पिटलच्या जवळ आले, तेव्हा तुला कॉल केला होता, घेतला नाहीस. दोन-तीन मिनिटांत मी पोहोचले, त्यावेळी फोन केल्यावर कॉल घेतलास आणि खाली आलीस. वॉशरूममध्ये होतीस का?”

    ती माझ्याकडे बघत राहिली… काही क्षण. तिचे डोळे भरले होते. पुन्हा पुन्हा ती बोलत होती… “मी तुम्हा मैत्रिणींना वेगळं करायला नको होतं… हर्षा, तुझा पहिला कॉल आला तेव्हा मी ICU शेजारीच असलेल्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये होते. म्हणून कॉल घेतला नाही. डॉक्टर सांगत होते की, ‘ते round वर असताना मम्मी गेली. तुम्ही आणि स्टाफ मिळून पुढची प्रक्रिया करून घ्या.’ मी हरवलेच… काही सुचेना… तेवढ्यात ICUमधून कॉल आला की, ‘मम्मी आहे!’ मला उगीचच वाटलं की, तू हॉस्पिटलमध्ये आली असावीस आणि तुझा कॉल आला… मी मम्मीकडे न जाता सरळ तुझ्याकडे आले. चल लवकर, ती जाऊन परत आलीय, तुझ्यासाठीच… अक्षरशः धावत सुटलो आम्ही दोघीजणी. बीपीमध्ये कमाल घसरण झालेली. सखीला असे बघून मला गलबलून आलं. मी तिला हळूच हाक मारली… ‘सखी, मी आलेय… चल लवकर बरी हो… आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत…’ तिने हुंकार दिला. डॉक्टर खूश झाले. मी तिच्या डोक्यावरून, हाता-पायावरून हलकेच हात फिरवला. बीपी हळूहळू वाढायला लागलं. डॉक्टरांनी झटपट ट्रीटमेन्ट वाढवली.

    हेही वाचा – बाजूने बर्फाच्या लाद्या गेल्यासारखा थंडावा जाणवला!

    बराच वेळ मी ICUमध्ये वेड्यासारखी एकटीच बडबडत होते. ICUमधलं वातावरण बदललं होतं. डॉक्टर आणि तिने माझे आभार मानले… मला सकाळी लवकर शूटला निघायचं होतं. म्हणून मी हॉस्पिटलमधून निघाले.     दुसऱ्या दिवशी मी शूटला असताना मला मुलीचा कॉल आला… “हर्षा, तुझी सखी गेली… 4 वाजता अंत्ययात्रा आहे.”

    “काल तर तिची तब्येत सुधारत होती ना! ती लवकर घरी येणार होती… आम्हाला खूप गप्पा मारायच्या होत्या… ती अशी कशी फसवून जाऊ शकते!”

    तिने मला समजवायचा प्रयत्न केला. पण सगळ संपलं होतं. एपिसोड अर्जंट होता, त्यामुळे मी अंत्ययात्रेला जाऊ शकले नाही. बरंच झालं म्हणा मी नाही गेले! त्यामुळे माझ्या आठवणीत माझी सखी तशीच आहे, जशी आधी होती… ती मुळी कुठे गेलीच नाहीये!

    माझी सखी…

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026 मैत्रीण

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026 मैत्रीण

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    March 10, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    By दिलीप कजगांवकरMarch 24, 2026

    पहाटेचे साडेपाच वाजले होते. सूर्यनारायण अजून पूर्व क्षितिजावर अवतरला नव्हता; पण स्वयंपाकघरात आणि हॉलमध्ये मात्र…

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    March 10, 2026

    जागतिक महिला दिन विशेष… तिचे असणे, तिचे नसणे!

    March 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026

    कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…

    March 28, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनें गाये…

    March 28, 2026

    आहारात इंडिया ऑलवेज बेस्ट…

    March 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 250
    • अवांतर 177
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 364
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 187
    • मैत्रीण 17
    • ललित 517
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn