Sunday, February 15, 2026

banner 468x60

Homeआरोग्यओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

मागील लेखात नमूद केल्यानुसार आपण योगाभ्यासातील समाविष्ट विषयांच्या अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत या आणि पुढील लेखांत मार्गदर्शन घेणार आहोत. आता आपण ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेऊया.

ओंकार साधना म्हणजे काय?

सोप्या भाषेत ओंकार साधना म्हणजे ओंकार जप अथवा ओंकार अभ्यास म्हणता येईल. अर्थातच, यथायोग्य ठराविक वेळेस नियमितपणे तसेच सातत्य राखून ओंकार जप करणे, हे ओंकार साधनेत अभिप्रेत आहे. दैनंदिन योगाभ्यासाचा आरंभ त्रिवार ओंकाराने केला जातो आणि समाप्ती एकादश ओंकाराने केली जाते.

ओंकाराचे स्वरूप

अ + उ + म = ॐ म्हणजे ओम होय.

‘अ’ आणि ‘उ’ हे दोन स्वर आणि ‘म’ हे एक व्यंजन या तिन्हीच्या सलग उच्चारातून ‘ओम’ असा ध्वनी निर्माण होतो.

‘अ’कार म्हणजे ब्रह्मरूप – विश्वाचा निर्माता

‘उ’कार म्हणजे विष्णूरूप – विश्वाचा पालनकर्ता

‘म’कार म्हणजे महेशरूप – विश्वाचा संहारकर्ता

थोडक्यात, अ + उ + म = ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित रूप म्हणजे ॐकार होय. ॐ हे ईश्वराचे प्रतीक असून ओंकार जप करणे ही एक योग साधना आहे.

हेही वाचा – योगाभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

ॐकार कसा करावा?

ओंकार करण्यासाठी पद्मासन,  अर्धपद्मासन, वज्रासन अथवा सहजासन घेऊन दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करावी. ॐकार करताना अगोदर ‘अ’, नंतर ‘उ’ आणि त्यानंतर ‘म’ हे उच्चार जोडून म्हणायचे.

ॐ हा जप साधा, सरळ आणि सोपा असून त्याचे शारीरिक तथा मानसिक लाभ अनंत आहेत. आता आपण नियमित ओंकार साधनेचे मानसिक आरोग्य लाभ थोडक्यात जाणून घेणार आहोत.

ओंकार साधनेचे मानसिक आरोग्य लाभ

  • मानसिक ताणतणावांपासून मुक्ती मिळते.
  • मानसिक शांती आणि स्वास्थ्य लाभते.
  • शांत आणि स्वप्नविरहित झोप लागते.
  • मानसिक थकवा दूर होऊन उत्साह वाढतो.
  • ओंकार साधनेद्वारे मानसिक व्याधी-विकार दूर होण्यास साहाय्य मिळते.

हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य

ओंकार साधनेची महती

ॐकाराला बीजमंत्र म्हणजे मंत्रांचा मंत्र असे म्हटले जाते. प्रत्येक मंत्राची सुरुवात ॐकारानेच होते. ओंकार प्रार्थनेनुसार नियमित ओंकार साधना केल्याने योग साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात. ओंकार जपाची सविस्तर कृती तसेच नियमित ओंकार साधनेतून मिळणारे अनंत शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.

योगाभ्यासातील अशाच एका समाविष्ट विषयाच्या अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत आपण पुढील लेखात जाणून घेणार आहोत.


नम्र निवेदन

गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!