Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Homeopathy : रजोनिवृत्ती म्हणजे स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची संधी
    आरोग्य

    Homeopathy : रजोनिवृत्ती म्हणजे स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची संधी

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, Homeopathy, होमिओपॅथी, Menopause, रजोनिवृत्ती, मासिक पाळी थांबणे, शरीरातील हार्मोनल बदल, इस्ट्रोजेन हार्मोन्स, प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स, हाडे ठिसूळ होणे, कॅल्शियमची कतमतरता, रजोनिवृत्ती होमिओपॅथी, हार्मोन्सचा समतोल, मेनोपॉज होमिओपॅथी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. सारिका जोगळेकर

    होमिओपॅथिक तज्ज्ञ

    रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. साधारणपणे 45 ते 55 वर्षांच्या दरम्यान महिलांमध्ये menopause अर्थात रजोनिवृत्तीचा काळ येतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, त्यावेळी स्त्रीची मासिक पाळी कायमची थांबते. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे होणारी ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया, हा आजार नाही. सलग बारा महिने मासिक पाळी आली नाही म्हणजे menopause असे समजले जाते. 

    Menopause च्या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हार्मोन्सचे प्रमाण कमी होते. हे हार्मोन्स कमी झाल्यामुळे शरीरात आणि मनात अनेक बदल जाणवतात. प्रत्येक महिलेला वेगळी वेगळी लक्षणे जाणवू शकतात, काही सामान्य लक्षणे अशी आहेत – 

    • Hot flushes (गरम झटके -हातापायांची आग होते).
    • जास्त घाम येतो विशेषतः रात्री.
    • झोप लागत नाही. 
    • चिडचिड होते.
    • सतत चिंता वाटत राहते (Anxiety).
    • कधी अतिआनंद तर कधी अचानक दुःखी वाटते. (Mood swings).
    • सकाळपासून थकवा जाणवतो.
    • सांधेदुखी. 
    • स्मरणशक्तीवर परिणाम.
    • त्वचा आणि केस कोरडे होतात.

    रजोनिवृत्ती (menopause) हा आजार नसला तरी या काळामध्ये योग्य काळजी घेतली नाही तर, पुढे त्रास होऊ शकतो. या काळामध्ये Osteoporosis (हाडे ठिसूळ होणे) निर्माण होतो. स्त्रीच्या अंडाशयात निर्माण होणारा इस्ट्रोजेन या हार्मोनचे प्रमाण कमी होते. इस्ट्रोजेन हार्मोन आपल्या शरीरात कॅल्शियमचे शोषण करते, त्यामुळे ते हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते. Osteoporosis मध्ये कॅल्शियमच्या absorption वरती परिणाम झाल्यामुळे हाडांची झीज वाढते त्यामुळे कंबरदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होतो. शिवाय, इस्ट्रोजेन हृदयाचे संरक्षण करते त्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तदाब आणि हृदयाविकाराचा धोका वाढतो.

    हेही वाचा – Homeopathy : बदलती लाइफस्टाईल म्हणजे आजारांना निमंत्रण

    Menopause मध्ये शरीराचे चयापचय (metabolism) मंद होते, त्यामुळे वजन वाढत जाते. हार्मोनल बदलांमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडू शकते. कोरडेपणामुळे केस गळतात आणि त्वचेचं तेज कमी होऊन सुरकुत्या निर्माण व्हायला सुरुवात होते. 

    साधारण वयाच्या 35 ते 38 वर्षापासून काळजी घेतली गेली तर menopause चा त्रास खूप प्रमाणात कमी करता येतो. Menopause च्या दरम्यान शरीरामध्ये पोषक तत्वांची गरज जास्त असते आणि या काळामध्ये त्याचं absorption डिस्टर्ब होतं. Menopause च्या आधी पोषणयुक्त आहार घेऊन शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य प्रमाणात राखली गेली तर, त्याची कमतरता होणार नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ (दूध, दही, तीळ, हिरव्या पालेभाज्या), प्रथिने (Protein) भरपूर असलेले अन्न आहारामध्ये घ्या (अंडी, सोयाबीन, पनीर, राजमा आणि इतर कडधान्य). शरीरातील स्नायूंना मजबूत करण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात, त्याकडे आधीपासून लक्ष दिले गेले तर, सर्व सांध्यांच्या आजूबाजूचे स्नायू मजबूत होतील, आतल्या हाडांना आधार मिळेल आणि Osteoporosis टाळता येईल. जीवनसत्वे आणि खनिजे (vitamins and minerals) यामुळे इम्युनिटी आणि एनर्जी दोन्ही चांगले होते. ताजी फळे, भाज्या, ड्राय फ्रुट्स आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आपल्याला ते मिळते.

    Menopause मध्ये शेवटचे काही महिने पाळी अनियमित राहणे किंवा जास्त रक्तस्त्राव होणे हे सामान्य आहे. शरीरातील लोहाच्या पातळीवर लक्ष ठेवले गेले आणि हिमोग्लोबिनची पातळी राखली गेली तर, रक्तस्त्रावा संबंधित त्रास कमी होऊ शकतो. आहारातून शेंगदाणे, गुळ, उसाचा रस, पालेभाज्या, चिकन, मटन यामधून आपल्याला लोह मिळतं. लोह absorb चांगले होण्यासाठी सोबत एक लिंबाची फोड जरूर घ्या, त्यामुळे व्हिटॅमिन सी मिळेल.

    नियमित व्यायाम करा

    दररोज 30 मिनिटे चालणे, सायकलिंग, स्विमिंग किंवा योगा करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहील. शरीरातील इन्सुलिनच्या लेव्हलसुद्धा नियंत्रणात राहून नंतर झपाट्याने वजन वाढणार नाही. शांत झोप लागेल. व्यायामामुळे हाडे आणि स्नायू मजबूत राहण्यास मदत होईल. 

    मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या

    मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जसे शरीराला व्यायामाची गरज असते तशीच मनाला सुद्धा असते. मेनोपॉजमध्ये भावनिक अस्थिरता वाढते. आधीपासून त्याबद्दल आपण जागृत असलो आणि योग्य ती काळजी घेतली तर त्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. स्वतःसाठी वेळ काढा. कुटुंबीयांशी किंवा जवळच्या व्यक्तीशी नियमित संवाद साधा. आपल्याला आवडणारा एखादा छंद जोपासा. किमान पंधरा मिनिटं रोज meditation केलं तर त्याचे अगणित फायदे आहेत.

    शांत झोप आवश्यक

    पुरेशी आणि शांत झोप मिळणे हे कुठल्याही वयात अत्यंत गरजेचे असते. शांत झोप लागण्यासाठी आणि झोपेत सबकॉन्शियस मनामध्ये जे विचार येतात ते टाळण्यासाठी झोपण्याआधी किमान दोन तास मोबाइलचा वापर टाळा. कॅफिनचे सेवन कमी करा. धूम्रपान, मद्यपान यावर बंदी करा. झोपेच्या वेळा निसर्गाशी सुसंगत ठेवा. रात्री उशिरा झोपणं किंवा सकाळी उशिरा उठणं, हे दोन्हीही हार्मोन्ससाठी घातक असतं. 

    “हार्मोन्सचा समतोल, मनाचा दिलासा — होमिओपॅथीचा विश्वास” 

    मेनोपॉजसाठी होमिओपॅथीचे फायदे

    Menopause मुळे निर्माण होणाऱ्या सगळ्या लक्षणांवर होमिओपॅथिक औषधांनी आपण नैसर्गिकरित्या मात करू शकतो. शरीराच्या नैसर्गिक क्षमतेला चालना देऊन हार्मोन्सचे संतुलन राखण्यास होमिओपॅथी औषधे मदत करतात. प्रत्येक स्त्रीचा मेनोपॉज वेगळा असतो. प्रत्येक स्त्रीचा शारीरिक आणि मानसिक लक्षणांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक स्त्रीला वेगळे वैयक्तिक औषध दिले जाते. स्त्रीचे मानसिक आरोग्य, मूड स्विंग्स, झोप, ताणतणाव हाताळण्याची क्षमता तसेच त्यादरम्यान तिच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या सगळ्याकडे लक्ष देऊन होमिओपॅथिक औषधाची निवड केली जाते. होमिओपॅथीमुळे जसे हार्मोन्स संतुलित राहतात तसेच मन स्थिर राहते. मेनोपॉज म्हणजे त्रास सहन करण्याचा काळ नव्हे, तर स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची संधी आहे. होमिओपॅथीसारख्या नैसर्गिक उपचार पद्धतीमुळे या टप्प्यातील शारीरिक आणि मानसिक बदल सहज हाताळता येतात. योग्य मार्गदर्शन तसेच वैयक्तिक उपचारांनी मेनोपॉजचा काळ अधिक संतुलित आणि आनंददायी बनवता येतो.


    HOLISTIC HOMOEOCURE CLINIC

    ऋतू पार्क, ठाणे वेस्ट

    मोबाइल – 9890533941


    https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr

    https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 21, 2026 आरोग्य

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    By रविंद्र परांजपेMarch 21, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास, प्राणायामाची आवश्यकता आणि पूर्वतयारी, विविध प्रकार तसेच प्राणायामाचे आरोग्य…

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn