Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शाळेतील ज्युनिअर परमनंट झाले आणि संगीताचा राग अनावर झाला…
    ललित

    शाळेतील ज्युनिअर परमनंट झाले आणि संगीताचा राग अनावर झाला…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 20, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, संगीताच उद्वेग, संगीताचा संताप, संगीताला शाळेत डावलणे, शिक्षिका संगीता, शुभाची बेफिकिरी, शुभाचे सोशल मीडिया आकर्षण, शुभाची साधारण हुशारी, शुभाची स्वप्न
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दीपक तांबोळी

    “शुभा, ए शुभा, उठ लवकर… अगं किती वेळ झोपून रहाणार आहेस?” संगीता आपल्या लेकीला ओरडून म्हणाली.

    “झोपू दे ना आई. रात्री दोनपर्यंत मी झोपले नव्हते!”

    “माहितेय मला दोनपर्यंत तू काय केलं असशील ते! फेसबुक नाहीतर व्हॉटस्ॲप वर चॅटिंग या व्यतिरिक्त करतेस तरी काय तू? चल उठ लवकर. नऊ वाजलेत…”

    “तू ना बाई अशीच आहे. माहितेय माझ्या मैत्रिणी दहापर्यंत झोपलेल्या असतात!”

    “चांगल्या मुलींशी तर तू मैत्रीच नको करू. आपल्या कामवालीची मुलगी बघ. सगळं आवरून सकाळी सात वाजता आपल्याकडे हजर असते.”

    “ए बाई, नको लेक्चर देऊ सकाळी सकाळी… आणि कुणाचीही उदाहरणं नको देत जाऊस. उठते मी.”

    शुभा धुसफूस करतच उठली. बेड न आवरता, चादरी तशाच बेडवर फेकून ती ब्रश करायला गेली. संगीताने हताशपणे तिचा बेड आवरला.

    हा प्रसंग आता रोजचाच झाला होता. ग्रॅज्युएशन आटोपल्यानंतर एमपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी शुभा घरीच होती. म्हणायला ती क्लासेसला जायची, पण तिचं अभ्यासात लक्षच नव्हतं. सदोदित मोबाइल घेऊन व्हॉटस्ॲप नाहीतर फेसबुकवर तिचं चॅटिंग सुरू असायचं. त्याचा कंटाळा आला की, टीव्हीवरच्या सीरियल्स बघणं, हेच तिचं जीवन बनलं होतं. एकुलती एक मुलगी म्हणून तिला रवी आणि संगीताने मोठ्या लाडाने वाढवलं होतं. तिचा प्रत्येक हट्ट पुरवला होता. त्यावेळची परिस्थितीही उत्तम होती. रवी एका कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता. संगीता एम.एड. असूनही तिला त्याने नोकरी करू दिली नव्हती. तशी गरजही नव्हती. पण सुखाचे दिवस फिरायला वेळ लागत नाही…

    रवीच्या कंपनीत दोन राजकीय पक्षांच्या युनियन स्थापन झाल्या आणि संघर्षाला सुरुवात झाली. काम कमी आणि भानगडीच जास्त होऊ लागल्या. प्रॉडक्शन ठप्प झालं. पोलीस केसेस जास्त होऊ लागल्या. शेवटी कटकटींना कंटाळून मॅनेजमेंटने कंपनीच बंद केली. हजारो कामगार बेकार झाले. रवीसारखे इमानदार अधिकारीही त्यात भरडले गेले. युनियन लीडर्सनी कामगारांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळले आणि कोर्टात केसेस दाखल केल्या. पण कोर्टातील प्रकरणं गोगलगाईच्या गतीने पुढे सरकत असतात. कंपनी बंद होऊन दहा वर्षं होऊन गेली तरी, कोणताच निकाल लागला नव्हता आणि तो लवकर लागेल, अशी आशा सर्वांनी सोडून दिली होती.

    हेही वाचा – भीती… दोन चिमुरड्यांच्या मनातली!

    रवीला घरी बसावं लागलं, तशी संगीताने एका शाळेत नोकरी धरली. “काही महिने मोफत काम करा, मग पगार सुरू करू,” असं तिला सांगण्यात आलं. कधीतरी पगार सुरू होईल या आशेवर संगीता शाळेत शिकवत राहिली. रवीनेही खटपट करून एका सुपर शॉपीमध्ये मॅनेजरची नोकरी मिळवली, पण पगार अगदीच कमी होता. पाच वर्षांनंतर एका संचालकाच्या ओळखीने संगीताला महिना पाच हजार पगार सुरू झाला. त्यालाही आता पाच वर्षं होऊन गेली होती अजूनही ती परमनंट नव्हती.

    रवी नोकरीत असताना त्यांनी कर्ज घेऊन घर बांधलं होतं. त्याचे हप्ते अजून सुरू होते. दोघांच्या तुटपुंज्या पगारात संसार कसातरी सुरू होता. पण शुभाला त्यांनी कोणतीही कमतरता भासू दिली नव्हती. ती अकरावीत असतानाच तिला त्यांनी महागडा मोबाइल आणि लॅपटॉप घेऊन दिला होता. आपली मुलगी मॉडर्न टेक्नॉलॉजीत मागे पडायला नको आणि तिच्या मित्रमैत्रिणीत तिचं हसं व्हायला नको, हा त्यामागचा शुद्ध हेतू होता. पण सोशल मीडियात वावरण्याव्यतिरीक्त शुभाने या टेक्नॉलॉजीचा कोणताही चांगला वापर केला नव्हता. बारावीत ती कशीबशी पास झाली होती. बी.एस्सीतही तिला चांगले मार्क्स नव्हते. आता एमपीएससी करायचं खुळ तिच्या डोक्यात कुणीतरी भरवलं होतं, पण अभ्यास करण्याऐवजी दिवसरात्र ती मोबाइल नाहीतर लॅपटॉप घेऊन पडलेली असायची. संगीताला ती कोणत्याच कामात मदत करायची तर नाहीच, उलट संगीतालाच ती आपल्या तालावर नाचवायची. त्यामुळे परवडत नसतानाही संगीताला धुण्याभांड्यासाठी बाई लावावी लागली होती. शुभाचं वागणंही अतिशय उर्मटपणाचं होतं. त्याबद्दल आई-वडिलांनी तिला अनेकदा समजावून सांगितलं, पण तिच्या डोक्यात काही फरक पडला नव्हता.

    या एप्रिलमध्ये संगीताच्या शाळेतले दोन शिक्षक निवृत्त होणार होते. त्यांच्या जागी संगीताची वर्णी लागण्याची शक्यता होती. कारण टेंपररी शिक्षकांत तीच सीनियर होती. अपेक्षेप्रमाणे एक दिवस तिच्या ओळखीच्या संचालकांनी तिला बोलावून घेतलं.

    हेही वाचा – भीती… लेक तन्वीचं वक्तव्य ऐकून शैलेश चमकला!

    “मॅडम अभिनंदन. कालच संचालक मंडळाची मीटिंग झाली आणि तुम्हाला परमनंट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय!”

    संचालक प्रफुल्लित चेहऱ्याने तिला सांगत होते. संगीताच्या आनंदाला पारावार उरला नाही. दहा वर्षांच्या मेहनतीचं फळ आज मिळणार होतं.

    “खूप खूप धन्यवाद सर.”

    “पण तुम्हाला माहीत आहे आजकाल फुकट काही मिळत नाही. मॅनेजमेंटने 11 लाखांची डिमांड केली आहे.”

    संगीताचं उडणारं विमान एकदम जमिनीवर कोसळलं.

    “काय्य… अकरा लाख? सर, मी इतके पैसे कुठून आणू? आणि सर तुम्हाला माहीत आहे, मी पाच वर्षे अगदी फुकट शिकवलंय. नंतरची पाच वर्षंही मी अक्षरशः पाच हजारांत काम केलंय. या महागाईच्या दिवसात काय होतंय पाच हजारांत?”

    “मॅडम, तो विचार करूनच मी मॅनेजमेंटला पैसे कमी करायला सांगितले. ते तर सोळा लाख मागत होते आणि तुम्हाला कल्पना नसेल सोळा लाख देणारेही आहेत आपल्या स्टाफमध्ये! देणारे आहेत म्हणून तर मॅनेजमेंटचं फावतंय. तेव्हा ही संधी चुकवू नका. पुढे परमनंट व्हायला तुम्हाला किती वर्ष लागतील सांगता येत नाही.”

    संगीताच्या डोळ्यात पाणी आलं.

    “सर थोडे थोडे करून दिले तर चालतील?”

    संचालकांनी खांदे उडवले

    “सॉरी मॅडम. त्याकरिता तुम्हाला चेअरमन साहेबांना भेटावं लागेल…”

    चेअरमनचं नाव ऐकताच संगीता शहारली. चेअरमन एक नंबरचा स्त्रीलंपट माणूस होता. त्याची नजर अतिशय घाणेरडी होती. तिने त्याचे लंपटपणाचे अनेक किस्से ऐकले तर होतेच, पण त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तिच्यासह इतर शिक्षिकांसोबत त्याने केलेली शारीरिक लगट ती विसरली नव्हती. डोळ्यात आलेले अश्रू तिने कसेबसे आवरले.

    “सर, मी तुम्हांला तीन-चार दिवसांत कळवते.”

    “लवकरात लवकर कळवा म्हणजे आम्हाला तसा निर्णय घेता येईल.”

    तिने मान डोलावली.

    घरी येऊन तिने रवीशी चर्चा केली. पण दोघांना कोणताच मार्ग दिसत नव्हता. आधीच घराचं कर्ज  होतं. त्यामुळे नवीन कर्ज मिळणं कठीण होतं. इतके पैसे देऊ शकतील, असे नातेवाईकही नव्हते आणि असते तरी कुणाच्या उत्कर्षावर जळणारे पैसे थोडीच देतात! त्यात दोघांनाही असं लाच देऊन काम करून घेणं पसंत नव्हतं. पण संगीताला शाळेचं वातावरणही माहीत होतं. साठ-सत्तर हजार पगार घेणारे पण मॅनेजमेंटच्या मर्जीतले शिक्षक शाळेत शिकवण्याऐवजी संचालकांची घरगुती कामं करण्यातच दिवस वाया घालवत. मॅनेजमेंटने त्यांना  दिवसभर बाहेर उंडरायला मोकळीक दिली होती. ते आपल्या मर्जीने शाळेत येत, मर्जीने बाहेर निघून जात. त्यांना अडवायची हेडमास्तरांनांही हिम्मत व्हायची नाही. विशेष म्हणजे, मोठमोठे पुरस्कार अशाच शिक्षकांना मिळत होते. या शिक्षकांचा सिलॅबस पूर्ण करायची जबाबदारी टेंपररी शिक्षकांवर येऊन पडायची. अवास्तव कामांचा प्रचंड भारही याच शिक्षकांवर असायचा. दुपारी बारा वाजता शाळा सुटल्यावरही संगीताला अशा कामांसाठी तीनचार वाजेपर्यंत थांबावं लागायचं. घरी येतानाही एखाद्या प्रोजेक्टच काम तिला सोबत आणावं लागायचं. एवढ्याशा पगारात कामाचा हा प्रचंड ताण सहन करणं संगीताच्या जीवावर यायचं. पण मॅनेजमेंटची खप्पा मर्जी होऊन आपल्याला परमनंट होण्याची संधी नाकारली जाऊ नये, याकरिता ती सगळं सहन करत होती. अशा परिस्थितीत हाती आलेली संधी गमावणं परवडणारं नव्हतं.

    प्रयत्न करूनही अकरा लाखाची व्यवस्था होऊ न शकल्याने सात दिवस संगीताने संचालकांना काहीच कळवलं नाही. शेवटी पुढच्या आठवड्यात नको ती बातमी आलीच. प्रत्येकी सोळा लाख घेऊन मँनेजमेंटने तिच्यापेक्षा कितीतरी ज्युनिअर असलेल्या शिक्षकांना परमनंट केलं होतं.

    हेही वाचा – बदलत्या जीवनशैलीने निर्माण केलेली भीती!

    संताप, अपमान आणि दुःख यांची धगधग मनात घेऊन संगीता घरी परतली. घराचं दार सताड उघडं होतं. सोफ्यावर एक कुत्रं झोपलं होतं. सगळीकडे पसाराच पसारा होता. तिने कुत्र्याला हाकललं. शुभाला हाक मारली. कुठलाच प्रतिसाद आला नाही. ती तावातावाने शुभाच्या खोलीत आली. शुभा कानाला हेडफोन लावून मोबाइल बघत बसली होती. संगीताने तिला परत दोन-तीन हाका मारल्या, पण तिने उत्तर दिलं नाही. संतापून संगीता तिच्याजवळ गेली. तिच्या कानावरचे हेडफोन तिने खेचून काढले. हातातला मोबाईल हिसकावला आणि जमीनीवर जोराने आपटला. त्याचे तुकडे तुकडे झाले. मग तिने शुभाला हाताला धरुन उठवलं आणि संतापून तिला मारू लागली. शुभाला आई एवढी का संतापलीय, ते कळेना. मारता मारता संगीताच्या तोंडाचा पट्टा सुरुच होता…

    “नालायक… जेव्हा पहावं तेव्हा हातात मोबाइल. आईला काय त्रास होतोय, बापाला काय त्रास होतोय… काही समजत नाही तुला! आम्ही इकडे मरमर राबायचं आणि तुला अभ्यास करायचा सोडून ही थेरं सुचताहेत नाही का?”

    शुभा रडायला लागली, पण तिच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून संगीता तिला मारत राहिली. हातातल्या बांगड्या फुटल्या, तेव्हाच संगीता थांबली. तिची नजर खाली पार्ट न पार्ट वेगळ्या झालेल्या मोबाइलवर पडली. संतापून तिने पायाने तो अजूनच चिरडून टाकला आणि मग रडत रडत ती स्वतःच्या बेडरूममध्ये गेली. बेडवर पडून ती ढसाढसा रडू लागली.

    थोड्यावेळाने संतापाचा पूर वाहून गेल्यावर ती शांत झाली. शुभाच्या खोलीचा तिने अंदाज घेतला. एक भयावह शांतता होती. अचानक एका अनामिक भीतीने तिला घेरलं. थोड्याथोड्या कारणांनी आत्महत्या करणारी मुलं तिला आठवली. “आईशी भांडण झालं म्हणून तरुण मुलीने आत्महत्या केली…” अशा वर्तमानपत्रातल्या हेडलाईन्स तिच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या.

    “बापरे, हे काय करून बसलो आपण! एका तरण्याताठ्या पोरीला मारलं! तिने काही जीवाचं बरंवाईट करून घेतलं तर?”

    जीवाच्या आकांताने ती उठली. शुभाच्या खोलीत धावत गेली. शुभाला बेडवर मुसमुसतांना पाहून तिचा जीव भांड्यात पडला…

    क्रमश:

    मोबाइल – 9209763049


    (ही कथा काल्पनिक असून माझ्या ‘हा खेळ भावनांचा’ या पुस्तकातील आहे. माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा.)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026 ललित

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026 ललित

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    By प्रणाली मंगेश महाशब्देApril 10, 2026

    “ए आई कसला मस्त वास येतोय गं भाजीचा!” कालच माहेरी आलेली मीना स्वयंपाकघरात आली. “ए…

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 546
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Most Popular

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.