Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’… ध्येयनिष्ठा हाच स्वर्ग!

    October 18, 2026

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, October 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’… ध्येयनिष्ठा हाच स्वर्ग!
    ललित

    Bookshelf : ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’… ध्येयनिष्ठा हाच स्वर्ग!

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारOctober 18, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता हवालदार, डॉ अस्मिता हवालदार, Bookshelf, लेखक रिचर्ड बाख, अनुवाद बाबा भांड, जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल, समुद्रपक्षी जोनाथन, जोनाथन सीगल, ध्येयवेडा जोनाथन, ध्येयाशी एकरूपता,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रिचर्ड बाख यांचे ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ हे पुस्तक म्हणजे एका सीगलची, समुद्र पक्षाची कहाणी आहे. अनुवाद बाबा भांड यांनी केला असून पुस्तक लहानसं आहे आणि पुन्हा त्यात चित्र आहेत. त्यामुळे मजकूर कमी आहे. हे (अजूनही) अत्यंत लोकप्रिय पुस्तक आहे. मी  कॉलेजमध्ये असताना एका प्राध्यापकांनी या पुस्तकाचा उल्लेख केलेला आठवतो. त्यानंतर मी हे पुस्तक वाचले. अचंबित करणारी प्रेरणादायक कहाणी आहे.

    ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ हे एका समुद्रपक्षाचे नाव आहे. याला उंच उडण्याचं, भरारी घेण्याचं वेड असतं. इतर सीगलसारखे फक्त भक्ष्य मिळवण्यासाठी उडणे, त्याला पसंद नव्हते. त्याच्या पालकांना ही गोष्ट खटकत होती. अनेकदा त्यांनी रागावून पाहिले, पण जोनाथनने प्रयत्न सोडले नाहीत. त्याला जातीबाहेर करण्यात आले तरी, तो आपला हट्ट पुरा करत राहिला. कधी निराशेचे क्षण आले, प्रयत्न सोडून द्यावासा वाटला… पण पुन्हा मनाने उभारी घेतली. त्याने वेग वाढवायला सुरुवात केली. ताशी सत्तर मैलाचा वेग वाढवत दोनशे मैलांपर्यंत नेला… ऊंच उडण्याचा प्रयत्न केला.

    पाण्यात वेगाने सूर मारला, तर खोलवर जाता येते आणि पौष्टिक मासे पकडता येतात, हे त्याला समजले. नंतर दोन पक्षी त्याला भेटायला आले आणि वेगळ्या मितीत म्हणजे स्वर्गात घेऊन गेले. फारच कमी पक्षी इथपर्यंत पोहोचू शकतात, असे त्यांनी सांगितले. तिथे त्याला गुरू चियांग भेटले आणि गुरूबंधू सलीवन. सलीवनने त्याला शिकवायला सुरुवात केली. स्वर्गात पोहोचल्यावर त्याचा मुळचा राखाडी रंग गेला आणि पांढरा शुभ्र झाला. गुरूंचे कौशल्य पाहून तो चकित झाला. पंखांची पिसे वळवून वेग वाढवता येतो… वळता येते… क्षणार्धात दूर उडता येते… ही कौशल्य तो शिकला.

    हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी

    गुरूंना त्याने विचारले – हा स्वर्ग आहे, तरी इथे मर्यादा, बंधने का आहेत? त्यावेळी गुरूंनी त्याला सांगितले की, जेव्हा आपण आवडीचे क्षेत्र निवडतो, त्यात सर्वोच्च कौशल्य मिळवतो… तो स्वर्ग असतो. ध्येयनिष्ठा हा स्वर्ग असतो. काळ आणि मितीच्या पलीकडे जाऊन अनंताशी किंवा पूर्णत्वाशी एकरूप होता येणे, हाच स्वर्ग असतो.

    नंतर त्याला परत आपल्या घरी जाण्याची ओढ लागली. आपल्या भाऊबंदांना जीवनाचा अर्थ समजावून सांगायला हवा… केवळ पोट भरण्यासाठी जगायचे नसते… आपल्या क्षमतांचा वापर करायचा असतो, हे शिकवायला हवे… असे त्याला वाटू लागले. परत आल्यावर त्याच्यासारखा प्रयत्न करणारा सीगल फ्लेचर त्याला दिसला. त्यालाही जातीबाहेर केले होते. जोनाथनने आपले कौशल्य दाखवल्यावर फ्लेचरला त्याच्याकडे शिकावेसे वाटू लागले. जोनाथनने त्याला शिकवले. फ्लेचर आणि जोनाथनने सर्व सीगल समोर त्यांच्या अद्भुत कौशल्याचे प्रात्यक्षिक दाखवल्यावर इतर काही सीगलना सुद्धा शिकावेसे वाटू लागले. एका अपंग पक्ष्याला सुद्धा उडायला शिकवले. त्यामुळे त्याच्याकडे काही दैवी शक्ती आहे, असे इतरांना वाटू लागले.

    वरवर पाहता ही साधीसुधी कहाणी वाटते, पण तिचा खोल गर्भितार्थ आहे. ध्येयाशी एकरूपता मिळवली की, शरीराचेही भान उरत नाही. अनंताशी तद्रूप होता येते. स्थलकाल कुठलीच मिती उरत नाही… अशी अवस्था येते की, ध्येयाशी असलेली एकरूपता मृत्यूही हिरावून घेऊ शकत नाही.

    चियांगचे शरीर शेवटी पारदर्शक होत अनंतात विलीन होते, त्याआधी तो जोनाथनला सांगतो, सर्वांवर प्रेम करायला शिक. जोनाथन त्याला बहिष्कृत करणाऱ्यांचा सुद्धा तिरस्कार करत नाही. फ्लेचर मृत झाल्यावर वरच्या मितीत जातो. तिथे जोनाथनचा आवाज ऐकतो, सर्व मिती ओलांडून पुन्हा शरीर मिळतं. इतर सीगल त्याला पुन्हा जिवंत झालेले पाहतात. ‘अनादी मी अनंत मी अवध्य मी भला’ हेच त्याला सांगायचे असते. शरीर नश्वर आहे, आकांक्षा अनंत आहेत. शरीर केवळ विचार आहे, सीगलचे स्वातंत्र्य अमर्याद आहे. त्याला शरीराचेही बंधन नाही!

    हेही वाचा – एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!

    शांताबाई शेळकेंची ‘मनीषा’ नावाची कविता आहे…

    सहज मिळे त्यांत जीव तृप्तता न पावे,
    जें सुदूर, जें असाध्य, तेथें मन धांवे !

    जोनाथनच्या या कथेतून लेखकाने याच मनीषाचे वर्णन केले आहे. प्रत्येकाच्या मनात एक जोनाथन दडून बदलेला असतो, फक्त त्याला जागे करावे लागते… तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनाला अर्थ प्राप्त होतो. हे अप्रतिम पुस्तक वाचायला हवे आणि मुलांना वाचायला द्यायला हवे. त्यांच्यातल्या जोनाथनची त्यांना ओळख करून द्यायला हवी.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    आशू आणि अधीर

    October 17, 2026 ललित

    तुमचं गाव कोणतं?

    October 17, 2026 ललित

    दसरा, सरस्वती पूजन, रावणदहन आणि आपण…!

    October 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आशू आणि अधीर

    By प्रदीप केळुस्करOctober 17, 2026

    पूर्वार्ध ऑफिसमधून कविता बाहेर पडली. आपल्या कायनेटीकवर बसता बसता मनात म्हणाली… या महिन्यात तरी ते…

    तुमचं गाव कोणतं?

    October 17, 2026

    दसरा, सरस्वती पूजन, रावणदहन आणि आपण…!

    October 17, 2026

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’… ध्येयनिष्ठा हाच स्वर्ग!

    October 18, 2026

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026

    Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    October 18, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें

    October 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 474
    • अवांतर 217
    • आरोग्य 161
    • पंचांग आणि भविष्य 635
    • फिल्मी 74
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 1000
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’… ध्येयनिष्ठा हाच स्वर्ग!

    October 18, 2026

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.