Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा…

    April 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    अपयश… चुकीच्या स्पर्धेतले!

    April 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : कोठा साफ असणे
    आरोग्य

    निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : कोठा साफ असणे

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेNovember 8, 20251 Comment3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, निरामय आरोग्य, मलविसर्जन, मूत्रविसर्जन, मलमूत्र विसर्जन, साफ कोठा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिनचर्येतील लवकर उठणे, ठराविक वेळेस आहार सेवन करणे, लवकर झोपी जाणे आणि सुखनिद्रेचा आनंद आणि लाभ घेणे, याबाबत सविस्तर तपशील आपण मागील लेखांमध्ये जाणून घेतले. या लेखात आपण मलविसर्जन (कोठा साफ असणे) या विषयासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत.

    वास्तविक, शौच म्हणजे मलविसर्जन करणे, ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि म्हणूनच यात काय जाणून घ्यायचे, असे वरकरणी वाटू शकते. परंतु आपण नेहमी अनुभवत असलेल्या एका साध्या गोष्टीवरून या विषयाचे महत्त्व नक्कीच लक्षात येईल. आपली प्रकृती बिघडल्यावर आपण जेव्हा डॉक्टर/वैद्य यांच्याकडे जातो, तेव्हा डॉक्टर/वैद्य एक साधा प्रश्न नेहमी विचारतात, तो म्हणजे ‘पोट नियमित साफ होतं का?’ पोटाचे विकार असले तर हा प्रश्न साहजिक आहे. पण बरेचदा इतर आजारांत देखील असा प्रश्न विचारला जातो. यावरून  शौच/मलविसर्जन या विषयाचे महत्त्व खरोखरच अधोरेखित होते.

    आजच्या धकाधकीतील बदललेल्या जीवनशैलीत बहुतांश लोकांच्या बाबतीत वेळ मिळेल तसा मलविसर्जन हा विधी उरकण्याकडे अधिक कल दिसून येतो. आपले शरीर मलविसर्जनाची सूचना देत असते, परंतु काही कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष केले जाते, परिणामी मलविसर्जन नैसर्गिक रहात नाही. ही बाब क्षुल्लक समजली जाते आणि नकळत लागलेल्या या वाईट सवयीचे आरोग्यावर घातक दुष्परिणाम होतात.

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सुखनिद्रेसाठी निवडक उपयुक्त उपाय

    मलविसर्जनाविषयी थोडक्यात…

    या विषयी इथे थोडक्यात शास्त्रीय माहिती घेणे यथार्थ होईल.

    अन्नावाटे शरीरात घेतलेल्या पदार्थांचे पचनसंस्थेत पचन होते आणि त्यानंतर उरलेला टाकाऊ भाग म्हणजे मल होय. मल हे तीन प्रकारचे आहेत – पुरीष, मूत्र आणि स्वेद. मल मोठ्या आतड्यातून मलाशयात येतो. त्यावेळेस मेंदूकडे संवेदना जाऊन मलप्रवृत्ती निर्माण होते. काही कारणास्तव मलविसर्जन न झाल्यास अधिक मल मलाशयात येऊन पुन्हा तसा संदेश मेंदूकडे जाऊन मलप्रवृत्ती निर्माण होते आणि गुदद्वारातून मलविसर्जन होते.

    तद्वतच मूत्रपिंडात तयार झालेले मूत्र एकत्रित होऊन मूत्रवाहक नलिकेतून मूत्राशयात सोडले जाते. ठराविक प्रमाणात मूत्र साठल्यानंतर तसा संदेश मेंदूकडे जाऊन मूत्रविसर्जनाची भावना होते. मूत्राशयापासून मुत्रोत्सर्जक नलिकेमार्फत मूत्रविसर्जन होते.

    सोप्या भाषेत मलमूत्र विसर्जनाबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण मलविसर्जनाची योग्य वेळ याबाबत जाणून घेऊयात.

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सकाळी लवकर उठावे

    मलविसर्जनाची योग्य वेळ

    सकाळी सहा वाजेपर्यंत वाताचा काळ असल्याने नैसर्गिक मलप्रवृत्ती होऊन मलविसर्जन झाल्यास दिवसभर हलके आणि उत्साही वाटते.

    आता आपण मलविसर्जनाविषयी इतर महत्त्वाचे निवडक मुद्द्यांवर मार्गदर्शन घेऊयात.

    मलविसर्जन : महत्त्वाचे निवडक मुद्दे

    • मलमूत्र हे शरीराचे वेग असून त्यांना रोखले तर विविध शारीरिक समस्यांना आयतेच आमंत्रण मिळेल. त्यामुळे मलमूत्र विसर्जनाचे संकेत आले की, त्यांची पूर्तता त्वरित करावी.
    • सकाळी उठल्यावर पेलाभर कोमट पाणी प्यावे. प्रकृतीनुसार पाण्यात लिंबाचा रस घालणे लाभदायक आहे. यामुळे शौचाला साफ होऊन पोटाचे आरोग्य चांगले राहते.
    • पोट साफ होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात तूप घालून प्यावे.
    • शौचासाठी भारतीय पद्धतीचा संडास वापरावा. परंतु कमोड वापरणे गरजेचे असल्यास कमोडसमोर छोटे स्टूल घेऊन दोन्ही पाय त्यावर ठेवावेत. मलविसर्जन व्यवस्थित होण्यासाठी असे करणे हितकारक आहे.
    • पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर, शरीरातील सर्व मल बाहेर न पडता शरीरात साठतो. अशा मलाचा प्रकोप होऊन प्रकुपित मल शरीरात व्याधी उत्पन्न करतो. म्हणूनच व्यवस्थित अन्नपचन आणि नियमित मलविसर्जन यांचे दिनचर्येत महत्त्व आहे.

    याबाबतीत एक महत्त्वाची बाब सदैव लक्षात ठेवावी ती म्हणजे – ‘ज्याचे पोटाचे आरोग्य चांगले तो आरोग्याचा राजा होय.’

    म्हणूनच निरामय आरोग्यासाठी मलविसर्जनाच्या नियमित वेळेचे पालन करणे नितांत आवश्यक आहे.

    या संदर्भात आवर्जून सांगायचे झाल्यास – निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या आहार-विहार आणि मानसिक आरोग्य या पुस्तकांत ‘आरोग्यदायी विहार’ आणि ‘निसर्गसुसंगत दिनचर्या’ या विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

    क्रमशः

    Avatar photo
    रविंद्र परांजपे

    लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774

    Related Posts

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026 आरोग्य

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026 आरोग्य

    टेंन्डो एकियालीस आणि ए. सी. एल.

    April 3, 2026 आरोग्य

    1 Comment

    1. Ankita on November 19, 2025 5:29 pm

      Thank you for this post nice information

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरApril 8, 2026

    ओपीडीत एक जोडपं बच्चू घेऊन आलं होतं… “कान खाजते, चिडचिड करते, खोकते…” त्यांनी तक्रारी सांगितल्या.…

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026

    टेंन्डो एकियालीस आणि ए. सी. एल.

    April 3, 2026

    Ayurveda : वसंत ऋतूत आळस आणि जडपणा

    April 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा…

    April 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    अपयश… चुकीच्या स्पर्धेतले!

    April 8, 2026

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    April 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 262
    • अवांतर 180
    • आरोग्य 98
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 378
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 541
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा…

    April 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    अपयश… चुकीच्या स्पर्धेतले!

    April 8, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा…

    April 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.