Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    महालक्ष्मी सरस… ग्रामीण जिद्दीची अनोखी गाथा!

    March 27, 2026

    घरासमोरची रांगोळी आणि बरेच काही…

    March 27, 2026

    आराध्याविरोधात निशा अन् माधवने कट रचला, पण…

    March 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, March 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 27, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥11॥

    म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो । एक मीवांचूनि वावो । येर मानिलें जिहीं ॥141॥ तयां तत्त्वज्ञां चोखटां । दिवी पोतासाची सुभटा । मग मीचि होऊनि दिवटा । पुढां पुढां चालें ॥142॥ अज्ञानाचिये राती- । माजीं तयाचि मिळणी दाटती । ते नाशूनि घालीं परौती । करीं नित्योदयो ॥143॥ ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें । बोलिलें जेथ पुरुषोत्तमें । तेथ अर्जुन मनोधर्में । निवालों म्हणतसे ॥144॥ अहो जी अवधारा । भला केरु फेडिला संसारा । जाहलों जननीजठरजोहरा- । वेगळा प्रभू ॥145॥ जी जन्मलेपण आपुलें । हें आजि मियां डोळां देखिलें । जीवित हातां चढलें । मज आवडतसे ॥146॥ आजि आयुष्या उजवण जाहली । माझिया दैवा दशा उदयली । जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि मुखें ॥147॥ आतां येणें वचनतेजाकारें । फिटलें आंतील बाहेरील आंधारें । म्हणोनि देखतसें साचोकारें । स्वरूप तुझें ॥148॥

    अर्जुन उवाच : – परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।  पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥12॥

    तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूतां विसंवतें धाम । पवित्र तूं परम । जगन्नाथा ॥149॥ तूं परम दैवत तिहीं देवां । तूं पुरुष जी पंचविसावा । दिव्य तूं प्रकृतिभावा- । पैलीकडील ॥150॥ अनादिसिद्ध तूं स्वामी । जो नाकळिजसी जन्मधर्मीं । तो तूं हें आम्ही । जाणितलें आतां ॥151॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें

    अर्थ

    केवळ त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरिता, त्यांच्या अंत:करणात राहून प्रकाशमान अशा ज्ञानरूपी दिव्याने अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या (त्यांच्या) मोहरूपी अंधकाराचा नाश करतो. ॥11॥

    म्हणून मी जो आत्मा, त्याविषयींची अखंड प्रेमवृत्ती, ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केले आहे, ज्यांनी एक माझ्यावाचून बाकीचे सर्व फोलकट मानिले आहे, ॥141॥ अर्जुना, त्या शुद्धतत्वज्ञ प्रेमळ भक्तांच्या पुढे (ज्ञानरूपी) कापराची मशाल धरणारा मशालजी मीच होऊन त्यांच्या पुढे पुढे चालतो. ॥142॥ अज्ञानाच्या रात्रीमध्ये (त्या भक्तांपुढे) दाट काळोख येऊन मिळाला असता, त्या अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून तिला पलीकडे सारतो आणि ज्ञानाचा नित्य उदय करतो. ॥143॥ याप्रमाणे प्रेमळ भक्तांना अतिशय प्रिय असणारा पुरुषोत्तम जेव्हा बोलला, तेव्हा अर्जुन म्हणाला, ‘माझे मन शांत झाले.’ ॥144॥ अहो महाराज ऐका. (माझा) जन्ममरणरूप कचरा तुम्ही चांगला नाहीसा केला. यामुळे देवा, मी आईच्या पोटातील अग्निकुंडापासून (पोटात जन्म घेण्याच्या त्रासापासून) मुक्त झालो. ॥145॥ महाराज, मी आपला जन्म हा आज डोळ्यांनी पाहिला (आत्मज्ञान होणे हा नवा जन्म आहे आणि तो माझा आज झाला). त्यामुळे माझे जीवित माझ्या हाती आले. असे मला वाटते. ॥146॥ आज माझ्या आयुष्याची सफलता झाली आणि माझ्या दैवाला चांगले दिवस उगवले. कारण की, देवाच्या मुखाने उपदेशरूपी कृपा प्राप्त झाली. ॥147॥ आता या तुझ्या वाक्यरूपी प्रकाशाने आतील अंधार (स्वत:ला आत्मरूप न समजता जीवस्वरूप समजणे, हे अज्ञान) आणि बाहेरील अंधार (प्रपंचाला ब्रह्मरूप न पाहता प्रपंच पाहणे, हे अज्ञान) हे सर्व नाहीसे झाले. म्हणून तुझे स्वरूप यथार्थपणे मी पाहात आहे. ॥148॥

    अर्जुन म्हणाला, तू परब्रह्म, महाभूतांचे श्रेष्ठ विश्रांतीस्थान आणि अत्यंत पवित्र आहेस. अनादिसिद्ध आणि दिव्य असा (प्रकृती पलीकडील) पुरुष, सर्व देवांनाही दैवत असलेला देव, जन्मरहित आणि सर्वव्यापी तू आहेस. ॥12॥

    अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा, या पंचमहाभूतांच्या विश्रांतीचे ठिकाण असलेले जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म, ते तू आहेस. हे जगन्नाथा, तू अतिशय पवित्र आहेस. ॥149॥ देवा, तू ब्रह्मादी तिन्ही देवांचे श्रेष्ठ असे आराध्य दैवत आहेस, तू चोवीस तत्वांपलीकडील पंचविसावे तत्व आहेस. तू अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थांपलीकडील आहेस. ॥150॥ हे नाथ तू नित्यसिद्ध आहेस आणि जन्मादिक धर्मांचा अंमल तुझ्यावर चालत नाही, असा तू आहेस; हे आम्हाला आता समजून आले. ॥151॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    By Team AvaantarMarch 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।   ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते…

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    महालक्ष्मी सरस… ग्रामीण जिद्दीची अनोखी गाथा!

    March 27, 2026

    घरासमोरची रांगोळी आणि बरेच काही…

    March 27, 2026

    आराध्याविरोधात निशा अन् माधवने कट रचला, पण…

    March 27, 2026

    Dnyaneshwari : जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें…

    March 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मार्च 2026

    March 27, 2026

    Ayurveda : आहारातील चुका, वसंत ऋतूत काय खाणे टाळावे?

    March 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 249
    • अवांतर 177
    • आरोग्य 92
    • पंचांग आणि भविष्य 363
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 186
    • मैत्रीण 17
    • ललित 515
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn