Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा…

    Team AvaantarBy Team AvaantarApril 2, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    तरि तुवां पुसलिया विभूती । तयांचें अपारपण सुभद्रापती । ज्या माझियाचि परि माझिये मती । आकळती ना ॥209॥ आंगींचिया रोम किती । जयाचिया तयासि न गणवती । तैसिया माझिया विभूती । असंख्य मज ॥210॥ एऱ्हवीं तरी मी कैसा केवढा । म्हणोनि आपणपयाही नव्हेचि फुडा । यालागीं प्रधाना जिया रूढा । तिया विभूती आइकें ॥211॥ जिया जाणितलियासाठीं । आघविया जाणितलिया होती किरीटी । जैसें बीज आलिया मुठीं । तरूचि आला होय ॥212॥ कां उद्यान हाता चढिलें । तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें । तेवीं देखिलिया जिया देखवलें । विश्व सकळ ॥213॥ एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा । पैं गगना ऐसिया अपारा । मजमाजीं लपणें ॥214॥

    अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः । अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥20॥

    आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका । मी आत्मा असें एकैका । भूतमात्राचां ठायीं ॥215॥ आंतुलीकडे मीचि यांचा अंतःकरणीं । भूताबाहेरी माझीच गंवसणी । आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि ॥216॥ जैसें मेघां या तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी । आणि आकाशींचि जाले अवधारीं । असणेंही आकाशीं ॥217॥ पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती । तेवीं आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी ॥218॥ ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतियोगें जाण । तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक ॥219॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    अर्थ

    अर्जुना, तू माझ्या विभूती विचारल्यास, त्या इतक्या असंख्य आहेत की, त्या जरी माझ्या आहेत, तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत. ॥209॥ आपल्या अंगावर किती केस आहेत, हे ज्याचे त्याला मोजता येत नाहीत, त्याचप्रमाणे माझ्याच विभूती असून मला त्यांची गणना मला होत नाही. ॥210॥ खरोखर मी कसा आणि केवढा आहे, हे माझे मला देखील पक्के ठाऊक नाही, म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूती आहेत, त्या ऐक. ॥211॥ अर्जुना, ज्या विभूती समजल्या असता बाकीच्या सर्व जाणल्या सारख्या होतील, ज्याप्रमाणे बी हातात आले असता झाडच ताब्यात आल्याप्रमाणे होते, ॥212॥ किंवा बगीचा ताब्यात आला असता, फळांची आणि फुलांची प्राप्ती सहजच होते, त्याप्रमाणे त्या विभूतींचा विचार केला असता सर्व विश्व विचारात घेतल्याचे श्रेय येते. ॥213॥ एरवी अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत नाही. अमर्याद अशा आकाशालाही माझ्यात लपून बसता येते. ॥214॥

    हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंत:करणामध्ये असलेला आत्मा आहे. मीच सर्व भूतांचा आदि, मध्य आणि अंतही आहे. ॥20॥

    मस्तकावर कुरळे केस शोभणार्‍या आणि धनुर्विद्येत शंकरासारख्या निष्णात असणार्‍या अर्जुना, ऐक. प्रत्येक प्राणिमात्राच्या ठिकाणी जो आत्मा आहे, तो मी आहे. ॥215॥ आतल्या बाजूने मीच यांच्या अंत:करणात आहे. भूतांच्या बाहेरही माझेच आवरण आहे. प्रारंभी आणि शेवटी मी आहे आणि मध्यंतरी देखील मीच आहे. ॥216॥ ज्याप्रमाणे या मेघांना खाली, वर, आत, बाहेर सर्वत्र एक आकाशच आहे आणि ऐक, ते मेघ आकाशातच उत्पन्न झालेल आहेत आणि ते राहतातही आकाशातच. ॥217॥ शेवटी ज्यावेळेला त्यांचा लय होतो, त्यावेळेला ते आकाशरूपच होऊन राहतात, त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला, राहाण्याला आणि नाशाला मीच आश्रय आहे. ॥218॥ असे हे माझे अनेकत्व आणि व्यापकत्व तू विभूतीयोगाने जाण. तर आता जीवच (अंतःकरण) कानरूप करून ऐकलेलेच ऐक. ॥219॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…

    April 1, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    March 31, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    By Team AvaantarApril 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें तुजप्रती । सांगेन म्हणितलें तुज…

    Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…

    April 1, 2026

    Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    March 31, 2026

    Dnyaneshwari : जरी थोरी तुझी पाहत आहों…

    March 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026

    Ayurveda : वसंत ऋतूत आळस आणि जडपणा

    April 2, 2026

    जातीभेदापलीकडचे आप्पा अन् अलीकडचा रवीदादा!

    April 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 256
    • अवांतर 179
    • आरोग्य 95
    • पंचांग आणि भविष्य 372
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 190
    • मैत्रीण 17
    • ललित 530
    • शैक्षणिक 75

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026
    Most Popular

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.