Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari :  महदादि देहांतें, इयें अशेषेंही भूतें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari :  महदादि देहांतें, इयें अशेषेंही भूतें…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 6, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय नववा

    एऱ्हवीं मी तरी कैसा । मुखाप्रतिं भानु कां जैसा । कहीं नसे न दिसे ऐसा । वाणीचा नव्हें ॥63॥

    मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ॥4॥

    माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें । हे जगचि नोहे आघवें । जैसें दूध मुरालें स्वभावें । तरि तेंचि दहीं ॥64॥ कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु । तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥65॥ हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें । तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ॥66॥ महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें । परि माझां ठायीं बिंबते । जैसें जळीं फेण ॥67॥ परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पंडुसुता । नातरी स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥68॥ तैसीं भूतें इयें माझां ठायीं । बिंबती तयामाजि मी नाहीं । इया उपपत्ती तुज पाहीं । सांगितलिया मागां ॥69॥ म्हणऊनि बोलिलिया बोलाचा आतिसो । न कीजे यालागीं हें असो । तरी मजआंत पैसो । दिठि तुझी ॥70॥

    न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् । भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥5॥

    आमचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहों । तरी मजमाजि भूतें हेंही वावो । जे मी सर्व म्हणउनि ॥71॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : मुडाहूनि बीज काढिलें, मग निर्वाळलिये भूमी पेरिलें…

    अर्थ

    तसे पाहिले तर मी कसा (सुलभ) आहे? तर तोंडासमोर जसा सूर्य आहे तसा मी सर्वांना सदा समोर आहे. पण तो सूर्य केव्हा (रात्री) नसतो म्हणून दिसत नाही आणि केव्हा केव्हा (दिवसा) दिसत नाही, असा त्याच्यात कमीपणा आहे, तसा कमीपणा माझ्यात नाही. ॥63॥

    अव्यक्त रुपाने मी हे सर्व व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. ॥4॥

    माझा विस्तार म्हणजेच (हे) जग नाही काय? (तर होय, माझाच विस्तार आहे). ते कसे? तर, जसे दूध विरजले असता तेच स्वभावत: दही होते. ॥64॥ अथवा बीजच झाड झाले किंवा सोनेच अलंकार बनले, त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्या एकाचाच विस्तार आहे. ॥65॥ हे अव्यक्तपणाने थिजलेले (संकुचित) असते, तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते (पसरते). या रीतीने अव्यक्त रूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पावतो, असे समज. ॥66॥ पाण्यावर जसा फेस भासतो, त्याप्रमाणे महत्-तत्वापासून देहापर्यंत ही सर्वही भूते माझ्या ठिकाणी भासतात. ॥67॥ अर्जुना, पण या फेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नातील अनेकपण जसे जागे झाल्यावर नसते. ॥68॥ त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी जरी भासली तरी पण त्यामध्ये मी नाही. हा विचार तुला आम्ही मागे (अध्याय 7वा, श्लोक 12 मध्ये) सांगितला (आहे), तो लक्षात आण. ॥69॥ एवढ्याकरिता बोललेल्याच गोष्टींचा (पुनरुक्ती करून) पाल्हाळ करू नये. म्हणून हे बोलणे राहू दे. तर, माझ्या स्वरूपात तुझी दृष्टी प्रवेश करो. ॥70॥

    (कल्पना टाकून पाहू लागलास तर) सर्व भूते माझ्या ठिकाणीही नाहीत, असा हा माझा ऐश्वर्ययोग आहे, तो पाहा. (तसेच) भूतांना धारण करणारे, तथापि (अलिप्त असल्याने) भूतांच्या ठिकाणी स्थित नसलेले आणि ज्याच्या ठिकाणी भूतांची कल्पना केली जाते, अशा प्रकारचे माझे स्वरूप आहे. ॥5॥

    मायेच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्धस्वरूप परिस्थिती, ती जर तू कल्पना टाकून पाहशील तर, हे (सर्व) प्राणी माझ्या ठिकाणी आहेत, हे म्हणणे देखील व्यर्थ आहे. कारण सर्व मीच आहे म्हणून. ॥71॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : पाहें पां दूध पवित्र आणि गोड, पासीं त्वचेचिया पदराआड…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    By Team AvaantarMarch 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।   ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते…

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    March 26, 2026

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 248
    • अवांतर 175
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 362
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 513
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn