Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : जें गगनाहून जुनें, जें परमाणुहूनि सानें
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जें गगनाहून जुनें, जें परमाणुहूनि सानें

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय आठवा

    कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद् य: । सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥9॥

    जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें । जें आघवेंचि आघवेपणें । देखत असे ॥86॥ जें गगनाहून जुनें । जें परमाणुहूनि सानें । जयाचेनि संन्निधानें । विश्व चळे ॥87॥ जें सर्वांतें यया विये । सर्व जेणें जिये । हेतु जया बिहे । अचिंत्य जें ॥88॥ देखें वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर जेथ न सरे । जें देहाचें आंधारें । चर्मचक्षूसीं ॥89॥ सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचें जयासी । आडनांव नाहीं ॥90॥

    प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव । भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥10॥

    तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्ते । जो स्थिरावलेनि चित्तें । जाणोनि स्मरे ॥91॥ बाहेरी पद्मासन रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि । जीवीं सुख सूनि । कर्मयोगाचें ॥92॥ आंतु मीनलेनि मनोधर्मे । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें । आपेंआप संभ्रमें । मिळावया ॥93॥ आकळलेनि योगें । मध्यमामध्यमार्गे । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ॥94॥ तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु । तेथ प्राणु गगनाआंतु । संचरे कां ॥95॥ परी मनाचेनि स्थैर्यें धरिला । भक्तीचिया भावना भरला । योगबळें आवरला । सज्ज होउनी ॥96॥ तो जडाजडातें विरवितु । भ्रूलतामाजीं रचतु । जैसा घंटानाद लयस्थु । घंटेसीच होय ॥97॥ कां झांकलिये घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां । या रीती जो पांडवा । देह ठेवी ॥98॥ तो केवळ परब्रह्म । जया परमपुरूष ऐसें नाम । तें माझें निजधाम । होऊनि ठाके ॥99॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : पैं अथावीं घट बुडाला, तो आंतबाहेरी उदकें भरला…

    अर्थ

    सर्वज्ञ, पुरातन, (विश्वाचा) नियंता, अणुपेक्षा (देखील) लहान, सर्व (स्थूलसूक्ष्म जगाचा) आश्रय, ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे, सूर्याप्रमाणे (प्रकशरूप असे) ज्याचे स्वरूप आहे असा, (अज्ञानरूप) अंधकाराच्या पलीकडे असलेला जो (परम पुरुष), त्याचे जो सतत स्मरण करतो, ॥9॥

    ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे आणि जे जन्ममृत्यूरहित असून, जे सर्वत्र असल्यामुळॆ सर्वपणाने पाहाते ॥86॥ जे आकाशाहून पुरातन आहे आणि जे परमाणूपेक्षाही लहान असून ज्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते ॥87॥ जे या सर्वांना प्रसवते आणि ज्याच्या योगाने सर्व असते, तर्क ज्याला भीतो, असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे ॥88॥ पाहा, विस्तवास जशी वाळवी लागत नाही, ज्या स्वरूपप्रकाशाच्या ठिकाणी (अज्ञानरूप) अंधाराचा लाग लागत नाही, त्याचप्रमाणे जो स्वभावत: ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूल दृष्टीला अंधार आहे, ॥89॥ (जो स्वरूपदिवस अज्ञान्यांना अंधाराप्रमाणे असतो, ते या ओवीत सांगतात.) जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे, जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे आणि ज्या चैतन्यरूप दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा नाही (जेथे अस्त होत नाही). ॥90॥

    (जो) मरणसमयी एकाग्र मनाने, भक्तीने आणि योगबलाने युक्त होऊन, दोन भुवयांच्यामध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून (त्याचे स्मरण करतो) तो त्या तेजस्वी परम पुरुषाप्रत जातो. ॥10॥

    मरणकाळ प्राप्त झाला असताना, स्थिर अंत:करणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला, जो जाणून स्मरतो, ॥91॥  बाहेर पद्मासन घालून, उत्तरेकडे तोंड करून बसून, कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंत:करणात साठवून ॥92॥ आत मन एकाग्र झाल्याने आणि आत्मस्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरिता ॥93॥ स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने, सुषुम्ना नाडीच्या मध्यममार्गाने, अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास तो प्राण निघतो ॥94॥ जेथे प्राणवायू मूर्ध्निआकाशात प्रवेश करतो, तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो ॥95॥ परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला आणि भक्तीच्या भावाने भरलेला तसेच योगबलाने आवरलेला असा तयार होऊन ॥96॥ तो प्राणवायू चेतन आणि अचेतन पदार्थांस नाहीसे करून भुवयांत संचार करतो (आणि तेथे लय पावतो). ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेत लय पावतो. ॥97॥ अथवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला (विझला) हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो, ॥98॥ जे केवल परब्रह्म आहे आणि ज्याला परमपुरुष हे नाव आहे, असे माझे खास स्वरूप आहे, ते तो पुरुष होऊन राहतो. ॥99॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari :  जें नानागती पावतें, तें चित्त वरील आत्मयातें…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    By Team AvaantarMarch 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।   ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते…

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    March 26, 2026

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 248
    • अवांतर 175
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 362
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 513
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn