Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…
    ललित

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    रेवती निलेश पांडेBy रेवती निलेश पांडेMarch 25, 2026Updated:March 25, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, रेल्वे प्रवासातील दाम्पत्य, रेल्वेतील आजोबा आजी, संवादाचा सेतू, दाम्पत्यातील संवाद, पती पत्नीतील संवाद, संवादाचे महत्त्व, पत्नीला समजून घेणे, पती पत्नीतील अंडरस्टँडिंग,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दोन महिन्यांपूर्वी एकटीने रेल्वेने प्रवास करण्याचा योग आला. प्रवास बराच लांबचा होता. मला ‘साइड अप्पर’ सीट मिळाली होती, त्यामुळे मी, हातातील पुस्तक आणि मधेच येणारा चहा अशी आमची तिघांची मस्त मैफल जमली होती…

    माझ्या समोरच्या उजवीकडच्या लोअर बर्थवर एक स्त्री आणि डावीकडच्या लोअर बर्थ वर एक पुरुष असे दोघं बसले होते. सुरुवातीला त्यांच्या नात्याचा अंदाज आला नाही, पण थोड्या वेळाने चित्र स्पष्ट झाले. तो माणूस एका स्टेशनवरून पेपर घेऊन चेहऱ्यासमोर धरून बसला होता. ती स्त्री मात्र घरच्या काही तक्रारी, जावेबद्दल किंवा नणंदेबद्दल काहीतरी सांगत होती. तिचे बोलणे अतिशय सौम्य शब्दांत होते, पण तो पुरुष साधं ‘हं’ म्हणण्याची तसदीही घेत नव्हता. ती बराच वेळ बोलत राहिली आणि नंतर खिडकीबाहेर पाहू लागली. तिच्या डोळ्यांत पाणी आल्याचा भास मला झाला. तो माणूस पेपर वाचून झाल्यावर दुपारी शांतपणे झोपूनही गेला. ती स्त्री मात्र तशीच खिडकीकडे बघत बसून राहिली.

    त्यानंतर एका स्टेशनवर एक वयस्कर जोडपे माझ्या खालच्या सीटवर आले. दिवस असल्यामुळे ते दोघेही ‘साइड लोअर’वर छान गप्पा मारत बसले होते. त्यांच्यातला संवाद बघण्यासारखा होता. मधेच चहावाला आला, तेव्हा आजोबांनी कॉफी विचारली. कॉफी नव्हती, तेव्हा आजी म्हणाल्या, “मी चहा घेत नाही, पण तुम्ही तर घ्या.” त्यावर आजोबा प्रेमळपणे म्हणाले, “काही हरकत नाही, आपण दोघे नंतर कॉफीच घेऊ.” खिडकीत पाहणारी ती पहिली स्त्री हे सर्व कौतुकाने बघत होती.

    हेही वाचा – आदर्श बनण्याच्या ओझ्याखाली दबला आयुष्याचा आनंद!

    जेवणाची वेळ झाली, तेव्हा तो झोपलेला माणूस उठला. त्या स्त्रीने डबा काढून त्याला जेवायला वाढले. तो गपचूप जेवला आणि तिने एकटीनेच पुन्हा सगळे डबे आवरून ठेवले. मला आता पुस्तकापेक्षा या वास्तवातील पात्रांत जास्त रस वाटत होता. थोड्या वेळाने खालचे वयस्कर जोडपे जेवू लागले. आजोबा आजींना म्हणत होते, “आज भाजी खूप छान झालीये.” नंतर ते आजोबा मलाही आपुलकीने म्हणाले, “मुली, तू काही आणलं नसेल तर, आमच्या डब्यातले जेव. माझी बायको खूप छान स्वयंपाक करते, एकदा खाऊन बघ!”

    खिडकीत बघणारी ती स्त्री हे सर्व शांतपणे ऐकत होती. किती छोटी गोष्ट, पण किती मोठा फरक! दोन्ही जोडप्यांमध्ये एकाच गोष्टीचा फरक होता, तो म्हणजे ‘संवाद’. खिडकीकडे पाहणाऱ्या स्त्रीच्या नवऱ्याला तिच्याबद्दल भावना नसतील असे नाही, पण त्याला त्या व्यक्त करता येत नव्हत्या. याउलट, खाली बसलेल्या आजोबांना आपल्या भावना शब्दांत मांडता येत होत्या.

    प्रवास रेल्वेचा असो किंवा आयुष्याचा, जोडीदारासोबत योग्य संवाद असेल तर दोन्ही प्रवास फार सुखकर होतात. तसे बघता स्त्रियांच्या तुलनेत पुरुष कमी व्यक्त होताना दिसतात, त्यांना त्यांची त्यांची मनोवैज्ञानिक, जैविक आणि सामाजिक कारणे आहेत. हे जरी खरं असलं तरी, स्त्रियांची जशी सामाजिक कामे बदलली, तसेच स्त्रियांनी स्वतःला बदललं; त्यांचे कपडे, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचे विचार करण्याची पद्धत इथपर्यंत त्यांनी स्वतःला बदललं, मग पुरुष स्वतःमध्ये हा छोटासा बदल का नाही करून घेऊ शकत?

    हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश!

    योग्य शब्दांत व्यक्त होणे म्हणजे खूप बडबड करणे असे नाही, परंतु आपल्या हक्काच्या स्त्रीला भावनिक एकटेपणा जाणवू नये, तिने स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगू नये आणि तिच्या प्रत्येक बोलण्यात आपल्याला रस आहे, तिच्या आयुष्यात ज्या अनेक समस्या येतात त्या मला जाणवतात, हे दाखवण्यासाठी तरी त्याने थोडासा संवाद साधायला हवा. संवादाचा सेतू नसलेले जोडपे दोन समांतर रेषांसारखे वाटतात, ज्यांची एकमेकांना सोबत तर असतेच, पण त्या एकमेकांना कधीच भेटू शकत नाहीत.

    नवल म्हणजे व्यक्तींचे दोन प्रकार :

    1. ज्यांच्या मनात असतं, पण ते कधीच बोलू शकत नाहीत.
    2. ज्यांच्या मनात काहीच नसतं, ते फक्त बोलतात, बाकी त्यांचं मन साफ असतं.

    खरोखर बऱ्याचदा पुरुष या दोन कॅटेगिरीमध्येच आपल्याला बसलेले दिसतात. मला वाटतं, यांचं मुख्य कारण म्हणजे, आधीपासून ‘पुरुष हा कणखरच असायला हवा’ असं त्यांच्या मनावर सारखं बिंबवलं गेलं आहे. पण जे वाटतं ते व्यक्त होणे म्हणजे दुबळेपणा नसून ते एक कौशल्य आहे, असं म्हणायला सुरुवात करायला हवी.


    अंतर

    ऐलतीरावर मी
    तू पैलतीरावर दूर
    उरात माझ्या असंख्य
    प्रश्नांचे काहूर
    तुझ्या माझ्या कवितेला
    कायम मौनाचं अस्तर
    कसा व्हावा संवाद
    तू मोघम मी सविस्तर

    Avatar photo
    रेवती निलेश पांडे

    विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399

    Related Posts

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026 ललित

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026 ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरMarch 25, 2026

    पायाला काच लागल्यानं टीटी इंजेक्शन घ्यायला आलेला एक इसम अत्यंत कावला होता… “ट्रे तुटला तेव्हा…

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 247
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 361
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 511
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn