Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
प्रणाली वैद्य भाग – 7 रात्रीच्या स्वप्नांमुळे तिघे मात्र विचारात पडले… श्लोक मनातून घाबरलाच होता… पुन्हा असं का दिसावं, असा प्रश्न शौनकला पडला… तर शाल्मली विचारात पडली की, तो राजवाडा, ती खोली अन् त्या लाल वस्त्रात असं काय असावं, जे आपल्यासमोर स्वप्नातून दाखवलं गेलं… शाल्मलीने आपलं स्वप्न बाबांना सांगितलं. ते ही विचारात पडले. “आज जेव्हा देवदत्तला भेटू, तेव्हा मात्र तू हे सर्व त्याच्या कानावर घाल,” असे ते म्हणाले. शाल्मली आणि विश्वासराव वेळेतच घरातून निघाले. निघण्यापूर्वी शाल्मलीने शौनकला कॉल केला, तेव्हा तो आणि श्लोक त्याच्या घरातून निघतच होते… “आम्ही वेळेच्या आतच पोहचतो तेथे…,” असं म्हणून शौनकने फोन ठेवला. डॉक्टर देवदत्त यांनी…
आराधना जोशी साहित्य विशेष आहार माहिती : शाकाहारी पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी सुक्या लाल मिरच्या – 12 ते 15 (कमी तिखट खाणाऱ्यांनी मिरच्या अजून कमी केल्या तरी चालतील) सालं काढलेल्या लसूण पाकळ्या – 15 ते 20 (पाकळीच्या आकारानुसार घ्या) जिरे – दीड टीस्पून तेल – फोडणी पुरते (साधारणपणे 1 टेबलस्पून) मीठ – चवीनुसार पाणी – अर्धा ते पाऊण लीटर तयारीस लागणारा वेळ : लसूण पाकळ्या सोलून ठेचून घेण्यासाठी – 5 मिनिटे सुक्या मिरचीचे तुकडे करून त्यातील बिया बाजूला करण्यासाठी – 5 मिनिटे एकूण वेळ – 10 मिनिटे हेही वाचा – Recipe : देवीसाठी त्रयोदशगुणी विडा (तांबूल) कृती कढईमध्ये तेल गरम करून…
माधवी जोशी माहुलकर भाग – 2 मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ताडोबाच्या जंगलाने पहिल्याच भेटीत आमच्या मनावर गारुड केलं होतं. त्यामुळे चंद्रपुरला कोणी पाव्हणे आले की, आमची ताडोबा भेट ही नक्की ठरलेली असायची. ताडोबाच्या जंगलाचा एरिया हा जवळपास 625 कि.मी. स्क्वेअर एवढा पसरलेला आहे. ताडोबा अंधारी हा महाराष्ट्र राज्यातील एक नंबरचा व्याघ्र प्रकल्प आहे. जैवविविधतेच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असे हे जंगल आहे. ऐन, खैर, सागवान, हिरडा, बेहडा अशा अनेक औषधीयुक्त वनस्पतींनी परिपूर्ण असे वन आहे, पण मुख्यत्वेकरून बांबूची झाडे या जंगलात मोठ्या प्रमाणावर आहेत. या जंगलात फुलपाखरांच्या विविध जाती आहेत… यासुद्धा माझ्या पाहण्यात आल्या. जंगलातील उंच मचाणावर वाघ पाहायला बसलो असताना वाघ तर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा हें चैतन्याचे शेजारीं । वसती ज्ञानाचां एका हारीं । म्हणोनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥256॥ हें जळेंवीण बुडविती । आगीवीण जाळिती । न बोलता कवळिती । प्राणियांतें ॥257॥ हे शस्त्रेंवीण साधिती । दोरेंवीण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनि ॥258॥ चिखलेंवीण रोंविती । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगे न होती । आंतौटेपणें ॥259॥ धूमेनाऽव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च । येथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥38॥ जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 ऑक्टोबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 11 आश्विन शके 1947; तिथि : एकादशी 18:32; नक्षत्र : श्रवण 09:33 योग : धृति 21:45; करण : वणिज 06:57, बव 29:56 सूर्य : कन्या; चंद्र : मकर 21:26; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:27 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 पाशांकुशा एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – वाहने काळजीपूर्वक चालवा. कोणाकडूनही कोणत्याही कारणाने पैसे उधार घेऊ नका. शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. काही प्रमाणात…
यश:श्री हत्ती या अजस्त्र प्राण्याबद्दल अबालवृद्धांच्या मनात कुतूहल असते. विविध भाषिक चित्रपटांमध्येही ते पाहायला मिळाले आहेत. या प्राण्याला माणसावळतात आणि त्याचा वापर मोठमोठे ओंडके वाहून नेणे किंवा मिरवणुकीसाठी केला जातो. काही काळापूर्वी तो सर्कशीमध्येही दिसायचा, मात्र प्राणीमित्रांच्या पुढाकाराने सर्कशीत प्राण्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. वस्तुत: भारतीय संस्कृतीत हत्ती हे भरभराटीचे, ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच पूर्वी राजे-महाराजांचा राज्यातील फेरफटका हत्तीवरील अंबारीत बसून असायचा. या हत्तीला सजवण्यातही येत असे. त्याच्या पाठीवरील झुली देखील नक्षीदार आणि आकर्षक रंगाच्या होत्या. एखाद्या धार्मिक उत्सवाच्या वेळी हत्तीची जेव्हा मिरवणूक काढण्यात येते, तेव्हा त्याला सजविण्यात येते. त्यामध्ये त्याच्या पाठीवरील अंबारीचाही समावेश असतो. हत्तीच्या पाठीवर जरीची…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – अर्धा किलो चिंच अर्धा लीटर पाण्यात दोन तास भिजवून तिचा कोळ (गर) काढावा. पीठ चाळावयाच्या प्लॅस्टिकच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या चाळणीतून गर छानून घ्यावा. त्यात दोन मोठे चमचे मीठ आणि अर्धा कप व्हिनिगर घालून उकळावे. दाट झाल्यावर गार करून छोट्या बाटल्यांत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. जरुरीच्या वेळी आवश्यक तेवढे चटकन वापरता येते. रोजच्या जेवणात चिंचेचा उपयोग करताना रोज गोळा भिजवून कोळ काढायचा त्रास वाचतो. याच मिश्रणात गूळ, तिखट, चार-पाच लवंगा, सात-आठ मिरीचे दाणे आणि दालचिनीचे दोन तुकडे घालून…
ॲड. कृष्णा पाटील दुपारची वेळ… टळटळीत ऊन पडलेलं… घामानं अंग आंबल्यालं असतं… वारा गप्पगार असतो… झाडाचं पानही हालत नाही…. गरमीने सगळ्यांची घालमेल चाललेली असते. कडक उन्हामुळे दुपारपासून शेतातली औतं बंद असतात. तापलेल्या सूर्याचा गोळा डोक्यावर आल्यावर शेतीची मेहनत जाग्यावर थांबलेली असते. सर्वांची जेवणीखाणी झालेली असतात. बैलं दावणीला धापा टाकीत उभी असतात. वैरणकाडी करून बापू जोत्यावर सावली बघून कलंडलेले असतात. घरातले बापय कोण सोप्यात तर कोण झाडाखालच्या गार सावलीत उघडं होऊन पडलेले असतात. ऐन उन्हाळ्यातील उकाड्याने सगळीच हैराण झालेली असतात. सोप्यातच पत्र्याखाली आज्जी रंगीबेरंगी कपड्याच्या तुकड्यातुकड्यांची वाकाळ शिवत असते. तिच्या जोडीला तिच्याच वयाच्या दोन-चार बायका बसलेल्या असतात. पैऱ्याने वाकाळ शिवायला त्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा श्रीभगवानुवाच : काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥37॥ तंव हृदयकमळारामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥239॥ तरी हे कम क्रोधु पाहीं । जयांते कृपेची साठवण नाहीं । हें कृतांताचां ठायीं । मानिजती ॥240॥ हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ । भजनमार्गीचे मांग । मारक जे ॥241॥ हे दैहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामींचे कोंड । यांचे व्यामोहादिक बंड । जगावरी ॥242॥ हे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 10 आश्विन शके 1947; तिथि : दशमी 19:10; नक्षत्र : उत्तराषाढा 09:12 योग : सुकर्मा 23:27; करण : तैतिल 07:11 सूर्य : कन्या; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:26 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 दसरा विजयादशमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस यशाने भरलेला असेल. घरी आणि कामाच्या ठिकाणी सर्वजण तुम्हाला पाठिंबा देतील. वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. मालमत्ता खरेदीसाठी वाटाघाटी करणाऱ्यांना…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

