Author: Team Avaantar

चंद्रकांत पाटील टीव्हीवरच्या त्याच त्याच बातम्या ऐकून कंटाळा आला म्हणून सहज चॅनेल चेंज केलं तर, एका ठिकाणी कीर्तन लागले होते. कीर्तनकारांचा आवाज छान होता. पखवाज आणि टाळांचा आवाज गोड वाटत होता… कीर्तनाची ओवी अतिशय अर्थपूर्ण विचार करायला लावणारी होती. महाराज तल्लीन होऊन प्रत्येक ओळीचे उदाहरणासह स्पष्टीकरण, दृष्टांत सांगत होते… मी कधी असले कार्यक्रम शेवटपर्यत बघत नाही; पण मला महाराजाचं नाव जाणून घ्यायचं होतं म्हणून पाहात होतो. महाराज शेवटच्या चरणावर आले… कार्यकर्त्यांनी हार घातला आणि कार्यकर्त्यांच्या भाषणात महाराजाचं नाव समजलं… गुलाबराव म्हासुरकर, आळंदी! मला या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखे वाटत होतं, पण नेमकं आठवत नव्हते. शेवटी युट्यूबवर त्यांचा फोटो निरखून निरखून पाहिला…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव । न ह्यसंन्यस्त्यसंकल्पो योगी भवति कश्चन ॥2॥ ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जे जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥52॥ जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथेंचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥53॥ आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते । योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥3॥ आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणीं ॥54॥ येणें…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – सगळ्याच व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा. कुटुंबातील सदस्य मदत करतील, त्यामुळे आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे खरेदी करू शकता. व्यवसाय आणि व्यावसायिक परिस्थिती अनुकूल असेल. पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी कामात फायदा होईल. रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. वृषभ – व्यवसायाची स्थिती साधारणच राहील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस जरा नकारात्मक परिणाम देणारा असेल. मित्रांसोबत व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे उत्तम. आजच्या सुखसोयी उद्या उपलब्ध नसतील, म्हणून त्यांचा आजच लाभ घ्या. शुभ कार्यक्रमांवर खर्च होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. मिथुन – कार्यालयीन कामात काही…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… सोशल माडिया एकमेकांना जोडणारा असला तरी, बरीच लोक ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ (WhatsApp group) या प्रकाराला कंटाळले असतील. नाही का? मी तर जवळ जवळ 50-55 ग्रुपमध्ये गोवले गेलेय… तशी मी सगळ्या ग्रुपवर active नसते. बरं, मी सहजासहजी काही ग्रुप सोडूही शकत नाही. तिथे मात्र मी silent mode वर असते. काही ग्रुप हे काही लोकांचे पर्सनल फॅमिली ग्रुप असतात. ‘आम्ही या मॅडम ना ओळखतो…’ असे दाखवायला मला ही लोक त्यांच्या पर्सनल फॅमिली ग्रुपमध्ये सहभागी करतात. आता त्यातले काही लोक मला ओळखतात. ते तसे खूश असतात. पण एकदा एकाने मला त्याच्या फॅमिली ग्रुपमध्ये ॲड केलं.…

Read More

माधवी जोशी माहुलकर विदर्भातील विशेषतः नागपूरातील सांबार वडी किंवा पुडाची वडी प्रसिद्ध आहे. विदर्भात कोथिंबीरीला ‘सांबार’ म्हणतात, म्हणून या वडीला ‘सांबार वडी’ असे नाव पडले आहे. नागपूरातील महाल, इतवारी या भागात या पुडाच्या वडीसोबत कढी देतात, असं ऐकलं आहे. या वडीसारखाच ‘पाटोडी’ नावाचा प्रकार अमरावती, नागपूर, वर्धा या भागात मिळतो, परंतु यामध्ये दाण्याचे कुट जास्त प्रमाणात वापरतात आणि कोथिंबिरीचे प्रमाण कमी असते. तरीही काही लोक त्यालाच सांबार वडी म्हणतात, याचे सारण थोडे बाकरवडीसारखे असते. खसखस, खोबऱ्याचे प्रमाणही कमी असते. चवीकरिता चिंच गुळाचे पाणी किंवा आमचुर पावडर आणि साखर वापरल्यामुळे ही पाटोडी चवीला आंबटगोड लागते. परंतु खरी सांबार वडी तीच की…

Read More

पराग गोडबोले हे माझं दरवर्षीचंच आहे… दसरा संपून, दिवाळीची चाहूल लागायला लागली की, मला फराळाच्या पदार्थांची आठवण यायला सुरुवात होते. तसे हे पदार्थ हल्ली अगदी बाराही महीने मिळतात, पण सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी प्रसादाचा शिरा जसा जास्त चविष्ट लागतो, तसा दिवाळीत फराळ अंमळ जास्तच रुचकर असल्याचं जाणवतं… हा माझा कायमचा अनुभव! वाण सामानाची यादी करून ती नेऊन देणे हे काम मी चोख करतो. अर्थात, ती सांगते आणि मी लिहून घेतो. तिच्यापेक्षा माझं हस्ताक्षर वाण्याला नीट कळतं, असा तिचा ग्रह आहे. हस्ताक्षर स्पर्धेत कधी उत्तेजनार्थ पारितोषिकही न मिळालेला असा मी अन् माझं अक्षर जर छान असेल, तर तिचं कसं असेल याची तुम्ही…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा श्रीभगवानुवाच : अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः । स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥1॥ आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानी । एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥39॥ सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगी तोचि संन्यासु । पहातां ब्रह्मीं नाही अवकाशु । दोहींमाजी ॥40॥ जैसें नामाचेनि अनारिसपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां दोहीं मार्गीं जाणें । एकचि ठाया ॥41॥ ना तरी…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. परंतु आपला प्रभाव कमी होईल, असे काही कृत्य घडणार नाही, याकडे लक्ष द्या. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रकृती चांगली राहील. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. वृषभ – सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. मिथुन – पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत बचतीचे पैसे गुंतवलेत तर फायदा होईल. नोकरदारांनी कामावर लक्ष…

Read More

यश:श्री स्मार्टफोन हाती आल्यापासून काही जुन्या गोष्टींनाही उजाळा मिळत आहे. अलीकडेच अभिनेता अमजद खान याच्या एका मुलाखतीची क्लिप पाहायला मिळाली. चित्रपटांच्या यशाबद्दल त्याला विचारले असता, “कोणता चित्रपट चालेल हे सांगता येत नाही. पण कुत्रा, मांजर, साप यांचे चित्रपट मात्र चालतात…” अशा आशयाचे उत्तर त्याने दिले. वास्तवात, असे चित्रपट चालल्याची अनेक उदाहरणे आहे. त्यातही चित्रपटाला हमखास यश देणारे प्राणी म्हणजे, कुत्रा, घोडा, नाग-नागिण आणि हत्ती! ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटाच्या यशामध्ये मोठा वाटा त्यातील हत्तींचा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातही युद्ध असो की मनोरंजन हत्तीचे महत्त्व कायम राहिले आहे. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी एका लेखात हत्तीच्या मृत्यूबद्दलचा उल्लेख केला…

Read More

डॉ. किशोर महाबळ वर्गात नियमित येणारी, गृहपाठ नियमित करणारी एक मुलगी एक दिवस गृहपाठ न करताच शाळेत आली. शिक्षिकेला आश्चर्य वाटले आणि तिने त्या मुलीला कारण विचारताच त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली की, “काल रात्री मी अभ्यास करायला बसले. आमच्या झोपडीत एकच दिवा आहे. बाबा दारू पिऊन घरी आले आणि रागाने त्यांनी तो दिवाच फोडून टाकला व त्यामुळे मला गृहपाठ करता आला नाही!” नागपूर महानगरपालिकेच्या एका शाळेतील एका मुलीचा हा अनुभव आहे. यासारखे असंख्य चांगले-वाईट अनुभव सर्व समाजघटकांतील, शालेय स्तरावरील मुलामुलींना रोज येत असतात. या अनुभवातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. आपले आईवडील, शिक्षक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि समाजातील…

Read More