Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
शोभा भडके भाग – 3 “अगं आरू, कुठे होतीस तू? मी किती वेळ वाट पाहतेय इथे!” आत्याने समोरून येणाऱ्या आराधनाला विचारलं. आरू आत्यासोबत मंदिरात आली होती. मंदिरातील पुजारी बाबांशी आत्या बोलत असताना ती मंदिराचा परिसर पाहात होती… आणि तेव्हाच तिची नजर पायऱ्यांवरून खाली जाणाऱ्या एका कुत्र्याच्या पिल्लावर पडली. ते पिल्लू रस्त्याच्या दिशेने जात होतं… ‘ते पिल्लू रस्त्यावर गेलं आणि चुकून जर एखाद्या गाडीसमोर आलं तर!’ या विचारानेच ती घाबरली… आणि ती त्याच्या मागे गेली… पण तिला त्याच्यापर्यंत पोहचायला थोडा उशीर झालाच! ते पिल्लू गाडीसमोर गेलं होतं. पण ड्रायव्हरने पटकन ब्रेक मारल्यामुळे ते पिल्लू थोडक्यात वाचलं होतं… पण त्याच्या पायाला थोड…
माधवी जोशी माहुलकर उडदाची डाळ ही मधुमेहींना चालत नाही, असं म्हटलं जातं; त्यात जर ही डाळ वापरून ईडली करायची म्हटलं तर, तांदुळही याच्या जोडीला घ्यावे लागतात! त्याशिवाय, इडली कशी बरं तयार होणार? त्याकरिता मी इडलीचा एक पारंपरिक मुख्य घटक म्हणजे उडदाची डाळ बदलली आणि त्याऐवजी मूगडाळ आणि तांदूळ वापरून इडली केली… पचायला हलकी आणि सर्वांनाच आवडणारी! साहित्य हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख! कृती हेही वाचा – Recipe : खमंग शेगाव कचोरी टिप्स कालावधी तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें । जेथ चैतन्य आधातुरें । करुनि असिजे ॥280॥ तया हृदयाचां परिवरीं । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ।।281॥ बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें । द्वैत जेथ न देखे । तैसें केलें ॥282॥ ऐसी निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहाली । ते वेळीं कैसी गमली । म्हणावी पां ॥283॥ हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी । ते फेडुनियां वेगळी । ठेविली तिया ॥284॥…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – Homeopathy : बदलती लाइफस्टाईल म्हणजे आजारांना निमंत्रण दिनविशेष आनंदयात्री कवी बा. भ. बोरकर टीम अवांतर मराठीतील प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जन्म कुडचडे (गोवा) येथे 30 नोव्हेंबर 1910 रोजी झाला. गोव्यातील खासगी आणि सरकारी हायस्कूलांत ते शिक्षक होते. काही काळ मुंबईच्या विविध वृत्तपत्रात त्यांनी नोकरी केली. 1946मध्ये गोव्याच्या स्वातंत्र्य-आंदोलनात त्यांनी भाग घेतला. ‘आमचा गोमंतक’ आणि कोकणी भाषेतील ‘पोर्जेचो आवाज’ या वृत्तपत्रांचे ते संपादक होते. आकाशवाणीच्या पुणे-पणजी केंद्रांवर, वाङ्मय विभागात, 1955 ते 1970 पर्यंत काम करून ते निवृत्त झाले. प्रतिभा हा बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह महाराष्ट्र साहित्य संमेलनात प्रसिद्ध झाला. त्यानंतर जीवन संगीत, दूधसागर, आनंद…
डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्थूलता, थायरॉइड विकार, फॅटी लिव्हर, पचनाचे आजार… पूर्वी मध्यम आणि उतार वयात दिसणारे हे आजार आता तरुणांमध्येही झपाट्याने वाढू लागले आहेत. यामागे सर्वात मोठा दोष आपली बदलती जीवनशैली आहे. पण ही जीवनशैली शरीरात नेमके कोणते बदल घडवते आणि आजारांची निर्मिती कशी करत जाते, हे अनेकांना माहिती नसते. बऱ्याच वेळेला हे माहीत असून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार हे एका दिवसात होत नाहीत. चुकीच्या सवयी दीर्घकाळ टिकल्या की शरीराची नैसर्गिक संतुलन प्रणाली (homeostasis) बिघडते. परिणामी, शरीर हळूहळू या आजारांकडे ढकलले जाते. त्यामुळे लाइफस्टाईल (Lifestyle) डिसीजना “silent killer” असंही म्हटलं…
हिमाली मुदखेडकर कोणते नाते म्हणू हे, ना टाळणे ना गुंतणे का तरी माझे तुझे हे, सोबतीने चालणे… इयत्ता सहावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघी पहिल्यांदा भेटलो. तिच्याच घरी तिच्या घराची वास्तुशांत होती. मी आजीसोबत गेले होते. माझ्यापेक्षा दोनच वर्षानी मोठी होती ती… पण घरातील सगळी कामे अशी काही चटाचट करत होती की, मी पाहातच राहिले! स्वयंपाकघरापासून ते आला-गेला पाहुण्याचे आगतस्वागत… पूजेची तयारी… कुणाला काही हवे नको… सगळे एक हाती सांभाळले होते तिने. “रजनीSSS…हे कुठे ठेवलंय…?” “रजे… त्या अमुक माणसाला किती पैसे द्यायचे?” “रजनी डाळ कोणत्या डब्यातून घ्यायची?” “पूजेची पान-सुपारी कुठे ठेवली आहे?” “पंचपाळे भरून ठेवले का?” “दाराला तोरण लावले का?”…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मिरचीची भजी, खिचडीचे परोठे, शेंगदाणा भजी बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी… हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
विवेक वैद्य सुशीलाला रात्री अचानक थंडी वाजू लागली. तिने एसी बंद केला तसा अमोल उठला आणि विचारले… “का गं? काय झाले?” “काही नाही रे, एसी नको वाटतो.” “Ok” कूस पालटून तोही झोपला आणि तिही. सकाळी अमोल उठलेला तरी सुशीला झोपलेलीच! त्याने कपाळावर हात लावला तर, गरम वाटले. तो ताडकन उठला. भराभर स्वतःचे आवरून त्याने मस्त आले टाकून चहा केला. तिला उठवले आणि क्रोसिनची गोळी आणि चहा दिला… मग भराभरा कालची घासलेली भांडी आवरली. कामवाल्या बाईला फोन करून लवकर यायला सांगितले, त्याच वेळेस शेजारच्या काकूंकडे येणाऱ्या स्वयंपाकी बाईलाही आली की, पाठवायला सांगितले. मग पुन्हा येऊन सुशीलाचा ताप बघितला… तिला बरे वाटले…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा आइकें प्राणाचा हात धरूनि । गगनाची पाउटी करूनी । मध्यमेचेनि दादरेहूनि । हृदया आली ॥271॥ ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जिया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥272॥ जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची कंरडी । जे प्राणाची उघडी । जन्मभूमि ॥273॥ हें असो ते कुंडलि । हृदयाआंतु आली । तंव अनाहताचां बोलीं । चावळे ते ॥274॥ शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें । तें तेणें आइकिलें । अळुमाळु…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नवीन व्यवसाय करार होतील. कोणाशी तरी वाद किंवा भांडण होण्याचा धोका असेल. ज्यांना हितचिंतक मानता तेच लोक पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. मानसिक आणि शारीरिक थकवा येईल. घाईघाईत निर्णय घेताना चूक होण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्च सामान्य राहील. वृषभ – गोष्टी अपेक्षेप्रमाणे होतील का, याबद्दल साशंकता राहील. तथापि, निराधार शंकांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. आर्थिक व्यवहारात अस्पष्टता चांगली नाही. इतरांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप टाळा. मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. मिथुन – व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. रिअल इस्टेट…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 512
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

