Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
अजित गोगटे पुण्यातील एका इसमाने 27 वर्षांपूर्वी केलेल्या, परंतु कायद्याच्या दृष्टीने सिद्ध होऊ न शकलेल्या पहिल्या लग्नाचे गूढ कथानक आज मी सांगणार आहे. पहिल्या लग्नाची पत्नी हयात असूनही आणि तिला रीतसर घटस्फोट न देता आणखी एका स्त्रीशी फसवणुकीने विवाह करणे हे भारतीय दंड विधांनाच्या (Indian Penal Code) 494 आणि 495 या कलमान्वये गुन्हे आहेत. त्यासाठी अनुक्रमे सात आणि 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. या गुन्ह्यांसाठी या इसमाविरुद्ध दाखल खटल्याने या कथानकाची सुरुवात होते आणि अपिलात हायकोर्टाने त्याला निर्दोष सोडण्यात सांगता होते. या कथानकास गूढ म्हणण्याचे कारण असे की, त्यात दोन समांतर शक्यता तुल्यबळ संभाव्यतेने दिसतात. एक म्हणजे, दुसरे लग्न करण्याआधी…
सायली कान्हेरे थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात गरमागरम सूप प्यायला खूप मजा येते. पण ही सूप्स करायला काहींना कठीण वाटतात. आज मी एका सोप्या सूपची रेसिपी सांगणार आहे. जी करायला सोपी आणि खूप टेस्टी आहे. तुम्हीही नक्की करून बघा. साहित्य पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : लसूण सोलायला – 1 मिनिट शिजवण्याचा वेळ : 15 मिनिटे एकूण वेळ : 16 मिनिटे हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट कोळाचे पोहे कृती हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड विशेष आहार माहिती : शाकाहारी, प्रोटिनयुक्त टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे । सूर्यापुढां प्रगटे । प्रकाशु जैसा ॥452॥ तैशी दशेची वाट न पाहातां । वयसेचिया गांवा न येतां । बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥453॥ तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे । मग सकळ शास्त्रें स्वयंभें । निघती मुखें ॥454॥ ऐसें जें जन्म । जयालागीं देव सकाम । स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा ॥455॥ अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे । ऐसें जन्म…
दर्शन कुलकर्णी अमावस्या वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – धोरणात्मक निर्णयांसाठी त्वरित हालचाल करणे आवश्यक आहे. आक्रमक पवित्र्यामुळे एखाद्यासोबतच्या भावनिक संबंधांना धक्का बसू शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. प्रवास पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल. वृषभ – कौटुंबिक जीवनात एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर सगळ्यांसोबत झालेले एकमत परस्परांवरील विश्वास वाढवेल, जो भविष्यातील अनेक समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले जाईल. मिथुन – विरोधक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यावर हुशारीने उपाय शोधावे लागतील. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत भावनिक संबंध वाढतील. नवीन व्यवसाय सुरू होण्यास वेळ लागेल, त्यामुळे धीर धरा. कर्क – तुमच्या…
नितीन फलटणकर “आज या बाकड्यावर बसू आपण. तिकडे खूप डास चावतात… आणि इथला व्ह्यू पण किती छान आहे पाहा… अगं, ही तुझी बॅग आवर. कशाला आणलीस काय माहिती! हल्ली तुझंही असं वागणं वाढलंय…” दिनकरराव आणि मंदाताई सायंकाळी फिरायला आले होते. रोजचा शिरस्ताच होता त्यांचा. रिटायर झाल्यानंतर दिनकरराव आपल्या मुलाकडे राहायला आलेले, पुण्यात… कोथरूडला. त्यांच्या सोसायटीमध्येच एक बाग होती. तिथं दोघे रोज येत. विकास (दिनकररावांचा मुलगा) आणि सून अनुश्री यांच्याशी काही खटकलं तर, ते हमखास येत बागेत. खूपवेळ बागेत बसायचं आणि नंतर रात्री जेवणासाठी म्हणून घरी परतायचं… असंच काहीसं नियोजन रोज त्यांचं ठरलेलं. मुळात दिनकरराव लष्करातून निवृत्त झालेले. त्यांना बेशिस्तपणा जमत…
मयुरेश गोखले आज तिच्या घरी सकाळपासून सारखे लोकांचे येणे सुरू होते. सहा वर्षांची मुलगी आलेल्या सगळ्यांना सकाळचा न्यूजपेपर दाखवत होती. आज तिच्या आईचा फोटो आणि बातमी आली होती पेपरमध्ये! तेवढ्यात कोणी तरी विचारलं की, “कधी येणार आहे ‘ती’?” तर, लगेच उत्साहात तिच्या मुलीने उत्तर दिले की, “बाबा गेले आहेत तिला आणायला 1 वाजेपर्यंत येतील…” सगळे आलेले तिच्या आईची वाट पाहत होते आणि शेवटी तिची आई आली. काहीच बोलत नव्हती तिची आई! तिच्या बाबांनी आईला हॉलमध्ये आणले. मुलीच्या हातात पेपर तसाच होता. मी त्या मुलीला कडेवर घेतले आणि बाहेर आलो. तिच्या हातातला पेपर पाहिला आणि मन सुन्न झालं… हेही वाचा -…
माधवी जोशी माहुलकर हिवाळा सुरू झाल्यावर हिरव्यागार आणि ताज्या भाज्या यायला सुरुवात झाली की, घराघरातील गृहिणींना या भाज्यांपासून किती पदार्थ करावे आणि किती नको असे होऊन जात. याच सीझनमधे तुरीच्या शेंगा, पोपटीच्या शेंगा, हुरडा, हरभरा असे कितीतरी फ्रेश प्रकार उपलब्ध असतात. हे पदार्थ असे आहेत की, जेवताना तोंडी लावणे म्हणून खा किंवा दुपारच्या वेळेस खा… कसेही आणि कोणत्याही वेळेस खाल्ले तरी चालतात. अशा पदार्थांचे सेवन करण्याची कोणतीही एक ठराविक वेळ नसते. तुरीचे तुपाच्या फोडणीतील दाणे आणि वाणीचा हुरडा (ज्वारीचे कोवळे, हिरवे दाणे) थंडीच्या दिवसांत दुपारी चहा न घेता एखादी मुव्ही किंवा सीरियल पहाताना टाइमपास म्हणून खाणे छान वाटते. तुरीचे तुपातील…
गजानन देवधर स्कॉटलंडच्या हायलंड भागातील Cairngorms National Park मध्ये वसलेलं न्यूटनमोर हे छोटंसं पण मोहक खेडं आम्ही 2015 साली पाहिलं. आम्ही दोघं, सोबत माझा धाकटा भाऊ दीपक आणि भावजय ज्योती, चौघांनी मिळून या गावात दोन दिवस घालवले. दुपारी साधारण 12 वाजता आम्ही एडिंबरोहून कारने न्यूटनमोरला पोहोचलो. स्कॉटलंडच्या केंद्रस्थानी असलेलं जेमतेम हजार लोकवस्तीचं हे गाव. तिथं राहण्यासाठी निवडलेला आमचा Eagle’s View हा होम स्टे अगदी गावाच्या वेशीजवळच होता. Eagle’s View हा छोटेखानी बंगला अजूनही आमच्या छान लक्षात आहे, तो त्याच्या लाकडी सजावट, आजूबाजूचं शांत वातावरण आणि उबदार आदरातिथ्य यामुळे! प्रवासाची सुरुवातच मनात आपलेपणाची भावना मनात निर्माण झाली. दुपारनंतर बाहेर पडून, Eagle’s…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः । शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥41॥ ऐकें कवतिक हें कैसें । शतमखा लोक सायासें । तें तो पावे अनायासें । कैवल्यकामु ॥441॥ मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग । भोगितांही सांग । कांटाळे मग ॥442॥ हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता । दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ॥443॥ पाठीं जन्मे संसारी । परी सकळ धर्माचिया माहेरीं । लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचां ॥444॥ जयातें…
दर्शन कुलकर्णी शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यावसायिक जीवनासाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे सहकार्य आणि नेतृत्व यावर वरिष्ठ खूश असतील. गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराच्या पोर्टफोलिओचा पुन्हा एकदा काळजीपूर्वक आढावा घेणे आवश्यक आहे. जंक फूडपासून दूर रहा. एखादा भाऊ किंवा बहीण काही कामात तुमची मदत मागू शकतो. वृषभ – अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ज्या गोष्टी सुरक्षित दिसतात त्या तशाच असतील असे नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टींबाबत शंका घेणे ठीक आहे. टीका किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. कल्पनारम्यतेत जगण्यापेक्षा वास्तवावर लक्ष केंद्रित करा. मिथुन…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 510
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

