Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवसाची सुरुवात थोडीशी दडपणाखाली झाली, असे वाटू शकते. एकाच वेळी मनात अनेक गोष्टी येतील, ज्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते. कामात घाई करणे हानिकारक ठरेल, म्हणून काहीही करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो, परंतु वाद जास्त वाढवू नका. संध्याकाळी गोष्टी शांत होतील आणि हलके वाटेल. वृषभ – आजचा दिवस शांत आणि संतुलित असेल. दैनंदिन कामे तणावाविना पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्याशी संवाद साधल्याने सकारात्मक मूड येईल. क्षमतेनुसार खर्च करा आणि दिखाऊपणा टाळा. आरोग्य चांगले राहील, फक्त आळसाला वर्चस्व गाजवू देऊ नका. मिथुन – संभाषण करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.…

Read More

डॉ. किशोर महाबळ सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. शाळेतील त्यांचे अध्यापन, विद्यार्थ्यांशी वर्तणूक, विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखण्याची क्षमता, विद्यार्थ्यांच्या विकासातील योगदान, शिक्षणाबद्दल तसेच शिक्षकांच्या भूमिकेबद्दलचे विचार, वर्गातील आणि शाळेतील वर्तन, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक गुणवत्ता या सर्व बाबीं शिक्षकांची शैक्षणिक व्यवस्थेतील भूमिका निर्धारित करतात. शिक्षकाचा हा दृष्टिकोन जर नकारात्मक असेल तर, तो वर्ग घेण्यात टाळाटाळ करेल, फक्त परीक्षेपुरते शिकवेल. अभ्यास करणे टाळेल. विद्यार्थ्यांना मारहाण करणे, हा शिस्त लावण्याचा एकमेव मार्ग आहे, असे मानेल. विद्यार्थ्यांमधील गुण शोधण्याऐवजी त्यांच्यावर टीका करण्यात समाधान मानेल. असा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे अत्यंत नुकसानच करेल. शिक्षणव्यवस्था डबघाईला नेईल. सकारात्मक दृष्टिकोन असलेला…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटा वेफर्स, ऑम्लेट, ब्रेडरोल, दहिवडे बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनवताय, मग हे वाचा! हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सातवा श्रीभगवानुवाच – मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः । असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥1॥ ज्ञानं तेऽहं सविज्ञानं इदं वक्ष्याम्यशेषतः । यत् ज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते ॥2॥ आइकां मग तो अनंतु । पार्थातें असे म्हणतु । पै गा तूं योगयुक्तु । जालासि आतां ॥1॥ मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातीचें रत्न जैसें । तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसी ॥2॥ एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें । तरी पैं आधीं जाणावें…

Read More

दर्शन कुलकर्णी विनायक चतुर्थी अयन करीदिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस करिअरला चालना देण्यासाठी एक उत्तम दिवस असणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत समोर येतील. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी मिळतील. मात्र, संपूर्ण विचार करून गुंतवणूक करा. वृषभ – आज कामाशी संबंधित महत्त्वाची माहिती गोळा करण्यात बराच वेळ जाईल. यासाठी मित्रांशी देखील संपर्क साधू शकता. आर्थिक बाबींच्या दृष्टीने दिवस आनंददायक असेल. अध्यात्माकडे आज कल जास्त असेल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा. मिथुन – आजचा दिवस कामात यश देईल. वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांसाठी हा चांगला काळ आहे. आजच्या कठोर परिश्रमाचे भविष्यात सकारात्मक…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. डिसेंबर हा महिना माझ्या वाढदिवसाचा. मला माझ्या वाढदिवसाचं कायमच अप्रूप वाटत आलं आहे. तसं पाहिलं तर, सगळ्यांनाच असतं. आमच्याकडे पहिली 5 वर्षं वाडी भरून वाढदिवस साजरे करायची पद्धत आहे. त्यानंतर कधी सेलिब्रेशन केल्याचं आठवणीत नाही. कोणी शुभेच्छा दिल्याचं सुद्धा आठवणीत नाही. थोडं मोठं झाल्यावर कॉलेजमध्ये, नाटक किंवा शूटच्या ठिकाणी कोणी ना कोणी शुभेच्छा द्यायचे. पण हे व्हॉट्सॲप, फेसबुक आल्यापासून कोण कोण आणि कितीजण वाढदिवसाला शुभेच्छा देतात, भेटवस्तू मिळतात… सगळा आनंद आणि खूप मज्जा वाटते! हेही वाचा – बारीक व्हायचंय? तर मग… जसं मला कोणी शुभेच्छा दिलेल्या आवडतात, तसं मला इतरांना शुभेच्छा…

Read More

माधवी जोशी माहुलकर शॅलोट्स हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात मिळणारा छोट्या आकाराच्या कांद्याचा प्रकार आहे. हे कांदे आकाराने अगदी लहान असल्यामुळे यांना भाजीवाल्यांकडे ‘बेबी ओनियन’ही म्हटले जाते. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात या कांद्याचा वापर न चिरता सांबार, भाजीत केला जातो. सलाड, सूप, सॅास, फ्राईड राइस, व्हिनेगर, साल्सा, ड्रेसिंग अशा अनेक पाककृतींमधे शॅलोट्स वापरले जातात. स्लाइस करून गरम तेलात कुरकुरीत तळून बर्गर, स्ट्यू किंवा सलाडवर टॉपिंग म्हणून याचा वापर करतात. अंड्याचे पदार्थ, पास्ता सॅास तसेच साऊथ इंडियन बिसीबेळे भातामध्ये शॅलोट्सचा वापर करतात. कांद्यापेक्षा थोडे सौम्य आणि किंचित गोड असलेले हे शॅलोट्स थोडीफार लसणाची चव बाळगून असतात. उष्ण आणि दमट हवामान या…

Read More

पराग गोडबोले साने काका म्हणजे अगदी आदर्शवादी व्यक्तिमत्व. गांधीवादी विचारसरणीचा मेरूमणी. साधी राहणी, उच्च विचारसरणी अगदी जन्मभर जपलेली… नशीब, बुशशर्ट आणि पॅन्ट तरी घालतात. पंचा नेसून लाज अगदीच उघड्यावर पडेल, म्हणून हा पोशाख नाईलाजाने स्वीकारलाय म्हणे त्यांनी. जुनं ते सोनं यावर त्यांचा अगदी ठाम विश्वास. जुना खरखरणारा रेडियो, खिळखिळी झालेली, गंजलेली आणि गांजलेली जुनीपुराणी सायकल, हल्ली फक्त बाळांसाठी वापरले जाणारे, पण यांचे अत्यंत आवडते असे लंगोट, या सगळ्या वस्तूंचं प्राणपणाने रक्षण करण्याकडे यांचा ओढा… जग काही का म्हणेनात मग! लंगोट आरोग्य रक्षणा करता चांगला असतो यावर त्यांचा ठाम विश्वास, म्हणून अजूनही त्याला कवटाळून बसलेले साने काका म्हणजे मूर्तीमंत नमूना आहेत.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जया भजता भजन भजावें । हे भक्तिसाधन जें आघवें । ते मीचि जाहलों अनुभवें । अखंडित ॥483॥ मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरुप बोली निर्वचे । ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती ॥484॥ तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा । तरी मी देह तो आत्मा । हेचि होय ॥485॥ ऐसें भक्तचकोरचंद्रें । तेथ त्रिभुवनैकनरेंद्रें । बोलिलें गुणसमुद्रें । संजयो म्हणे ॥486॥ तेथ आदिलापासूनि पार्था । ऐकिजे ऐसीचि अवस्था । दुणावली हें…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज नशिबाची भक्कम साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे गती घेतील. व्यवसायात नफा होण्याचे संकेत आहेत. आरोग्यात चांगली सुधारणा होईल. कौटुंबिक जीवन आणि संतती या दोन्ही आघाड्यांवर शांतता असेल. वृषभ – व्यवसाय चांगला राहील, परंतु थोडे सावध राहण्याची गरज आहे. परिस्थिती फारशी अनुकूल दिसत नाही. त्यामुळे कोणताही धोका पत्करणे टाळा. अनावश्यक वाद किंवा अडचणीत अडकू शकता. जोडीदार आणि संततीशी संबंध सामान्य राहतील. मिथुन – आज जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आनंदी रहाल आणि दिवस काहीसा सुट्टी असल्यासारखा वाटेल. नोकरी, कौटुंबिक जीवन, संतती, आरोग्य आणि व्यवसाय -…

Read More