Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
आराधना जोशी चार दिवसांच्या सलग सुट्टीनंतर परत ऑफिसला जाणं अर्णवच्या खरंतर जीवावरच आलं होतं. त्यातच गोव्यातील एका लग्नाला उपस्थिती लावून मुंबईत घरी परतायला पहाटेचे दोन वाजले होते. त्यामुळे “आजही सुट्टी टाकावी आणि झोप पूर्ण करावी का? त्यासाठी बॉसला कारण काय सांगायचं?” असे प्रश्न अर्धवट झोपेत असलेल्या अर्णवच्या मनात सुरू होते. तेवढ्यात गॅलरीतून बेडरूममध्ये येत सागरिका म्हणाली, “अर्णव अरे, सोसायटीत काहीतरी गडबड झाली आहे. सोसायटीच्या गेटवर बरेचजण जमले आहेत. जरा बघ नं काय झालं आहे ते.” हे ऐकून अर्णवने आधी मोबाईलवर सोसायटीच्या ग्रुपवर काही कोणी पोस्ट केलं आहे का, ते अर्धवट झोपेतच चेक केलं. तिथे कोणतीही पोस्ट नव्हती. “नसेल गं काही…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये खमण ढोकळा, दहिवडे, डोसा, ऑमलेट बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ… हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. विवेक वैद्य प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. आता माझा एक मित्र आहे, त्याने लग्नच केले नाही. तो आम्हा सगळ्या संसारी मित्रांना म्हणतो मी तुमच्यापेक्षा सुखी आहे. आम्हीही ते मान्य करतो, पण आमचा एक वात्रट मित्र त्याला म्हणतो, “भले तू आमच्यापेक्षा सुखी असशील, पण स्वर्गसुख म्हणजे काय? हे तुला मरेपर्यंत समजणार नाही.” तर, ते असो. माझ्याही सुखाच्या कल्पना काही खूप मोठ्या नाहीत… मी छोटया गोष्टीत सुख शोधतो. आता सकाळी बायको भेंडी किंवा ढेमसे किंवा शोपालक अशी आपल्याला न आवडणारी भाजी करणार असते… “ती भाजी मला आवडत नाही. तू दुसरंही काही कर,” हे सांगण्याची हिम्मत आपल्यात नसते. आपण बाहेरून दुपारी येऊन…
अध्याय सातवा जयाचिये प्रतीतीचा वाखौरां । पवाडु होय चराचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥137॥ येर बहुत जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं । जे आशातिमिरें दृष्टी -। मंद जाले ॥138॥ कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः । तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥20॥ आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा जाला रिगावा । कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥139॥ ऐसे उभयतां आंधारीं पडले । म्हणोनि पासींचि मातें चुकले । मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरां ॥140॥ आधींच प्रकृतीचे पाइक । वरी भोगालागीं तंव रंक । मग तेणें लोलुप्यें कौतुक । कैसे भजती ॥141॥ कवणीं तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि…
दर्शन कुलकर्णी शाकंभरी पौर्णिमा वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस थोडा धावपळीचा असेल. कामाचा खूप ताण असेल. आज प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया दिली जाणार नाही, याची काळजी घ्या. एक अयोग्य शब्द संपूर्ण दिवस खराब करू शकतो. तुम्हाला कामावर पुढाकार घ्यावा असे वाटेल आणि ते योग्य आहे, परंतु प्रथम परिस्थिती पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. वृषभ – आज तुमची सर्वात मोठी ताकद संयम आहे. जे घाईघाईने वागतील त्यांच्याकडून चुका होतील आणि तुम्ही मात्र त्यातून शिकाल. पैशाबद्दल जास्त विचार कराल. एखादा जुना खर्च किंवा जबाबदारी यांची आठवण होईल. कुटुंब किंवा जवळच्या मित्राची साथ मनाला शांती देईल. आज कोणतीही गोष्ट…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये डोशाबरोबरच बाकरवडी, सामोसे आणि सँडविच बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : शिळ्या भाताचे उत्तप्पे, ब्रेडचे थालिपीठ अन् बरंच काही… हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
अध्याय सातवा एर्हवीं ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझें । हें न म्हणावें परि काय कीजे । न बोलणे बोलों ॥126॥ बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते । वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥19॥ जे तो विषयांची मोट झाडी- । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं । चुकावूनि आला पाडी । सद्वासनेचिया ॥127॥ मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा । अप्रवृत्तीचा अव्हांटा । डावलूनि ॥128॥ आणि जन्मशतांचा वाहतवणा । तेविंची आस्थेचिया न लेचि वाहणा । तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥129॥ ऐसा शरीरसंयोगाचिये राती- । माजीं धांवतां सडिया आयती । तंव कर्मक्षयाची पाहती । पाहांट जाली ॥130 ॥ तैसी गुरुकृपाउखा…
दर्शन कुलकर्णी पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी 06:54 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज एखाद्या मोठ्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, एक महत्त्वाचा करार निश्चित होईल. सरकारकडून विशेष सन्मान मिळण्याची शक्यता आहे. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुमचे लक्ष नवीन योजनांवर असेल. एखाद्या पवित्र स्थळाला भेट दिल्याने मनाला शांती मिळेल. कायदेशीर वाद जिंकता येईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल, सहकारी तुम्हाला पाठिंबा देतील. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. समस्या दुसऱ्यांना सांगून त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे सयुक्तिक ठरते.…
डॉ. किशोर महाबळ प्रत्येक विद्यार्थ्यातील बुद्धिमत्तेचा प्रकार ओळखणे आणि त्याबद्दल त्या विद्यार्थ्याला सांगणे, हे महत्त्वाचे असले तरीही तेवढेच पुरेसे नसते. बुद्धिमत्ता ही निसर्गदत्त असते. मात्र, बुद्धिमत्तेचा कधीच आपोआप विकास होत नाही. वर्षानुवर्षे सातत्याने, चिकाटीने, निष्ठापूर्वक, ज्ञान मिळवून, अनुभव घेऊन, प्रयोग करून, वाचन, चिंतन, मनन करून, अनुभवसंपन्न बुद्धिमान व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन आणि वेळप्रसंगी स्वयंअध्ययन करून बुद्धिमत्तेचा विकास करता येतो. हा विकास घडवून आणण्यात पालक, शिक्षक, शाळा किंवा मार्गदर्शक हे एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच मदत करू शकतात. त्यानंतरचा विकास मात्र पूर्णतः स्वतःचे प्रयत्न, स्वयंप्रेरणा आणि तपश्चर्येवर अवलंबून असतो, हे सर्व विद्यार्थ्याना समजावून सांगणे आणि पटवून देणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे आपल्या प्रगतीसाठी सतत…
मयुरेश गोखले एका सुंदर संध्याकाळी मी फेसबुकवर ऑनलाइन होतो. दुपारी जोरदार पाऊस पडून गेल्याने हवेत छान गारवा होता. घराबाजूची हिरवीगार झाडे वाऱ्याने डोलत होती आणि अशा रोमँटिक वातावरणात ‘mutual friends’ मध्ये तिचा सुंदर फोटो मला दिसला. लगेच पाठवली मग रिक्वेस्ट.आणि तिने ती accept सुद्धा केली! तिच्या ‘भिंती’वर तिने आज एक पोस्ट टाकली होती “डॅड से नो लेट नाइट पार्टी!” तिच्या बहुतेक पोस्ट इंग्लिशमध्येच असायच्या. पिक्स पण एकदम मॉडर्न असायचे. पाउट केलेले फोटो असायचे. एक सुंदर मैत्रीण मिळाल्याचा जरा गर्व झाला होता मला… एकदा बोलून पाहावं म्हणून मेसेज पाठवला आणि तिने पण छान रिप्लाय केला. हळूहळू आमचे ऑनलाइन बोलणे वाढले… मैत्री…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 509
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

