Author: Team Avaantar

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर एखाद्याच्या शरीरानं प्राण सोडला तरी त्याच्या आप्तस्वकियांना कुठंतरी काहीतरी सुप्त आशा वाटत असते… डॅाक्टर ॲाक्सिजन लावतील, सीपीआर देतील, एखादं इंजेक्शन दिलं तर हृदय पुनःश्च कार्यरत होईल वगैरे… पण एकदा विकेट पडली की पडली; अगदी तुरळक परिस्थितीत डीआरएसचे बेनिफिट मिळते… आता ही परिस्थिती असेल तर, तेव्हा काय असेल? जेव्हा वैद्यकशास्त्र काय एकूण विज्ञानच पाळण्यात होतं! अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात विजेचा शोध लागला तेव्हा तर, जगानं पहिल्यांदाच ‘एखाद्या अदृश्य शक्तीचा’ थेट अनुभव घेतला होता… विज्ञान उत्तरोत्तर नव्या क्षितिजांकडं धाव घेत असताना माणसाला पहिल्यांदा प्रश्न पडला की, ”ही अदृश्य शक्ती म्हणजेच वीज ‘जीवनाशी’ निगडित आहे का?” याच प्रश्नातून जन्म झाला एक…

Read More

अध्याय सातवा साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ॥30॥ जिहीं साधिभूता मातें । प्रतीतीचेनि हातें । धरूनि अधिदैवातें । शिवतलें गा ॥180॥ जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञु दृष्टी रिगे । ते तनूचेनि वियोगें । विरहे नव्हती ॥181॥ एर्‍हवीं आयुष्याचें सूत्र बिघडतां । भूतांची उमटे खडाडता । काय न मरतयाहि चित्ता । युगांतु नोहे ॥182॥ परी नेणों कैसें पैं गा । जे जडोनि गेले माझिया आंगा । ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥183॥ एर्‍हवीं तरीं जाण । ऐसे जे निपुण । तेचि अंतःकरण- । युक्त योगी ॥184 ॥ तंव इये शब्दकुपिकेतळीं ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आरोग्याची काळजी घ्या आणि किरकोळ आजारांकडेही दुर्लक्ष करू नका. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून काळजीपूर्वक नियोजन करा. सभोवतालच्या लोकांबद्दल, विशेषतः स्पर्धकांबद्दल जागरूक रहा. वृषभ – नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. तब्येत नरम-गरम राहू शकते. घरात शुभ प्रसंग येतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात काही आर्थिक अस्थिरता येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसायाच्या परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु तडजोडीने सर्व समस्या सोडवता येतात. मिथुन – आजचा दिवस आनंद, शांती आणि सौभाग्याने भरलेला असेल. आरोग्य उत्तम राहील, दिवसभर उत्साही रहाल.…

Read More

दिलीप कजगांवकर, पुणे राज आणि रीना एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंब. नेहा ही त्यांची एकुलती एक मुलगी, पंधरा वर्षांची. नेहा म्हणजे सौंदर्य, आधुनिकता आणि सोज्वळता यांचा सुरेख संगम. मागच्याच वर्षी राजची पुण्याला बदली झाली. कंपनीने एका मोठ्या सोसायटीत राजला राहण्यासाठी बंगला दिला. राजच्या बंगल्याच्या डाव्या बाजूला दोन मोकळे प्लॅाट आणि उजव्या बाजूला झाडांच्या गर्दीत लपलेला विनायकरावांचा ‘समृद्धी’ हा टुमदार बंगला. विनायकराव ऊर्फ आण्णा हे सेवानिवृत्त शिक्षक. मुलगा आणि सून परदेशात, भल्या मोठ्या बंगल्यात विनायकराव एकटेच. फावल्या वेळात, म्हणजे आण्णांचा तसा सर्व वेळच फावला असायचा… नेहाला शिकविणे हा त्यांचा रोजचाच उपक्रम. हळूहळू ते नेहा, राज आणि रीना यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग…

Read More

माधवी जोशी माहुलकर, नागपूर आले, लसूण प्रत्येक भाजीत वापरणे गरजेचे नसते. काही भाज्या या त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे चवीला गोडसर आणि सौम्य असतात. दुधी भोपळा, लाल भोपळा, चवळीच्या शेंगा, फुलकोबी अशा तत्सम भाज्या या चवीला सौम्य असतात, या भाज्यांमध्ये आले किंवा लसणाचा वापर केला तर त्यांची मूळ चव जाते आणि त्यामुळे या भाज्या चवीला उग्र लागतात. त्याचप्रमाणे गवारीचे आहे… गवार आणि वालाच्या शेंगा (वाल पापडी) याही पचनास तशा जड आणि गॅस्ट्रिक आहेत. गवार तर चवीला थोड्या कडसर असतात. यामध्ये लसणाचा वापर केला तर, आधीच चवीला उग्र असलेल्या ही भाजी आले-लसणाच्या अतिरिक्त वापरामुळे अजून जास्त ॲसिडिक होते, त्यापेक्षा गवारीची भाजी फक्त तिखट,…

Read More

अध्याय सातवा असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनी धनुर्धरा । विषयांचां वोवरां । विकृतीसी असे ॥169॥ तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे । मग चिरिलें आव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥170॥ तेणें भूतें भांबावलीं । म्हणोनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं । मग महादुःखाचां घेतलीं । दांडेवरी ॥171॥ येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् । ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥28॥ ऐसे विकल्पाचे वांयाणे । कांटे देखोनि सणाणे । जे मतिभ्रमाचे पासवणें । घेतीचिना ॥172॥ उजू एकनिष्ठतेचां पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं । महापातकाची सांडिली । अटवीं जिहीं ॥173॥ मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माझी जवळीक पातले । किंबहुना ते चुकले । वाटवधेयां ॥174॥…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 जानेवारी 2026; वार : मंगळवार वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – करिअरच्या बाबतीत आजचा दिवस विचारपूर्वक वागण्याचा आहे. काम नियोजनबद्ध पद्धतीने केले तर, तुम्ही व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित समस्यांवर सहज मात करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमचा विरोध करणारे लोक गरज पडल्यास तुमच्या पाठीशी उभे राहतील. म्हणून, अनावश्यक संघर्ष टाळणे चांगले. लहान कामे भविष्यात मोठे फायदे देतील. वृषभ – आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. अनेक जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, जोखीम घेतल्याने नफ्याचे दरवाजे उघडतील. विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. एकूणच दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल. मिथुन -…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मंडईमध्ये विक्रीसाठी येताहेत. रंगीबेरंगी भाज्या, ताजी फळं… मंडईत शिरलं की, ताज्या भाज्या आणि फळांचा सुरेख सुगंध आणि रंग चित्तवृत्ती प्रसन्न करतात. तिथेच चाहूल लागते भोगी आणि संक्रांतीची. संक्रांत जवळ आली आहे. आता तर दुकानांमधून किंवा ठेला-गाड्यांवर रंगीबेरंगी प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या आकर्षक वस्तू दिसायला लागतात. कितीतरी बायका त्या वस्तू थोडीफार घासघीस करून डझनाच्या भावात घेत असतात. करेक्ट. हळदी कुंकवाचं वाण लुटण्याची तयारी सुरू झाली आहे. आता रोज बायका छान छान साड्या नेसून, नटूनथटून सगळीकडे हळदी कुंकवाचा आनंद लुटत फिरणार.                काही वर्षांपूर्वी अशाच एका हळदी कुंकवाला मी हजेरी…

Read More

ॲड. कृष्णा पाटील भाग -1 “अरे, जिच्यासोबत मी सोळा वर्षे संसार केला ती माझी होऊ शकली नाही. तिला मी पूर्ण समजलो नाही. आता येणारी तर एकदम नवीन असणार. तिला मी काय समजू शकणार?” आभाळाकडे नजर लावून सूरज उदास मनाने बोलत होता. त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कशातच मन लागत नव्हतं. त्याची पत्नी जाऊन आज तीन वर्षे झाली होती. ती जिवंत असताना दोघांचे कधीही पटले नाही. सगळा संसार ओढून ताणूनच सुरू होता. सूरज कधीतरी नंदूकडे यायचा. सगळ्या गोष्टी सांगायचा. मनातल्या सर्व बऱ्या-वाईट गोष्टी सांगण्याचं त्याचं एकमेव ठिकाण म्हणजे नंदू. अगदी बालवयापासूनच दोघांची मैत्री. गावाबाहेर भैरवीच्या टेकडाजवळ हायवेला लागून ज्योतिर्लिंग चहा सेंटर होतं.…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये खमण ढोकळा, दहिवडे, डोसा, ऑमलेट बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : खमण ढोकळा, डोसा, ऑम्लेट बनवताना या टिप्स वापरून पाहा हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More