Author: Team Avaantar

आराधना जोशी काही व्यक्तींचं या पृथ्वीतलावर असणंही मनाला समाधान देणारं, धीर देणारं असतं. डॉ. स्नेहलता देशमुख मॅडम यांचं असणं माझ्यासाठी त्याच भावनेचं होतं. 29 जुलै 2024 रोडी मॅडमचं प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची बातमी समजली आणि एक आधार हरपल्याची जाणीव झाली. डॉ. स्नेहलता देशमुख मॅमशी माझी पहिली भेट झाली ती 1996 साली मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात. त्यावर्षी मराठी वाङ्मय विषयात विद्यापीठात पहिली आल्यामुळे देशमुख मॅडमच्या हस्ते दोन सुवर्णपदके स्वीकारण्याचे भाग्य मला लाभले. त्यावेळी त्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या. पदवीदान समारंभात त्यांच्या मंद हास्यावर, चेहऱ्यावर दिसून येणाऱ्या बुद्धीच्या तेजावर आणि तरीही अतिशय मृदू स्वरात समोरच्याशी संवाद साधण्याच्या त्यांच्या लकबीवर मी फिदा झाले…

Read More

दिप्ती चौधरी डंपर मुळचाच अतिशय सज्जन आणि प्रेमळ. कोणी बाजूला आले तर, आपले खाणेही तो देऊन टाकणार. कधी कोणी आजारी असेल दुखापत झाली असेल तर, जाऊन चाटणार, सहनुभूतीने बघणार. पण जेव्हा डंपरही वयात आला, तेव्हा प्रश्न अधिकच गंभीर झाला. प्राणीराज्याच्या नियमानुसार आतापर्यंत मित्र असणारा डिगर ही डंपरच्या जीवावर उठला! डंपर मुळातच सौम्य स्वभावाचा आणि अतिशय चपळ. त्यामुळे त्याने त्याच्या पुरता प्रश्न सोडवला. त्याने जमिनीवर राहणे सोडून दिले! इमारतीच्या खिडक्यांना लावलेल्या ग्रिल्सवरून तो दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर चढून जायचा. खिडक्यांवरच्या आडव्या छतावर पडून खालचा अंदाज घेत बसायचा. मधेच एका रिकाम्या घराची खिडकी उघडून तिकडे मुक्काम हलवला. रोज सकाळी त्याचा आणि डिंपल आंटीचा कलगीतुरा…

Read More

अर्चना कुलकर्णी आमचं जळगाव…! खानदेशातील एक टुमदार शहर..! आमच्या लहानपणापासून, नव्हे त्याही पूर्वीपासून जळगावचे शैक्षणिक वातावरण खूपच समृद्ध होते. अनेक खासगी शाळा, नगरपालिकेच्या शाळा मोठ्या स्वच्छ व सुंदरही होत्या. सर्व शाळांचे स्वतःचे विस्तीर्ण क्रीडांगण होते. माझी शाळा, भगीरथ इंग्लिश स्कूल. आर्थिक दृष्टीने विचार केला तर माझी शाळा खूपच गरीब होती. भाड्याच्या टुमदार इमारतीत तळमजल्यावर मुख्याध्यापकांचे कार्यालय, शिक्षकखोली, सहा वर्गखोल्या तर पहिल्या मजल्यावर दहा-बारा वर्गखोल्या होत्या. पहिल्या मजल्यावरच्या इमारतीच्या दर्शनी भागात असलेल्या बाल्कनीला ठिकठिकाणी लाकडाच्या ओंडक्यांचे टेकू लावले होते, जे शाळेचे (खानदेश एज्युकेशन सोसायटीची) आर्थिक परिस्थिती पोटतिडिकीने कथन करीत होते. आमच्या शाळेची आर्थिक परिस्थिती जरी नाजूक होती तरी, खूप चांगले मुख्याध्यापक,…

Read More

मंदार अनंत पाटील एकेदिवशी रात्री बाबांनी कामावरून येताना अचानक माझ्याकरिता एक पांढरे आणि तपकिरी ठीपके असलेले अतिशय सुंदर आणि गुटगुटीत गावठी पिल्लू आणले. माझा आनंद गगनात मावेना… माझ्यासाठी फार अनपेक्षितच होते. एक-दोन महिन्यांचे गोंडस असे ते पिल्लू होते. मी लगेचच माझ्याकडे जमविलेले सामान वापरून त्या पिल्लाकरिता गादी आणि इतर गोष्टी नीट मांडून ठेवल्या. ते पिल्लू आई आणि भावंडापासून वेगळे झाल्यामुळे तसेच, नवीन वातावरण असल्याने भांबावून गेले होते. पण मायेने जवळ केल्यावर ते थोड्याच वेळात छान रुळले. खाऊ-पिऊ झाल्यानंतर मात्र त्याला आई आणि भावंडाची आठवण येऊ लागली… ते जे रडायला लागले ते निस्तरताना आमच्या नाकीनऊ आले. कशीबशी एक रात्र काढली आणि…

Read More

मनोज गाण्यांचा विषय हा न संपणारा आहे. हे वाक्य मी रीपिट करतोय. आधीच्या लेखात जुन्या गाण्यांबद्दल लिहिले; मग नवीन गाणी इतकी टाकाऊ आहेत का?… असे वाटायला नको. मुळात जुनी गाणी आणि नवी गाणी याच्या दरम्यानची सीमारेषाच पुसट आहे. ‘कयामत से कयामत तक’, ‘डर’, ‘रोजा’, ‘रंगीला’, ‘बाजीगर’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मैंने प्यार किया’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘दामिनी’ हे सर्व माझ्या पिढीतील सिनेमे. यातील गाणी हीट झाली, आजही ऐकली जातात. मग ही गाणी नवी समजायची की जुनी?… नाही ठरवता येत! या बहुतांश सिनेमांतील गाणी श्रवणीयच होती. त्यात दुमत असण्याचे कारणच नाही. जर 2000 साल ही सीमारेषा ठरवली तरी, 2001-02…

Read More

मानसी देशपांडे ख्यातनाम लेखक व.पु. काळे यांनी म्हटलंच आहे, “ज्याला लेखणीतून संवाद साधता येतो त्याला मी लेखक समजतो…” लेखकांना वाचकांची नस बरोबर माहीत असते. जे आपल्या व.पुं.ना देखील माहीत होती. हे झालं लेखांचं. पण कवितेचं विश्व हे खूप वेगळे आणि अजब असते. कारण, काव्य हे पद्यात्मक पद्धतीने सादर करून तिथे तुम्हाला श्रोतावर्ग मिळतो. नुसती यमक जुळवून कविता होत नाही तर, त्या कवितेत इतकी ताकद असावी लागते की, त्यातील मर्म प्रेक्षकांना म्हणा किंवा श्रोत्यांना समजले पाहिजे. अशीच एक कविता कवी ग्रेस यांची आहे. अतिशय प्रसिद्ध आणि आयुष्याचं सार समजावणारी आहे. ती म्हणजे “भय इथले संपत नाही…” खूप अर्थपूर्ण कविता आणि त्याला…

Read More

मोहिनी घारपुरे देशमुख स्वतःच्या अंतरंगात जे उमलून येतं ते चांदणं स्वतःवर सुखाची आल्हाददायक पखरण सदैव करतं. माणसाला सुखाची आस असते म्हणून तो जगभर धावतो. पण त्याला हे कळत नाही की, ज्या सुखाची तो आस धरून जगभर धावतोय, ते सुख खरंतर त्याला त्याच्या अंतर्मनात गवसतं. भौतिक सुखांची आस धरणं आणि त्यांच्या पूर्ततेसाठी आपण नानाविध मार्गाने पैसा कमावणं ही तर जीवन जगण्याची ‘गरज’ आहे, पण या सगळ्या भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन पहाल तरीसुद्धा माणूस सुखी होऊच शकतो; कारण सुख हे मनातून उमलून येतं. चार भौतिक सुखाच्या गोष्टी जवळ नाहीत म्हणून रडत बसणारी माणसं मी पाहिली आहेत, पण याउलट भौतिक सुखाच्या गोष्टी नसूनही…

Read More

आराधना जोशी डिसेंबर आणि जानेवारी हे महिने शाळांमधील ॲडमिशनचे. आपल्याला हव्या त्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी आईवडिलांची सुरू असलेली धावपळ… एका विशिष्ट शाळेतच प्रवेश मिळावा, यासाठी आग्रही आणि त्यामागे कदाचित असणारी प्रतिष्ठा… आदल्या दिवशी दुपारपासूनच त्या-त्या शाळेच्या ऑफिसबाहेर फॉर्म घेण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा… त्यानंतर तो फॉर्म भरण्यासाठी परत लावलेल्या रांगा… मुलाखतीची पाल्याकडून करून घेतली जाणारी तयारी… प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी पाल्याने गप्प बसणं किंवा मनाला वाटेल ती उत्तरं देणं आणि यामुळे बाबांपेक्षाही आईचं वाढलेलं बीपी…. या गोष्टी आतापर्यंत माहीत होत्या. नशिबाने माझ्या मुलीच्या शाळाप्रवेशाच्या वेळी यातील अनेक गोष्टी कराव्या न लागल्याने शाळाप्रवेश ही माझ्या दृष्टीने सहजसोपी गोष्ट होती. त्यातही…

Read More

दिप्ती चौधरी गच्चीवरील पाण्याच्या टाकी खाली रोडरोलरने चार पिल्ले दिली. गच्चीवर आई फिरायला आली होती. तिच्या मागे लगबगीने रोडरोलर धावत वर आली. ओरडून ओरडून टाकीजवळ चल असा आग्रह करत होती. ही काय सांगते बघायला आई तिच्यामागे आली. तिने साद घालून आम्हाला बाहेर बोलावलं. खास आईला दाखवायला! आम्ही सर्व धावतच बाहेर आलो. आम्हाला अनिमिष नेत्रांनी आई बघतच राहिली. थोडे मोठे झाल्यावर आमची जबाबदारी दनू म्हणजे तेव्हाचा डंपर यानेच पूर्ण पणे उचलली. त्याने आम्हाला गच्चीवरून खाली आणले. मोठ्या कौतुकाने आईला हाक मारून आम्हाला दाखवले. झाडावर चढायला, नखाला धार काढायला, उंदीर पकडायला त्यानेच शिकवले. आम्ही खेळत असताना आमच्यावर लक्ष ठेऊन तो बाजूला बसून…

Read More

सचिन देसाई आपल्याकडे सगळं काही असतं… पण सगळ्यात मौल्यवान गोष्ट नसेल तर जीवन व्यर्थ असतं. खरंतर, ती मौल्यवान गोष्ट असेपर्यंत आपल्याला त्याची जास्त किंमत नसते आणि जेव्हा दुरावते तेव्हा वेळ निघून गेलेली असते… आई जाऊन आता इतकी वर्षं झाली आहेत, पण असा एकही दिवस गेला नाही की, तिची आठवण झाली नाही. तिला स्मरून या काही ओळी… इतकं लिहूनही वहीचं पान कोरं ग… तुझ्या विना माझं आयुष्य अधुरं ग… गेलीस तू अनंतात न मला भेटता पडलो मी दूर इथे आज असा एकटा नाही कोणी पुसण्यास अश्रुंचा पूर ग… तुझ्याविना माझं आयुष्य अधुरं ग… रोज तुझी आठवण रोज तुला साद रोज तुझ्या…

Read More