Author: Team Avaantar

सुरेश महाबळ योगायोग हा प्रकार अनेकांच्या जीवनामध्ये येत असतो. असाच एक प्रकार माझ्यासोबत झाला आहे, तो पण देवस्थानाच्या ठिकाणी. यामुळे माझा तो सुखद धक्का होता. मोठी मुलगी हर्षा B.Tech. झाल्यानंतर लगेचच एका MNC कंपनी मधे रुजू झाली आणि अद्याप कार्यरत आहे. ते वर्ष होते 2009. या कंपनीचे महाराष्ट्र आणि इतर प्रांतांमध्ये स्वमालकीचे रिसॉर्ट आहेत. 2011 साली हर्षाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2012मध्ये तिने महाबळेश्वर-पाचगणी रिसॉर्टसाठी अर्ज केला आणि ऑफ सीझन असल्यामुळे तिला बुकिंगसुद्धा मिळाले. त्याप्रमाणे मला, पत्नी संगीता आणि दुसरी कन्या मानसी असे आम्हाला ठाण्यात दुसऱ्या भावाकडे जळगावहून यावयास सांगितले. हर्षाने टॅक्सी बुकिंग अधीच करून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 जुलै 2025, वार : मंगळवार भारतीय सौर : 24 आषाढ शके 1947, तिथि : पंचमी 22:39, नक्षत्र : शततारका 06:25, पू. भाद्रपदा 29:46 योग : सौभाग्य 14:11, करण : कौलव 11:21 सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ 23:57, सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – पालकांच्या आशीर्वादाने आज कामात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या वर्तनाचा आणि कृतींचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. एखादा नवीन व्यवसाय…

Read More

सुहास गोखले सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हटले जाते. चंद्र पृथ्वीभोवती 27.3 दिवसांत एक फेरी मारतो. त्यामुळे रोज तो आकाशात वेगवेगळ्या ताऱ्यांच्या मांडणीसमोरून जाताना दिसतो. हेच आयनिकवृत्ताचे 27 भाग चंद्राची घरे किंवा नक्षत्र म्हणून कल्पिलेले आहेत. आकाशस्थ नक्षत्रांसंदर्भातील लेखमालेचा हा सहावा भाग. विशाखा : काही नक्षत्रे त्यांच्या चांदणीच्या प्रखर तेजाने पटकन ओळखता येतात तर, काहींना मात्र शोधण्यासाठी थोडा त्रास होतो. विशाखा देखील असेच एक नक्षत्र आहे. या तारकांना प्रखर तेज नसले तरी, पुरेशा तेजामध्ये त्या अगदी काटेकोर मांडलेल्या आढळतात. स्वाती नक्षत्राच्या थोडे पुढे पूर्वेस पाहिल्यास आपणास दोन समान तेजाच्या तारका थोड्या अंतराने अगदी समान रेषेत आढळतात. तेच…

Read More

मानसी देशपांडे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून स्त्रीचं निघून जाणं म्हणजे त्याच्या आयुष्याची तप्तपदी झाल्यासारखं असतं. मनाची ही असह्य अवस्था पुरुष रडून सांगू शकत नाही किंवा असं म्हणूया की, ती तो व्यक्त करू शकत नाही. मी आज हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे, कवी ग्रेस यांची “ती गेली तेव्हा रिमझिम…” ही कविता. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात, “वियोगाची दहशत एका क्षणात रंगपंचमीची धुळवड करते…” मनातलं दुःख हे कवी ग्रेस  यांनी आपल्या कवितेतून अत्यंत काळजाला स्पर्श करणाऱ्या शब्दांतून मांडलं आहे – “ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता…” आयुष्यातून प्रिय व्यक्ती जेव्हा अचानक निघून जाते, तेव्हा मनाला सावरणं खूप अवघड असतं. कारण, त्या…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 जुलै 2025, वार : सोमवार भारतीय सौर : 23 आषाढ शके 1947, तिथि : चतुर्थी 23:59, नक्षत्र : धनिष्ठा 06:48 योग : आयुष्यान 16:13, करण : बव 12:33 सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ, सूर्योदय : 06:08, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 10.03 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाचा थकवा जाणवू शकतो. कार्यालयीन राजकारणापासून दूर रहा. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करायची असेल तर, आजचा दिवस शुभ…

Read More

डॉ. किशोर महाबळ “सर, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला काही गोष्टी सुचवू का?” एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गशिक्षक असलेल्या तरुण प्राध्यापकांना विचारले. प्राध्यापकांनी अर्थातच होकारात्मक प्रतिसाद दिल्यावर तो विद्यार्थी पुढे म्हणाला, “सर, तुम्ही आजकालच्या आधुनिक कल्पना स्वीकारल्या आहेत, पण आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली नाही. मला वाटते की, साध्याशा दिसणाऱ्या शर्ट, पँटऐवजी तुम्ही रोज अतिशय आकर्षक फॅशनेबल, ब्रॅण्डेड कपडे वापरायला सुरूवात करायला हवी. टू व्हीलर वापरण्याऐवजी तुम्ही लवकरच एखादी चांगली कारही खरेदी केली पाहिजे. शक्य असल्यास कार चालवण्यासाठी एखादा चालकही ठेवा.” या सगळ्या सूचना ऐकून प्राध्यापकांना मजा वाटली; पण त्यामागची कारणं मात्र त्यांच्या लक्षात आली नाहीत. म्हणून काहीशा उत्सुकतेनं त्यांनी विचारलं, “तुझ्या…

Read More

शैलेश विजया सोमनाथ महाजन प्रत्येकाच्या मनात अनेकदा द्वंद्व सुरू असते. प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’ नाटकातील ’ “To be, or not to be, that is the question…’ असाच काहीसा प्रकार सुरू असतो. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे, सामाजिक स्तरावरही असेच द्वंद्व सुरू असते. राष्ट्र उभारणीसाठी विरोध कोणाचा? तर आपलाच! आपल्याच देशातल्या नागरिकांचा, का? अज्ञानापोटी की अतिज्ञानामुळे? अहंकारापोटी? स्वार्थापोटी? की प्रवृत्तीच वाईट आहे, म्हणून! काम करायला नको, सर्व गोष्टी फुकट पाहिजेत अशा कामचोर लोकांचा? माझी, आमची सत्ता जाईल म्हणून? सर्व कारभार बिनबोभाट व्हावा म्हणून? सहज दुसऱ्यांना फसवून आपला स्वार्थ साधता येतो, की येत नाही म्हणून? की दुसऱ्यांशी लागेबांधे आहेत, म्हणून?…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष राशी या आठवड्यात आपल्या बोलण्यातून, वागण्यातून इतरांवर प्रभाव पडेल. रवी तृतीय स्थानी 16 जुलैपर्यंत आहे. त्यामुळे छोटे प्रवास घडू शकतील. रवी ग्रह हा गुरू ग्रहाबरोबर आहे. म्हणून तीर्थक्षेत्री प्रवास घडू शकेल आणि सकारात्मक उर्जा मिळेल. या आठवड्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. मुलांच्या बावतील काळजी राहील. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीशिवाय पर्याय नाही. वृषभ राशी या आठवड्यात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळू शकेल. तथापि, योग्य सल्ला घेऊनच त्याची पुन्हा गुंतवणूक करावी. मनाप्रमाणे नवीन खरेदी करू शकाल. अनपेक्षित प्रवास घडू शकतील. वाहने जपून चालवा. नोकरदारांनी नवीन योजना वापरल्यास त्यांचा त्यांना लाभ…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 जुलै 2025, वार : रविवार भारतीय सौर : 22 आषाढ शके 1947, तिथि : तृतीया 25.02, नक्षत्र : श्रवण 06:52 योग : प्रीति 18:00, करण : वणिज 13:27 सूर्य : मिथुन, चंद्र : मकर 18:53, सूर्योदय : 06:08, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कवयित्री इंदिरा संत टीम अवांतर जीवनातील स्वास्थ्यापेक्षा संघर्षावर श्रद्धा बाळगून भावकविता लिहिणाऱ्या इंदिरा संत यांचा आज स्मृतीदिन. स्वतःच्या अनुभवांचा अत्यंत संयत शब्दांमध्ये रेखीव आविष्कार…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे इंग्रजी उच्चाराप्रमाणे योगा म्हणून ओळखला जाणारा योगाभ्यास किंवा योग मुळात भारतातील प्रकार आहे. योग किंवा योगा करणे हा आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही तर, योग आपल्याला दैनंदिन ताण-तणावातून मुक्त करण्यासाठी प्रेरित करते. योगचे असे अनेक फायदे आहेत. योगमुळे शरीर लवचिक बनतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते. नियमित योग केल्याने आपले अंतर्मन शुद्ध होते… योगमुळे आपल्यात भरपूर प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, त्याचबरोबर स्वतःमध्ये कौशल्य विकसित होण्यास मदत होते. योग ही परिपूर्णतेची जननी आहे. धकाधकीच्या आयुष्यात कायम ताणतणावांना सामोरे जावे लागते. म्हणूनच, लहान वयातच उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास, हृदयविकाराच्या झटक्याचा धोका निर्माण होतो.…

Read More