Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 जुलै 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 2 श्रावण शके 1947; तिथि : अमावास्या 24:40; नक्षत्र : पुनर्वसु 16:43 योग : हर्षण 09:50; करण : चतुष्पाद 13:31 सूर्य : कर्क; चंद्र : मिथुन 10:58; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 दर्श अमावास्या दीप पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस अतिशय शुभ ठरणार आहे. आर्थिक बाबतीत भाग्य उजळेल. संपत्तीमध्ये वाढ होईल. व्यावसायिक जीवनात प्रगती होईल.…

Read More

अजित गोगटे व्यावसायिक पदाचा व्यक्तिगत लाभासाठी उपयोग (दुरुपयोग) न करणे, हेही पत्रकारितेच्या नीतिमूल्यांपैकी एक मूल्य आहे. इतर मूल्यांप्रमाणे या मूल्याचे पालन न करणारेही बरेच असतात. मात्र,, काही ‘वजनदार’ पत्रकारांनी या मूल्याचे अगदी कमालीचे अवमूल्यन करून स्वतःचे एक वेगळेच स्थान निर्माण केल्याचीही उदाहरणे आहेत. पत्रकारितेतील कौशल्याऐवजी सरकार दरबारी असलेल्या ‘वजना’मुळे असे पत्रकार नावलौकिक मिळवितात. असे पत्रकार आपल्या पदाचा वापर सरकार दरबारी अडकलेली कामे करून देणारे ‘दलाल`‘ म्हणून करतात. अनेक वर्षांच्या अनुभवाने त्यांची पत्रकार ही ओळख ‘दलाल’ या ओळखीत  मिसळून गेलेली असते. यापैकी काही बहाद्दर ज्यांच्याकडून काम करून घ्यायचे आणि ज्याचे काम करायचे अशा दोघांकडून ‘दलाली’ घेतात. काही गडबड झाली तर अडचणीत…

Read More

केतकी दातार “’आई’ अशी हाक जेव्हा तान्हुल्याच्या तोंडून एखादी स्त्री ऐकते तेव्हा तिला अगदी जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. जेव्हा स्त्री बाळाला जन्म देते तेव्हा तिचा पुनर्जन्म होतो, असं म्हणतात. या बाळामुळेच ती आई बनते. तिचं जीवन परिपूर्ण बनतं. अशा या आईची थोरवी सांगावी तेवढी थोडीच आहे,” असं म्हणून मीनाताईंनी आपलं भाषण संपवलं. पार्ल्यातील टिळक मंदिराचे सभागृह माणसांनी खचाखच भरलं होतं. ‘आई’ हा विषयच इतका संवेदनाशील, हळवा… आणि त्यात मीनाताईंची रसाळ वाणी! यामुळे श्रोतृवर्ग खूपच मंत्रमुग्ध झाला होता. आभार प्रदर्शनाच्या औपचारीक कार्यक्रमानंतर बरीचशी लोक निघून गेली. मीनाताई स्टेजवरून उतरल्यावर अनेकांनी त्यांना गराडा घातला. काहीजण त्यांची स्वाक्षरी घेत होते, तर काहीजण अभिनंदन…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील भागात मी योगबद्दल माहिती दिली होती. म्हणजे योग केल्याने आपल्या जीवनावर काय काय परिणाम होतो. योग केवळ व्यायाम नाही तर, ती एक संपूर्ण जीवनशैली आहे… योग म्हणजे शरीर, मन आणि श्वास यांचं एकत्रित आणि संतुलित कार्य… योग केल्याने मानसिक शांती मिळते, शरीर निरोगी आणि लवचिक बनते तसेच श्वासनक्रिया नियंत्रित राहते, एकाग्रता वाढते, झोप चांगली लागते. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र जोडणारा मार्ग आहे. योगमध्ये अनेक प्रकार आहेत. पण त्यातही प्राणायाम हे प्रमुख म्हणता येईल. प्राणायाम म्हणजे श्वास घेण्याची आणि सोडण्याची योग्य पद्धत.. हे केल्याने आपला श्वास मोकळा होतो आणि मन शांत राहतं…. प्राणायाम रिकाम्या…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 जुलै 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 1 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्दशी 26:28; नक्षत्र : आर्द्रा 17:54 योग : व्याघात 12:33; करण : विष्टी 15:32 सूर्य : कर्क; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:17 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. आपले काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. आपल्या वेळेची किंमत समजून घ्या.…

Read More

चंद्रशेखर माधव साधारण 25 वर्षांपूर्वीची घटना आहे…. मी महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षाला शिकत होतो. आम्हाला समाजशास्त्र विषयाला शिकवणारे एक प्राध्यापक होते. आम्हाला त्यांचा आदर होता आणि त्यांच्याशी खूप जवळीकही होती. सरांमुळेच आम्हाला ट्रेकिंगची गोडी लागली. सुरुवातीला छोटे-छोटे एक-दोन ट्रेक केल्यानंतर सरांनी आम्हाला हरिश्चंद्रगडला दोन रात्र, तीन दिवसांचा ट्रेक करण्याबद्दल सुचवलं. आम्ही लगेच तयार झालो. आमच्यासोबत आमच्यापेक्षा एक वर्ष मागे असलेले दहा ते पंधरा मुलं-मुली असा एक गट येणार होता. आम्ही तीन मित्र – मी, रमेश, सोहन – आणि सरांच्या परिचयातील एक 30 ते 32 वयाची स्त्री, असे आम्ही चार जण जरा मोठे होतो. त्याकाळी धरण बांधलेले नव्हतं. त्यामुळे खुबी फाटा…

Read More

सीए रसिका महाबळ प्राप्तिकर (Income Tax) भरणे हे प्रत्येक करदात्याचे कर्तव्य असून त्यात योग्य नियोजन केल्यास कायदेशीररीत्या कर सवलत घेता येते. भारत सरकारने करदात्यांना काही विशिष्ट खर्च आणि गुंतवणूक यावर वजावट (Deduction) देण्याची तरतूद केली आहे, जी जुन्या कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये वजावट आणि सूट यांच्या आधारे कर आकारणी केली जाते. या प्रणालीत कलम 80C ते 80U अंतर्गत विविध प्रकारच्या सवलतींचा समावेश आहे, जसे की जीवन विमा हप्ता, भविष्य निर्वाह निधी (PPF), शिक्षण कर्ज व्याज, आरोग्य विमा हप्ता इत्यादी. या लेखात आपण जुनी कर प्रणाली निवडल्यास कोणकोणत्या सवलती उपलब्ध आहेत, त्या कोणत्या कलमांअंतर्गत येतात आणि त्यांचा लाभ…

Read More

सायली कान्हेरे आज कोबी पोहे बनविण्याची रेसिपी सांगणार आहे. हे पोहे माझ्या सासूबाईंची स्पेशालिटी आहेत. नेहेमी करत असलेल्या पोह्यांपेक्षा हे पोहे चवीला छान लागतात. यात घातलेल्या कोबीला अजिबात उग्र वास येत नाही. कोबी पोहे साहित्य – 2 वाट्या पोहे, 1 वाटी बारीक चिरलेली कोबी, 4 मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, मीठ, साखर (चवीनुसार), लिंबू – 1/2 पुरवठा संख्या – दोघांसाठी तयारीस लगणारा वेळ – साधारणत: 15 मिनिटे शिजवण्याचा वेळ – कोबी शिजण्यासाठी 7 मिनिटे, बाकी सुमारे 10 मिनिटे एकूण वेळ – सुमारे 17 मिनिटे कृती प्रथम पोहे भिजवून घ्यावे. मग त्यावर चवीनुसार मीठ आणि…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 जुलै 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 31 आषाढ शके 1947; तिथि : द्वादशी 07:05, तृयोदशी 28:39; नक्षत्र : मृगशीर्ष 19:24 योग : ध्रुव 15:32; करण : गरज 17:51 सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:18 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 भौमप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – सहकारी आणि वरिष्ठांच्या पूर्ण सहकार्यामुळे कार्यालयीन काम फत्ते होईल. तसेच, पूर्वीच्या प्रकल्पात मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. आज धन तुमच्या हातात…

Read More

सुहास गोखले सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हणण्याची रूढी होती. परंतु, आकाशातील अशा 88 मांडण्यांना आता जागतिक स्तरावर ‘तारकासमूह’ (Constellations) म्हणून ओळखले जाते. एकूण 27 नक्षत्रे आहेत, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी त्यांची नावे आहेत. ही सगळी नक्षत्रे चंद्राच्या आकाशातील मार्गावरच अचूकपणे येतात असे नाही. काही नक्षत्रे या मार्गापासून प्रत्यक्षात बरीच दूर आहेत. उदाहरणार्थ हस्त, स्वाती, श्रवण, धनिष्ठा. या विषयीच्या लेखमालेत आतापर्यंत आपण 18 नक्षत्रांची माहिती घेतली. या लेखात…

Read More