Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥1॥ मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥1॥ तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥2॥ जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले । तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥3॥ म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 ऑगस्ट 2025; वार : रविवार भारतीय सौर : 26 श्रावण शके 1947; तिथि : नवमी 19:24; नक्षत्र : रोहिणी 27:17 योग : व्याघात 25:39; करण : तैतील 08:28, वणिज 30:21 सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:05 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 आदित्य पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – Unethical values of journalism : व्यवसायाची लाज घालविणारे वर्तन! दिनविशेष थोर हुतात्मा मदनलाल धिंग्रा टीम अवांतर भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील थोर हुतात्मा मदनलाल…
डॉ. प्रिया गुमास्ते वसंत (Spring) हा शिशिर ऋतूनंतर येणारा आदान काळातील दुसरा ऋतू. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत! शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा – त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा म्हणजे वसंत ऋतू. महिने – चैत्र आणि वैशाख (Mid March to Mid May) भारतासारख्या अतिविशाल देशात, नैसर्गिक वैविध्यामुळे, निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ-फाल्गुन, काही ठिकाणी फाल्गुन-चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र-वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. ऋतू वर्णन वसन्ते च समागत्य नराः कुसुमोत्सवम्। कुर्वन्ति परमां प्रीतिं, वनं दृष्ट्वा मनोहरम्॥ अर्थ – वसंत ऋतूच्या आगमनामुळे सर्व मनुष्यगण फुलांचे उत्सव साजरे करतात. सुंदर जंगले बघून सर्वजण…
रविंद्र परांजपे मागील लेखात आपण मानसिक ताणतणावांचे शरीर-मनावर होणारे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणार्थ काय करायला हवे, याबाबत जाणून घेणार आहोत. मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन मानसिक ताणतणाव हे सर्व मनोकायिक समस्यांचे मूळ कारण आहे. मानसिक ताणतणावांमुळे व्यक्तीचे जीवन वेदनामय होते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन ताणतणावमुक्त असावे, असे वाटत असते. यासाठी ताणतणावांचे सुव्यवस्थापन करणे नितांत आवश्यक आहे. ताणतणाव सुव्यवस्थापन मानसिक ताणतणाव येऊ नये आणि काही कारणास्तव आलाच तर, त्यास यशस्वीरीत्या कसे तोंड द्यायचे, यासाठी आपण केलेला विश्लेषणात्मक अभ्यास आणि प्रयत्नपूर्वक उचललेली पावले, यांचा समावेश मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन या प्रक्रियेत करता येईल. हेही वाचा – Mental Health…
परिणिता रिसबूड आजकाल मी आयुष्य आजकाल मी आयुष्य वाईंडप करायला घेतलंय खूप झाले जमा खर्च, खूप झाल्या रीतीभाती नको त्या गोष्टींनी जीवन वेढलंय आजकाल मी आयुष्य वाईंडप करायला घेतलंय एकदा मनसोक्त झोप काढायची आहे सकाळची न्याहारी दुपारी करायची आहे काहीही न करता दिवस घालवायचा आहे रुटीनच्या नावा खाली जीवन बांधलंय आजकाल मी… एकदा नुसते विनाकारण हिंडायचे आहे मैत्रिणीच्या घोळक्यात रमायचे आहे हातावरचे घड्याळ बाजूला ठेवायचे आहे काळवेळेचे चक्र जीवन पोखरत बसलंय आजकाल मी… पाहायचा राहिलाय निसर्गाचा सोहळा पानाची पानगळ आणि फुलांचा बहर आत दडलेले फुलपाखरु मोकळे सोडायचे आहे शोभेल का हे असे वागणे या विचारताच जीवन अडकलंय आजकाल मी… काय…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला देवा हें विविध कानीं ऐकिजे । परि अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारी पां ॥262॥ अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ॥263॥ जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेकुलें । घडले आम्हा ॥264॥ यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः । धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन् मे क्षेमतरं भवेत् ॥46॥ आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 ऑगस्ट 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 25 श्रावण शके 1947; तिथि : अष्टमी 21:34; नक्षत्र : कृत्तिका 28:38 योग : वृद्धी 07:20, ध्रुव 28:27; करण : बालव 10:41 सूर्य : सिंह; चंद्र : मेष 11:43; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:05 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 अश्वत्थमारुती पूजन गोपाळकाला कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. कामाचा…
लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण काही घरगुती उपाय पाहिले, आता या लेखात सुद्धा आपण अजून काही घरगुती उपाय पाहू. बदाम, खसखस, चंदन या साहित्यापासून बनवलेले mask हे पूर्वापार वापरले जातात. या mask चा उपयोग Whitening आणि Nourishing साठी जास्त होतो. बदाम हा तेल, दूध, पावडर, उगाळून या कुठल्याही प्रकारे Mask मध्ये वापरता येतो. बदाम, खसखस यांच्या वाटलेल्या मिश्रणात भरपूर तेल आणि प्रथिने असतात. तर, चंदनाचा लेप हा थंडाव्यासाठी वापरला जातो. या तिघांची पावडर समप्रमाणात घेऊन त्यात दूध / साय / मध / तूप हे घालून चेहऱ्याला लावावे. कोरडे झाले की, चेहरा धुवून टाकावा. चेहऱ्याची त्वचा तजेलदार होऊन मुलायम व्हायला मदत…
आराधना जोशी शिक्षक म्हणून ज्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांमध्ये वावरत असतो, त्यावेळी कळत-नकळतपणे संवादाचे अनेक तुकडे आमच्या कानावर येतात. मित्र किंवा मैत्रिणीला साधी हाक मारतानाही सुरुवातीला ‘साल्या’ किंवा ‘साली’ आणि नंतर नाव उच्चारलं जातं. ‘ही शिवी नाहीच आहे मॅम,’ अशीही माझी समजून घालण्यात आली. ‘अशी हाक मारली तर अत्यंत जिव्हाळा दिसून येतो!’ या एकमतानं दिलेल्या उत्तरावरून विद्यार्थ्यांची मानसिकता कशी बदलत चालली आहे, याचा प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे ‘च्या आयला’ ही शिवी नसून भावना व्यक्त करण्याचं माध्यम असल्याचंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जितक्या सहजपणानं ‘आई गं’ किंवा ‘अरे बापरे’ म्हणता तेवढ्याच सहजपणे आम्ही ‘च्या आयला’ म्हणतो, असा युक्तीवाद विद्यार्थ्यांनी केला. याच पठडीतील एक घटना…
शैलेश विजया सोमनाथ महाजन बरेच दिवस असली आणि नकलीबद्दल एक विचार मनात येत होता, पण लेख स्वरूपात लिहिण्याचा योग आज श्री गणेशाच्या कृपेने आला. जेमतेम 10 ते 12 दिवसांनी गणेशोत्सव येईल आणि त्या दिवशी आपण घराघरात श्री गणेशाची मूर्ती आणून त्याची स्थापना करू. तर मुद्दा असा की, ही श्री गणेशाची मूर्ती कशी बनवतात? तुम्ही म्हणाल काय हा प्रश्न आहे! प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू माती साच्यात घालून आणि नंतर रंगवून मूर्ती बनवतात. आम्ही जाता-येताना रस्त्यारस्तांवर असलेले श्री गणेश मूर्तीचे कारखाने बघतो की! होय, हे खरं आहे. पण कोणतीही मूर्ती बनवताना आधी शाडू किंवा चिकण मातीची मूर्ती हातांनी बनवतात आणि नंतर तिचा…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 510
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

