आपल्या जेवणाचे ‘ताट’ आरोग्याला पूरक आहे का? सकस आहाराबरोबरच त्याचे संतुलनही महत्त्वाचे आहे. त्यानुसार ताट वाढण्याची पद्धतही आहे. डाव्या बाजूचे प्रमाण 15 टक्के गृहीत धरले तर उजव्या बाजूचे प्रमाण 85 टक्के आहे. जे पदार्थ आपल्या आरोग्याला अधिक हवे आहेत, ते जेवणाऱ्याच्या उजव्या बाजूला क्रमाने म्हणजे पातळ भाजी, फोडीची भाजी, वरण /आमटीची वाटी, आपल्या समोर -ताटाच्या परिघावर मध्यभागी मीठ ( अगोदरच न वाढता वाटल्यास कमीत कमी वापर करावा.) असावे. आता जेवणाऱ्याच्या डाव्या हाताकडून पातळ कोशिंबीर, नंतर चटणी (वाटल्यास लोणचे) असावी. उजव्या बाजूला पोळी, मध्यात मूदभर भात, त्यावर वरण, साजूक तूप आणि शेवटी दही-भात…
आपल्या उजव्या बाजूचे पदार्थ आपण अधिक खातो. ते आवश्यकही असतात. डाव्या बाजूच्या चटण्या कोशिंबीरी कमी खाल्ल्या जातात. त्या तितक्याच पुरेशा असतात. चवी पुरतं लोणचं आणि गोड पदार्थ असावा.
हेही वाचा – सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!
रात्री सुद्धा असेच घटक, पण सकाळपेक्षा कमीच असू द्या. बस्, परिवाराचे किमान एकवेळचे जेवण तरी एकत्रित झाले पाहिजे.
ओम सहना ववतु…सहनौ भुनक्तु… सहवीर्यं करवावै..
तेजस्विना वधीतमस्तु…
माविद् षा वै… ॐ शांती शांती शांती…
भावार्थ…
(या अन्नामुळे) आपण एकत्र विकसीत होऊया. तेजस्वी, वीर्यवान साहसी, धाडसी बनूया. आमच्यामध्ये परस्पर द्वेषाला थारा नसू दे… शांतीमय वातावरण असू दे…
ताटातील अन्न प्रसाद समजून पान स्वच्छ रहावे.
शुभं भवतु..
हेही वाचा – वाढते वजन… टेन्शन लेने का!
पुढील भागात अन्नप्रक्रियेतील विज्ञान…
मोबाइल – 9921 548 851
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


