Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….
    ललित

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    शोभा भडकेBy शोभा भडकेApril 13, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, राम सिया विवाह, शिव आराधना विवाह, शिव आरू विवाह, आरूचे कन्यादान, सियाचे कन्यादान, शिवने आरूला मंगळसूत्र घातलं, रामने सियाला मंगळसूत्र घातलं,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link
    भाग – 22

    खूप वेळ आरू रडत होती. बऱ्याच वेळानंतर भावनाने तिला उठवून बेडवर बसवलं आणि तिला पाणी पाजलं. भावनाच्या मांडीवर डोक ठेवून आरू तशीच शून्यात नजर लावून बसली होती… भावना तिच्या केसांत हात फिरवत होती… कधीतरी उशिरा तिला तशीच झोप लागून गेली…

    आज लग्न होतं. सगळ्यांची घाईगडबड सुरू होती. मंडप सजला होता. सनई चौघड्याचे सूर सगळीकडे घुमत होते. डीजेवर गाणी वाजत होती. लहान-मोठी मुले त्यावर नाचत होती…

    राम आणि शिवची वाजतगाजत वरात निघाली होती, घोड्यावर बसून… ते मारुत च्या मंदिरात दर्शन करून लग्नमंडपात येणार होते. इकडे आरू आणि सिया, त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये तयार होत होत्या…

    “वॉव दि! खूप सुंदर दिसतेस तू…” पूर्वी आरशातून सियाकडे पाहात हसून म्हणाली.

    त्यावर सिया गालात हसली… आज सियाच्या चेहऱ्यावर ग्लो चढला होता… तिच्या डोळ्यांत आनंद झळकत होता… शेवटी आज तिला तिचं प्रेम मिळणार होतं! इतक्या वर्षाचा विरह आज संपणार होता. ज्याच्यावर प्रेम होतं, तो आज तिचा नवरा होणारं होता… भलेही नशिबाने तिच्यासोबत अजीब खेळ खेळला होता… दुसरे पणा तिच्या नशिबी आला होता, पण तिला खात्री होती, राम तिला या गोष्टीची जाणीव देखील होऊ देणार नाही… भलेही सध्या तो रागात असला तरी! त्याच्या रागाचं कारण माहीत नाही… तरीही तो तिला त्रास होईल, असं वागणार नाही, याची खात्री होती. त्यामुळे तिने सगळ्या गोष्टी बाजूला सारून, हे लग्न मनापासून स्वीकारण्याचा प्रयत्न ती करणार होती.

    हेही वाचा – राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    तसं तर हे सोपं नव्हतं. पाहिल्या लग्नातून मिळालेल्या जखमा खूप खोलवर होत्या. कठीण होतं सगळं विसरून नवी सुरुवात करणं… पण ज्याच्यासोबत ती नवीन सुरुवात करणारं होती, तो तिला यातून सावरण्यासाठी पुरेपूर साथ देणार याची खात्री होती…

    त्या उलट आरू आज उदास होती. सुरुवातीचे काही दिवस तिच्यासाठी त्रासदायक होते. असं अचानक लग्न करावं लागतंय म्हणून होणारा त्रास! स्वप्न अधूरं राहण्याची खंत… काहीही चूक नसताना झालेली बदनामी… यामुळे ती तणावात होती. पण यातूनही काहीतरी चांगलं होत होतं. तिच्या दादाचं अपूर्ण राहिलेलं प्रेम त्याला मिळणार होतं… म्हणून तिने स्वतःला सावरलं होतं…. हे लग्न देखील ती स्वीकारत होती!

    पण कालच कळलेल्या त्या सत्याने ती हादरून गेली होती. ज्याच्यासोबत तिचं अख्खं आयुष्य जाणार होतं, तोच तिच्या त्रासाचं कारण होता! ज्या इज्जतीसाठी ती आयुष्यभर जपून वागत आली होती, ज्या बापासाठी इज्जत जीवापलीकडे महत्त्वाची होती, तीच इज्जत तिच्या या होणाऱ्या नवऱ्याने धुळीत मिळवली होती! त्याच्यामुळे तिच्या भाऊंना जगासमोर मान खाली घालावी लागली होती आणि त्यासाठी ती शिवला कधीच माफ करणारं नव्हती.

    दोघीही तयार होऊन बसल्या होत्या. बस, आता बोलावणं येण्याची प्रतीक्षा आणि दोघी लग्नमंडपात हजर होणार होत्या. दोघींच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणारं होती…

    “चला लग्नाची वेळ झाली.. नवरीच्या मामाने नवऱ्या मुलींना घेऊन यावे…” भटजींनी माइकवर घोषणा केली. तसं दोन्ही नवऱ्यामुली लग्नमंडपात आल्या… अर्थात मामाच घेऊन आले. शिव आणि राम आधीच तिथे उपस्थितीत होते. दोघांची नजर त्या दोघींवर गेली तसं त्यांना कसं रीॲक्ट करावं, ते कळेना. खरंतर, सियाला पाहून शिवला समाधान वाटलं होतं, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून!

    त्यात ती दिसतही खूप छान होती. नऊवारी साडी… पारंपरिक दागिने… अंबाडा अन् त्यात माळलेले गजरे… तिला नवरीच्या वेशात सजलेलं पाहून त्याचा ऊर भरून आला होता… हलकेच डोळ्यांच्या कडा पाणावल्या…

    परदेशातून आला तेव्हापासून उदासीनता तिच्या चेहऱ्यावर तो पाहात आला होता, पण आज तिच्या चेहऱ्यावर ती उदासीनता नव्हती आणि तिचा तो आनंदी चेहरा पाहून, आपण जे केलं ते योग्यच केलं. असं त्याला वाटलं.

    त्याच विचारांबरोबर त्याची नजर आरूवर गेली आणि आता जे समाधान त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या बहिणीला पाहून पसरलं होतं, ते जाऊन अपराधीपणाची भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागली आणि त्याला स्वतःचाच राग आला. स्वतःच्या स्वार्थासाठी आपण आरूला त्रास दिला होता. तिचा आज जो उदास चेहरा आहे, त्याला तो स्वतः कारणीभूत होता.

    आज तिचं लग्न होतं. एका मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे तिचं लग्न! जिथे ती नवीन स्वप्न मनाशी बाळगून, नव्या आयुष्यात प्रवेश करणार असते… एकीकडे माहेर सुटण्याच दुःख तर दुसरीकडे नवीन नाती ती बनवणार असते, आपल्या साथीदारासोबत! गुलाबी स्वप्नांचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर असतो…

    पण आरूच्या ना मनात असे विचार होते, ना चेहऱ्यावर दिसत होते… तिनेही सियाप्रमाणेच साजशृंगार केला होता… थोड्याफार फरकाने दोघी सारख्याच सजल्या होत्या… पण कमी होती ती, त्या स्माईलची! आरूच्या डोळ्यांत दुःख होतं…

    रामचीही अशीच अवस्था होती.  पण त्याने आहे ते स्वीकारलं होतं. त्याला शिवची खात्री पटली होती की, तो आरूला खूश ठेवेल… त्याने शिवच्या डोळ्यात आरूसाठी प्रेम बघितलं होतं… आपल्या बहिणीच्या सुखासाठी दाखवलेला स्वार्थीपणा, केलेला अपराध त्याने प्रामाणिकपणे मान्य केला होता. बाकी आरूचा पण स्वभाव त्याला माहीत होता आणि शिव तिला सांभाळू शकेल, असं त्याला वाटत होतं. पण आपली नाराजी मात्र तो सोडत नव्हता… त्याला खरंच यावेळी आरूचा राग आला होता. पण तिने त्याच्या सुखासाठीच हे सगळं केलं होतं… एकंदरीत काय तर, आरू आणि शिव दोघे सारखेच भासले त्याला! आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतात… बाकी या सारख्या स्वभावाचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार होता, ते तर येणारा काळच ठरवणार होता…

    सगळ्यांचे आपापले विचारचक्र सुरू होते…

    “चला, विवाह सोहळा संपन्न झाला… आता एकमेकांना हार घाला…” भटजी म्हणाले.

    तसं हे चौघेही भानावर आले… एकमेकांकडे पाहिलं… नजरानजर झाली… आरू आणि सियाने आधी हार घातले. मग शिव आणि रामने हार घातले… अन् ढोल-ताशांचा आवाज आला… त्या चौघांवर फुलांचा वर्षाव होऊ लागला. त्यांच्यासोबत समर, पूर्वी, साधना, भावना, पवन, आकाश हे सगळे होते… सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता… तिकडे तुळशीला पाणी घालणाऱ्या दोन्ही आयांच्या डोळ्यांत पाणी होतं… सखाराम भाऊ सुद्धा भरल्या डोळ्यांनी पाहात होते…

    सखाराम दिनकररावांसमोर आले आणि भरल्या डोळ्यांनीच त्यांना हात जोडत म्हणाले, “साहेब, माझी लेक आता तुमची झाली. काळजी घ्या साहेब. काही चुकलंमाकलं तर, मोठ्या मनाने माफ करा. आमची इज्जत राखून लई उपकार केलेत तुम्ही…”

    “हं… आम्ही केलेल्या उपकारांची जाणीव ठेवा फक्त, बाकी सगळं होतंच राहील! तुमच्या मुलीला काहीच त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊच, पण तुम्हीही आमचं बोलणं लक्षात ठेवा आणि अंमलात आणा…” दिनकर कोरड्या स्वरात आणि ताठ्यात म्हणाले.

    ” हो, हो, लक्षात ठेवीन,” सखाराम अडखळत म्हणाले.

    स्टेजवरून शिवची नजर या दोघांवर गेली, तसं त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या… कारण, सखाराम यांच्या चेहऱ्यावर हतबलता दिसत होती आणि दिनकररावांच्या चेहऱ्यावर काहीतरी जिंकल्याचा भाव होता… त्याला चांगलंच माहीत होतं की, दिनकरराव या लग्नाने विशेष खूश नाहीत आणि… आणि आता त्या दोघांचे असे भाव त्याला खटकले…

    “चला, कन्यादान आणि पुढच्या विधींसाठी… वधू-वरांनी इथे समोरासमोर बसा आणि दोन्ही आई-वडिलांनी पण इथे या…” भटजी म्हणाले. तसं शिव आराधना आणि राम सिया या दोन्ही जोड्या शेजारी शेजारी पाटावर बसल्या. ते जसजसं सांगतील तसतसं या दोन जोड्या करत होत्या… समोर ताटात मंगळसूत्र, जोडवी, कुंकवाचं पंचपाळं… सौभाग्याचं लेणं असलेल्या या वस्तू मस्त सजवून ठेवल्या होत्या… सियाची नजर त्या ताटावर गेली आणि पुन्हा तिच्या पाहिल्या लग्नाच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. तिने शेजारी बसलेल्या रामकडे पाहिलं आणि तिचे डोळे भरून आले… राम तिच्याकडेच पाहात होता… तिच्या डोळ्यात पाणी पाहून त्याला कसंतरीच झालं. तिच्या डोळ्यातले भाव त्याला कळत होते… त्याने डोळ्यांनीच तिला धीर देत, ‘रडू नकोस’ असा इशारा केला आणि अलगद तिच्या हातावर हात ठेवला…

    त्याच्या तेवढ्या कृतीनेही तिला जणू आधार मिळाला होता… त्याचा स्पर्श आश्वासक होता… तिने अलगद डोळे मिटले अन् मनोमन ठरवलं, आता मागच्या आठवणींना माझ्या पुढील आयुष्यावर  हावी होऊ द्यायचं नाही…

    पंडितजींनी दोन्ही मंगळसूत्रांना हळद-कुंकू लावून त्या दोघांच्या हातात दिले आणि नवऱ्या मुलींच्या गळ्यात घालायला सांगितलं, आधी रामने सियाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं… आणि मग शिवने ते समोर ठेवलेल मंगळसूत्र हातात घेतलं आणि आरूकडे पाहिलं तर ती नजर खाली ठेवून निर्विकारपणे बसली होती… शिवने सुस्कारा सोडत ‘नाही’ अशी मान हलवली आणि पुढे होऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं.

    मंगळसूत्र घालताना मागून मानेला त्याच्या थंडगार हातांचा स्पर्ष झाला, तसा तिच्या अंगावर शहारा आला… आणि तिने मान आकसून घेतली… शिवला पण ते जाणवलं… तसा हलकासा हसला आणि पुन्हा एकदा जाणूनबुजून हात मागे घेताना तिच्या मानेवरून फिरवला…

    तसं आरुने ओठ दाबून घेत डोळे मिटून स्वतःच्या हृदयाचे वाढणारे ठोके कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अस करण्याने तिच्या अंगाची थरथर होत होती… तिला समजत नव्हतं काय होतंय तिला… आणि तिची ही धांदल शिव मात्र एन्जॉय करत होता… पण एवढं सगळं होऊनही आरूने त्याच्याकडे नजर वर करून पाहिलं नव्हतं!

    आता एक एक करून पुढचे विधीही पंडितजींनी उरकून घेतले… या सगळयात राम-सियाच्या नजरेचे खेळ सुरू होते तर, दुसरीकडे आरूने एक नजर आपल्याकडे पाहावं म्हणून शिव तिला जाणूनबुजून स्पर्श करत होता… त्याच्या स्पर्शात होता तो फक्त खट्याळपणा! काहीही करून तिने एकदा आपल्याकडे पाहावं, असं त्याला वाटत होतं, पण त्याला माहीत नव्हतं की, आरु किती महाजिद्दी आहे ते! ते त्याला हळूहळू कळणारच होतं… आणि त्यात तिची जी दमछाक होणार होती. त्याची तर त्याला कल्पनाच नव्हती…

    आता कन्यादानासाठी त्यांच्या आई-वडिलांना बोलावण्यात आलं. आधी सियाचं कन्यादान करण्यात आलं. त्यात भटजींनी सांगितलं तसं दिनकर यांनी सियाचा हात रामच्या हातात दिला… खाली तांब्याचे भांड मांडल होतं सुधा यांनी सियाला हळद-कुंकू लावलं… तसंच दिनकर यांनी रामला कुंकवाचा टिळा लावला आणि मग त्या दोघांच्या हातात शगून म्हणून अकरा रुपये ठेवून त्यावर हळद, कुंकू, अक्षता टाकून, मग त्यावर पाणी सोडलं… भटजींनी मंत्रोच्चार करत कन्यादान विधी संपन्न झाला, असं घोषित केलं.

    यावेळी दिनकरराव आणि सुधा या दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. सिया त्या दोघांकडे पाहात होती. तिच्या पण डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. दिनकररावांनी तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिला हलकेच थोपटले आणि उठून निघून गेले… ते गेले त्या दिशेला शिव आणि सिया दोघेही पाहात होते…

    हेही वाचा – शिवने रामकडे काय कबुली दिली?

    पदराने डोळे पुसत सुधा रामला, “माझ्या मुलीची काळजी घे,” असं म्हणून त्याही बाजूला झाल्या…

    मग आरू आणि शिवचा देखील त्याच पद्धतीने कन्यादान विधी झाला… आरूसाठी पण हा भावूक क्षण होता… तिच्या डोळ्यांतून तर पाणी थांबायच नावच घेत नव्हत .. ती रामकडे पाहून रडत होती… तिच्या रडण्याचा आवाजही वाढला होता. तसं कलावती यांनी तिला डोळे वटारून शांत बस म्हणणं सुरू केलं, पण ती नेहमीसारखं त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रामकडे पाहून रडत होती…

    भटजींचं काम झालं होतं… त्यांनी त्यांचं सामान गोळा केलं आणि दानदक्षिणा घेऊन तिथून निघून गेले.

    “आरु, अगं किती रडणार आहेस? अजून तुझ्या पाठवणीला वेळ आहे ना? थांबव बरं हे रडणं,” भावना तिला समजावत होती. तरी तिचं लक्ष फक्त रामकडे होतं आणि राम तिच्याकडे अजिबात पाहात नव्हता…

    आता आरूच्या रडण्याचा आवाज ऐकून सगळे तिच्याजवळ जमले होते..

    क्रमशः
    Avatar photo
    शोभा भडके

    मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

    Related Posts

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026 ललित

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026 ललित

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    एक थी बुलबुल…

    By मधुर सुनील कुलकर्णीApril 12, 2026

    चहा करताना मुक्ताच्या हातून साखरेचा डबा खाली पडला, सगळी साखर जमिनीवर सांडली… “आज मला घाई…

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026

    IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?

    April 12, 2026

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    April 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 266
    • अवांतर 180
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 3
    • पंचांग आणि भविष्य 383
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 550
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.