Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याची संधी मिळायलाच हवी…

    May 2, 2026

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…
    फिल्मी

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 16, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अभिनेत्री उषा नाडकर्णी, उषा नाडकर्णींची माणुसकी, उषा नाडकर्णींची इमेज, उषा नाडकर्णींची प्रतिमा, उषा नाडकर्णींबद्दलची चर्चा, उषा नाडकर्णींबद्दल प्रतिकूल चर्चा, उषा नाडकर्णींबद्दल अफवा, उषाताई आणि मी, लेकीचे लग्न, उषा ताईंचा पाहुणचार,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    आज माझ्या खूप लाडक्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहे. माझ्या लेकीने एकदा मला विचारलं, “आई, उषा कशी आहे गं?” मी ओरडलेच तिला… “अगं त्या काय तुझ्या वयाच्या आहेत का? किती मोठ्या आहेत, वयाने, मानाने! अरे तुरे करतेस त्यांना? मी पण त्यांना ‘अहो, उषा ताई’ म्हणते.” यावर लाडकी लेक म्हणते कशी, “आई, उषा तुझ्या आईपेक्षा एक दोन वर्षांनी लहान असेल म्हणून काय मी तिला आजी म्हणायचं का? बरं, तुझी मैत्रीण म्हणून मी तिला मावशी पण नाही म्हणणार. कारण ती आजी मटेरियल किंवा मावशी मटेरियल नाहीये. She is so cooool… आणि मी तिला उषा म्हणते, ते तिला चालतं. तुला काय प्रॉब्लेम आहे?” झालं माझं तोंड बंद! पण हे आजी मटेरियल, मावशी मटेरियल म्हणजे काय ते मला कळत नाही बाई. खरंतर, उषा ताई कळणंच कठीण आहे…

    आता उषा ताई म्हणजे कोण? तर जगप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी. मराठी आणि हिंदी मनोरंजनाच्या दुनियेत धुमधडाका गाजवणाऱ्या अभिनेत्री… आऊ अशी ओळ असलेल्या माझ्या उषा ताई. सहज सुंदर अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणा ही त्यांची खासियत! त्यामुळे इंडस्ट्रीत त्यांना फाटक्या तोंडाची म्हणणारे जास्त आहेत. To the point बोलणे… उगाच कोणाशी लाडे लाडे वागणं नाही… अशी ही स्वच्छ मनाची बाई. उगाच मनात एक ओठात एक हे त्यांना कधी जमणारच नाही. पडद्यावर खाष्ट, कजाग भूमिका करत असल्या तरी त्या स्वभावाने एकदम कूल आहेत…

    हेही वाचा – दोन वेण्या अन् रीमा दिदी…

    लोक त्यांना किती ओळखतात माहीत नाही, पण त्यांच्याशी फारशी ओळख नसलेली माणसे सुद्धा विनाकारण त्यांच्याबद्दल वाईट बोलत असतात, चुकीचं पसरवत असतात. हे चालूच असतं. पण ते हा विचार नाही करत की, आपण आपली करमणूक करतोय, पण आपल्या बोलण्याचा त्या बाईवर काय परिणाम होत असेल!

    बरं, मधे केवढा तो वाद की, त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहात नाही. त्या एकट्याच राहतात… ठिकाय नं, त्यांनी स्वतःच सांगितलं होतं ते. त्याच्यावरून कोण कोण काय काय बोलले!

    उषाताई बँकेत नोकरी करून ॲक्टिंग करायच्या. तेव्हा त्या काय, लहान मुलाला पाठीवर बांधून नोकरी, नाटकाच्या तालमी, प्रयोग, शूटिंगला जाणार होत्या का? हक्काचे आजी आजोबा असताना पाळणाघरात तरी का ठेवायचं? त्यामुळे त्यांचा मुलगा आजी, आजोबा, मामा यांच्या सोबत वाढला. काय चुकीच आहे? लोकांना बोलायला काय जातं? बोलून मोकळे होतात, पण कोणाच्या गरजेला मदत करतात का? नाही. हो, मी उषा ताईंबद्दल वाईट बोलू शकत नाहीच, पण ऐकूही शकत नाही. येतो मला राग…

    माझ्या लेकीचं लग्न होतं, तेव्हा त्या म्हणाल्या, “मी लग्नाला येणार.” त्यावेळी कोरोनाने थैमान घातले होते. मी आणि माझी बहीण त्यांना पत्रिका द्यायला गेलो होतो. आईस्क्रीम देऊन त्यांनी पाहुणचार केला. सगळं घर दाखवलं. खूप खूश होत्या. निमंत्रणाला मान देऊन त्या लग्नालाही आल्या… मस्त पैठणी नेसून तयार होऊन घरच्या लग्नाला यावं तशाच! मास्क मात्र लावला होता, तेव्हाची ती गरजच होती. इतर नातेवाईकांप्रमाणेच त्या लग्नाच्या हॉलमध्ये बसल्या होत्या… कसल्याही विशेष पाहुणचाराची अपेक्षा न करता! जो तो “अगं बाई उषा नाडकर्णी?” म्हणत होता… कौतुकच वाटत होतं सगळ्यांना. मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता. उपवास म्हणून त्यांनी काहीच खाल्लं नाही, याचं मात्र आम्हाला वाईट वाटलं… कोरोना पसरलेला असताना, आता तुम्हीच सांगा काय गरज होती, त्यांना माझ्या मुलीच्या लग्नाला यायची? पण त्या आल्या. त्या खरंतर प्रेमळ आहेत… माणुसकी तर एवढी भरलीय की, त्यांना ओरडावे लागते. किती लोकांना त्यांनी आर्थिक मदत केली. अशी लोक की, जे पैसे तर परत करत नाहीत वर तोंडही लपवतात आणि त्यांच्याबद्दल वाईट-साईट पसरवतात.

    हेही वाचा – मानो या ना मानो…

    त्यांची नात, मुलाची मुलगी उड्या मारत असताना पडली, उठलीच नाही. या घाबरल्या… तिला उचललं तर, पोट्टी म्हणते कशी, “मी ॲक्टिंग करत होते!” म्हटलं, “घ्या, उषाताई लेकाने नाही, पण नातीने घेतला तुमचा गुण…” त्यांचा फोन आला की, माझा नवरा म्हणतो, ‘चला तासभर फुरसत.’ मग तो फोन पूर्ण होईपर्यंत तो मला हाक पण नाही मारणार. काही हवे असेल तर तो स्वतःच घेतो. इतकी छान आहे माझी मैत्रीण. लोकांना कुचाळक्या करायला आवडतात. मग मला राग येतो.

    एकच सांगण, ज्यांना आपण ओळखत नाही, त्यांच्याबद्दल तोंड सोडून बोलू नये. कोणी दाखवलं नाही तरी, संबंधित व्यक्ती दुखावली जातेच!


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!

    April 27, 2026 फिल्मी

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026 फिल्मी

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!

    By हर्षा गुप्तेApril 27, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. चाळीत राहणारी, जेवणाचे डबे बनवणारी, सिंगल…

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याची संधी मिळायलाच हवी…

    May 2, 2026

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026

    Dnyaneshwari : जी सत्यलोकु तुजमाजीं आहे, देखिला चतुराननु हा नोहे

    May 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 मे 2026

    May 2, 2026

    जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    May 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 285
    • अवांतर 184
    • आरोग्य 107
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 403
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 202
    • मैत्रीण 18
    • ललित 598
    • शैक्षणिक 78
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याची संधी मिळायलाच हवी…

    May 2, 2026

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026
    Most Popular

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.