Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    April 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » घरी येताना आठवली लीला अन् पूजाची कहाणी!
    ललित

    घरी येताना आठवली लीला अन् पूजाची कहाणी!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 12, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, मराठी लेखक, बसप्रवास, मोबाइलचे एसएमएस, प्रियकराचे एसएमएस, प्रियकराची आठवण, प्रियकराची बेपर्वाई, तिचे एसएमएस, पूजा आणि लीला, पूजा लीलाची कहाणी, पूजा लीलाचे भांडण, पूजाचे कंडक्टरवर प्रेम,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्नेहा सुतार

    भाग – 5

    खरंतर, जोरात आपटल्यामुळे डोकं जाम दुखायला लागलेलं. टेंगुळ बिंगुळ नाही ना, तिने एकदा मोबाइलच्या कॅमेऱ्यात सेल्फी मोडवर बघून घेतलं. लालसर झालेलं दिसत होतं. गाडी मुळगावला पोहोचली, तेव्हा आता सगळं आवरून बसुया म्हणून तिने बॅगची चेन नीट बंद केली. इअरफोन काढून वरच्या कप्प्यात टाकले, त्याचीही चेन लावली. आता जरा ती सावरुन बसली. गार वारा चेहऱ्यावर येत होता. पाऊस पडून गेल्यामुळे सगळी झाडं निथळत थरथरत उभी होती. “सुशांत बार” कंडक्टर ओरडला. दोन माणसं पुढे सरसावली. त्यांचा स्टॉप आल्यामुळे गर्दी ढकलत, उकलत पुढे गेली आणि दाराकडल्या दांड्याला धरून उभी राहिली. “राव रे, सुशांत बार्र” पुढच्या माणसाने कंडक्टरला सांगितलं. कंडक्टरने मान हलवली आणि “राव रे, सुशांत बार” म्हणून त्याने ड्रायव्हरला ओरडून सांगितलं. जराच पुढे गेल्यावर बसने ब्रेक मारला. दार उघडलं गेलं. चार पावलं बाहेर रस्त्यावर उतरली. कंडक्टरने बसचं दार जोरात ओढलं. “देवळाकडे, देवळाकडे” पुढच्या स्टॉपची तयारी करायला लागला पण हा! पुन्हा चार डोकी हलली, पुन्हा गर्दी उकलून वाट काढत पुढे गेली. आता “गॅरेजिकडे बोड्डयां” ऐकू येईपर्यंत एकेका स्टॉपची नावं ऐकत बसायचं…

    तिने एक दोनदा फोन चेक केला. कल्पना मावशी, सूर्यकांत, आई असे नोटिफिकेशन दिसले व्हॉट्सॲपचे. त्याचा नेहमीप्रमाणे नव्हताच! बाकी काय मावशी, ‘माणसे जपली, नाती जपली की जग सुखी राहतं आपलं’, ‘आयुष्य म्हणजे खेळ आहे आणि आपण त्यातले खेळाडू’, ‘काया वाचा मन शुद्ध असू द्यावे…’ असलेसे quotes पाठवत असणार. इमेजच होती काहीतरी. नोटिफिकेशनमधून बघितल्यामुळे दिसत नव्हती. सूर्यकांतने कसली link पाठवलेली. आईने? आईने नक्कीच ॲमेझॉन नाहीतर फ्लिपकार्ट किंवा मीशोवरची कुठल्यातरी प्रॉडक्टची link पाठवलेली असणार. आईला मोबाइलवर यासाठीच व्हॉट्सॲप दिलाय, असं वाटतं का कोण जाणे! आणि सकाळी सकाळी नातेवाईकांना सुप्रभातचे फोटो पाठवायला. नाती, सुंदर सकाळ, देव, भक्ती, आयुष्य, आनंद, मन…. असल्याच विषयांसह good morning नाहीतर सुप्रभात! प्रत्येकाची एकेक तऱ्हा. तो? Gm या एवढ्या दोन अक्षरांत सकाळ खुलवतो. पुरेसं असतंय एवढंच. ही पण एक गंम्मतच आहे नाही? आपल्या आवडत्या व्यक्तीचं एक टिम्ब जरी मिळालं ना मॅसेजवर तरी ती वेळ फुलासारखी खुलते. इथे गाणं आठवलं… “कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती… येती नि जाती… येती नि जाती…” ती हळू आवाजात गुणगुणू लागली. बाजूच्या म्हातारीने काहीसं तिरप्या नजरेने तिच्याकडे बघितलं तशी ती गप्प झाली. तिखट कानांची आहे म्हातारी!

    हेही वाचा – बस सुटताना जोरदार पाऊस अन्…

    “बोड्डया गॅरेज” आवाज ऐकल्यावर ती विचारातून भानावर आली. गर्दी असली तरी आता विरळ झालेली. तिच्या सीटच्या मागेच बसचं मागचं दार असल्यामुळे तिला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत. बसच्या मागच्या दारातल्या पायऱ्यांच्या दांड्याला धरून ती उतरण्यासाठी म्हणून तयार राहिली. “राव आ” असं म्हणून तिने  दांड्यावरची पकड घट्ट केली. बसने ब्रेक मारला. ” बाय सावकाश देव हा… ” क्लीनरने म्हटल्यावर ती हसली. “थँक यू” म्हणून तिने त्याला बघून मान लववली. हे काका कधीपासून असतील या कामावर ना? बसमधून उतरताच तिचे विचार सुरू झाले. काय असेल ना या लोकांचं लाइफ! सकाळी उठा, बसवर चला, गाडीत पेट्रोल टाका, साखळी ते पणजी, पणजी ते साखळी करा, दुपारी डबा खा, पुन्हा ये जा. रात्री घरी चला, जेवा, झोपा. किती दमत असतील ना बिचारे. त्यात दिवसभर ओरडत राहायचं. प्रत्येक स्टॉपचं, बस स्थानकाचं नाव घ्यायचं मोठमोठ्याने, बसमधली गर्दी आवरायची…

    तिला आठवलं… वर्गात तिच्या बेंचकडून दोन बेंच सोडून मागे लीला बसायची. ही लीला म्हणजे वर्गातली आगाऊ मुलगी. तिच्या शेजारी पूजाला बसवलेलं. अगदी शांत, सोज्वळ पोरगी. लीलाने चिमटा जरी काढला तरी हाय हुय करून दाखवत नसायची. लीलाला सवय होती बोलता बोलता हळूच चिमटे काढायची. म्हणून कुणी जवळ जाऊन बोलत नसत तिच्या. तर, पूजा म्हाव्हळींगे गावातून बिचोलीला यायची शाळेत. बसचा प्रवास. पाचवीपासून ती सोबत होती एकाच वर्गात. अभ्यासात तशी सो सो. हुशार पण नाही आणि ढ पण नाही. गणितात मात्र चांगले गुण घ्यायची. कठीण वाटणारी गणिते सहज सोडवायची.

    नववीत असताना गावातून येता जाता बसमधल्या कुणा कंडक्टरसोबत तिचं होतं, असं हिला कळलेलं. बापरे! हिला प्रचंड आश्चर्य वाटलं. पूजा असं करेल अशी सुतराम पण कल्पना नव्हती. यांचं सातवीपासून चालू होतं म्हणे. एकदा लीला आणि पूजाची चक्क भांडणं झाली, वर्गात मधल्या सुट्टीत. लीलाने पूजाला या गोष्टीवरूनच ट्रिगर केलं. पूजा आणि त्याच्यात काहीतरी तेव्हाच बिनसलेलं म्हणे, तर पूजा अचानक आक्रमक बनली. लीलाच्या वेण्या ओढून तिने तिला बोचकारलं सुद्धा नखांनी. हे सगळं इतकं सर्वांना अनपेक्षित होतं की, लीला सुद्धा शॉक होऊन तिला आ वासून बघतच राहिली… पूजाला आम्ही लीलापासून सोडवलं आणि पूजा हमसाहमशी रडायला लागली. डेस्कवरची वही पण तिने फाडली. शिक्षक वर्गात धावून आले एव्हाना. त्यांनाही आश्चर्य वाटलं. मुख्याध्यापकांनी तिला आणि लीलाला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. तोवर पूर्ण शाळाभर हीच चर्चा सुरू झाली.

    पूजा प्रिन्सिपल केबिनमधून परत आली ती एखाद्या भेदरलेल्या, वाट चुकलेल्या बछड्यासारखी. सर्वांच्या नजरा परक्या, बोलणं परकं… ती पुन्हा शांत झाली. इतकी शांत की नंतर ती शाळेत यायचीच बंद झाली. नंतर उडत्या बातम्या आल्या. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन दहावी झाल्यावर लग्न केलं त्याच्याशी. काही वर्षांनी समजलं तिला बाळ झालंय. काही वर्षांनी ‘ती’ कॉलेजमध्ये गेली.. तेव्हा तिला समजलं की, पूजाला पुन्हा दिवस गेलेयत. काय बाई एकेकाची स्टोरी…

    हेही वाचा – स्वप्नं आणि प्रवास

    विचार करता करता ती जिना चढून फ्लॅटच्या दाराबाहेर कधी येऊन पोहोचली, ते तिचं तिला कळलं नाही. खिडकीतून कुणी हॉलमध्ये दिसत नव्हतं म्हणजे आई आत किचनमध्ये असणार. बाबा अजून आले नसतील कामावरून. तिने अंदाज लावला आणि चपलांच्या रॅकमधल्या चपलांकडे बघितलं. ‘हं… बाबा आले नाहीयेत अजून तर…’ मनातल्या मनात म्हणून तिने दार वाजवलं. तिचा नियम होता. बेल नाही वाजवायची. हळूच दार खटखटवायचं. म्हणजे, आई दचकणार नाही आणि हीच आलीये हेही तिला कळणार. आईची चाहूल लागत नाहीशी बघून, काही वेळ थांबून पुन्हा तिने दार खटखटवलं. आतून काही पावलांचा आवाज येईना म्हणून हाताची घडी घालून गुणगुणू लागली…

    मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी
    तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
    मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
    तो लंघून चौकट पार निघाया बघतो
    मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
    तो कट्ट्यावर बसतो घुमतो शीळ वाजवतो

    क्रमश:


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026 ललित

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026 ललित

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरApril 30, 2026

    एक जोडपं ओपीडीत आलं होतं. दोघांनाही किरकोळ विषाणूजन्य संसर्ग होता, पण आपल्याकडं बोलता बोलता गाडी…

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    April 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 283
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 401
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 201
    • मैत्रीण 18
    • ललित 592
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    April 30, 2026
    Most Popular

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.