दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 04 मार्च 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 13 फाल्गुन शके 1947; तिथि : प्रतिपदा 16:48; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 07:38
- योग : धृति 08:52; करण : तैतिल 28:51
- सूर्य : कुंभ; चंद्र : सिंह 13:45; सूर्योदय : 06:57; सूर्यास्त : 18:44
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वसंतोत्सव आरंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
बंगाली साहित्यिक आणि संगीतकार ज्योतिरिंद्रनाथ टागोर
टीम अवांतर
प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि संगीतकार ज्योतिरिंद्रनाथ टागोर यांचा जन्म 4 मे 1849 रोजी जोरासाँको (कोलकाता) येथे झाले. ते देवेंद्रनाथ टागोर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध टागोर कुटुंबातील एक महत्त्वाचे सदस्य होते. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे ते थोरले बंधू होते. रवींद्रनाथांच्या जडणघडणीत ज्योतिरिंद्रनाथ यांचा मोठा हातभार होता.
सुरुवातीला त्यांनी ललित कलांचे शिक्षण घेतले पण नंतर ते नाट्यगृहाकडे आकर्षित झाले आणि घरीच नाटकांचा सराव तसेच रंगमंचीय सराव करण्यासाठी त्यांचे शिक्षण सोडून दिले. त्यांचे चुलत भाऊ गणेशनाथ यांनी 1865 मध्ये जोरासांको नाट्यशाळेची स्थापना केली होती.
हेही वाचा – Bookshelf : ‘युद्ध जिवांचे…’ क्रूरतेचा भयानक संसर्गजन्य रोग!
मायकेल मधुसूदन दत्त यांच्या ‘कृष्णकुमारी’ या पहिल्या नाटकात ज्योतिरिंद्रनाथांनी अहिल्यादेवीची भूमिका साकारली होती. त्यांनी लिहिलेली नाटके म्हणजे पुरुबिक्रम, सरोजिनी – ज्यात रवींद्रनाथांनी लिहिलेले एक गाणे आहे – अश्रुमती (अश्रूंमध्ये स्त्री) आणि स्वप्नमयी (स्वप्नाची स्त्री). ते एक उत्तम चित्रकार होते. याशिवाय त्यांनी शेक्सपियरचे ज्युलियस सीझर, मार्कस ऑरेलियसचे ध्यान, कादंबऱ्या आणि नाटके, इतिहास, तत्वज्ञान यांवरील पुस्तके इंग्रजी आणि फ्रेंचमधून बंगालीमध्ये अनुवादित केली. नंतर त्यांनी कालिदासाच्या शकुंतलासारख्या अनेक संस्कृत नाटकांचे बंगालीमध्ये भाषांतर केले.
1869 ते 1888 या काळात ते आदि ब्राह्मो समाजाचे सचिव होते. याशिवाय त्यांनी कलकत्त्यात हिंदू मेळा आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 4 मार्च 1925 रोजी झारखंडमधील रांची येथे ज्योतिंद्रनाथ यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस संमिश्र असेल. दिवसाच्या पूर्वार्धात संकल्प पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळू शकते. दुपारी कामात काहीसे व्यग्र रहाल, मात्र सहकाऱ्यांसह वरिष्ठांकडूनही मदत मिळेल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला लाभ देणारा असेल. जोडीदारासोबतची भावनिक जवळीकता वाढेल.
वृषभ – आज तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. गांभीर्याने कामे करणे आवश्यक आहे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. बाहेरचे तेलकट-तिखट पदार्थ खाणे टाळा, अन्यथा पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रांनी सांगितले म्हणून आंधळेपणाने कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करू नका.
मिथुन – दिवस अनिश्चिततेने भरलेला असेल. काम मंद गतीने होईल. कामाचा उरक वाढविण्यासाठी वरिष्ठांकडून मोलाच्या टिप्स मिळतील. तुमच्या कामाची दिशा ठरवण्यासाठी मित्र किंवा कुटुंबाची मदत घ्यावी लागू शकते. आर्थिकदृष्ट्या व्यावसायिकांना फार मोठा लाभ होणार नाही.
कर्क – कामाच्या स्वरुपात बदल होऊ शकतो. कौटुंबिक तणाव कमी करण्यात तुम्हाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र गुंतवणुकीबाबतचा निर्णय काही काळासाठी पुढे ढकला. नोकरदार जातकांना थोड्याशा संशोधनाची आणि प्लॅनिंगची गरज असेल.
सिंह – दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होईल. नवीन करारांवरील चर्चा पुढे सरकतील. बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील लोकांना त्यांच्या योजनांचा पुनर्विचार करावा लागेल. कोणत्याही वादात अडकणे टाळा. त्यासाठी डोकं शांत आणि तोंड बंद ठेवणे आवश्यक आहे. एकीकडे गुंतवणूक करण्यासाठी काहीतरी विचार सुरू असेल तर दुसरीकडे अचानक काही खर्च करावा लागेल.
हेही वाचा – सदानंद सर अन् सावित्रीबाईंची स्वप्नपूर्ती!
कन्या – काही व्यक्तींच्या भेटीनंतर तुम्हालाही सकारात्मकता जाणवेल. नवीन व्यवसायासाठी सुरू असणाऱ्या वाटाघाटी प्रगतीपथावर असतील. नवीन काम सुरू करण्याआधी जुन्या कामांचा आढावा घेतलात तर त्यातून एखादी कल्पना सुचण्याची शक्यता आहे. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. तब्येत थोडी नरम गरम असेल, मात्र स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका.
तुळ – कौटुंबिक मनोरंजन किंवा मेळाव्यांशी संबंधित जबाबदाऱ्यांमुळे खर्चात वाढ होईल. विरोधकांच्या योजना लवकर ओळखून त्यानुसार आपल्या चाली खेळाव्या लागतील. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे काळजी घ्या, पथ्यपाणी सांभाळा. गुंतवणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस फारसा चांगला नाही.
वृश्चिक – याआधी कोणाला काही पैसे उसने दिले असतील तर ते आज परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन कराराला अंतिम रूप देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जुनी आश्वासने पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर दबाव असेल. कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल. संवाद हेच तुमचे सगळ्यात मोठे अस्त्र असेल, त्याचा काळजीपूर्वक वापर करा.
धनु – कामाच्या जबाबदाऱ्या, मनोरंजन आणि कौटुंबिक नाती या सगळ्या आघाड्यांवर समान वेळ देण्याची गरज आहे. त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल, यातून चिडचिड वाढेल. मागील गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळेल. या पैशांचा योग्य विनियोग करण्याचे प्लॅनिंग करा. राजकीय क्षेत्रातील लोकांशी संपर्क वाढेल. याचा भविष्यात मोठा फायदा होईल.
मकर – आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतल्याने कामे सोपी होतील. आज नातेसंबंधांमधील भावनिकता कमी झाल्याची जाणीव होईल, ज्यामुळे तुम्हाला निराशा वाटू शकते. नोकरीतील बदलांबद्दल जुन्या मित्रांशी चर्चा शक्य आहे. काही कारणांमुळे स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना काळजी घ्या अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
कुंभ – अपेक्षांच्या दबावाखाली, भावनिक नातेसंबंध डळमळीत होतील. तुम्हाला काही मानसिक त्रास जाणवू शकतो. ध्यानधारणा अवश्य करा. विरोधकांच्या योजनांबाबत निष्काळजीपणा दाखवू नका. नवीन कामे सुरू करण्याऐवजी आज जुनी कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल असेल. टीम लीडर म्हणून आज उत्तम कामगिरी दाखवू शकाल. किमती वस्तू आणि मोबाइल फोन सांभाळून ठेवा.
मीन – आरोग्याच्या समस्या कामावर परिणाम करणाऱ्या असतील. त्यामुळे योग्य ते उपचार वेळीच करा. सकारात्मक कौटुंबिक संबंध राखणे आज आव्हानात्मक असेल. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायानिमित्त होणारा प्रवास पुढे ढकलणे चांगले. आज गुंतवणुकीच्या दृष्टीने कोणताही निर्णय घेऊ नका. खरेदी करताना देखील आपल्या बजेटप्रमाणेच खर्च करा.


