मेष
या आठवड्यात सूर्याचे मकर राशीतील भ्रमण लाभदायक ठरणार आहे. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील; उत्साह वाढेल. नोकरदारांची सगळी कामे सुरळीत सुरू राहतील; आर्थिक ताण उरणार नाही. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने व्यवहार फायद्याचे ठरतील; नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांच्या नवीन ओळखी होतील; नवीन खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मतावर ठाम राहावे; त्याद्वारे तुमचा ठसा उमटेल.
वृषभ
या आठवड्यात प्रवासाचा योग आहे. नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तथापि, पैसे जपून वापरा. कुटुंबातील मतभेद दूर करू शकाल. व्यावसायिक वर्गाला खरेदी–विक्रीतून लाभ मिळेल. व्यावसायिक जोडीदाराचा सल्ला घ्या, स्वतःचे मत लादू नका. महिलांकडून घरातील कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडले जाईल. विद्यार्थ्यांना नवीन मित्र–मैत्रिणी मिळतील; तथापि, जुन्या मित्रांना विसरू नका.
मिथुन
या आठवड्यात प्रगती होईल. नोकरदारांनी कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा; निष्काळजीपणा अजिबात करू नये. इतरांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, तसेच बचतीवर भर द्या. व्यावसायिक वर्गाने कोणालाही उसने पैसे देऊ नयेत. नवीन काम मिळवण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. बोलणे गोड ठेवा; मन प्रसन्न ठेवा. महिला नवीन खरेदी आणि दानधर्म करतील. विद्यार्थ्यांनी मेहनत करावी; मित्रांवर अवलंबून राहू नये.
कर्क
या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांनी हलगर्जीपणा टाळावा; स्वतःची कामे वेळेत पूर्ण करा; इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका. व्यावसायिक वर्गाने परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत; अनावश्यक धाडस टाळावे. तसेच, आर्थिक बचतीवर लक्ष केंद्रीत करा. महिलांनी कुटुंबातील मतभेद वेळेवर सोडवावेत. विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळावी; व्यसनी मित्रांपासून दूर राहावे.
सिंह
या आठवड्यात अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरदारांना सतत कामात मग्न राहावे लागेल; तक्रार न करता कामे पूर्ण करा, त्याचा फायदा होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यावसायिक वर्गाला फायदा होईल. महिलांनी समाजसेवा करताना स्थितीचे भान ठेवावे; सोशल मीडियापासून दूर राहावे; प्रकृती सांभाळावी. विद्यार्थ्यांनी खर्च कमी करावा.
हेही वाचा – Homeopathy : रजोनिवृत्ती म्हणजे स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची संधी
कन्या
या आठवड्यात समस्यांमधून मार्ग सापडतील. धावपळ जास्त होईल; वैयक्तिक गोष्टींसाठी वेळ मिळणार नाही. सहकाऱ्यांना मदत करावी लागेल. व्यावसायिक वर्गाला आर्थिक यश मिळेल; व्यवसायवाढीसाठी जाहिरात करावी लागेल, फायदा होईल. महिलांना कामाचा अनुभव उपयोगी पडेल; इतरांना मदत करू शकाल. विद्यार्थ्यांना कुटुंबासोबत फिरायला जाता येईल; कुटुंबातील इतर भावा-बहिण्यांच्या भेटी होतील.
तुळ
या आठवड्यात शुभ गोष्टींचा शुभारंभ होईल; संघर्ष कमी होतील. नोकरदारांना इतरांची मदत मिळेल; तथापि, आर्थिक व्यवहार नीट सांभाळा. प्रकृती उत्तम राहील. बहुतांश गोष्टी मनाप्रमाणे घडतील. व्यावसायिक वर्गाला चांगला नफा होईल; मात्र, आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. महिलांनी खर्च कमी करावा; बाहेरील खाद्यपदार्थ टाळावेत; पथ्ये पाळावीत. विद्यार्थ्यांनी कुटुंबासोबतच राहावे, कोणाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नये.
वृश्चिक
या आठवड्यात व्यवहार जपून करा; महत्त्वाचे निर्णय टाळा. नोकरदारांना सहकाऱ्यांची मदत मिळेल; वरिष्ठ खूश राहतील; कामात बदल केला जाईल. तसेच, प्रवासही घडेल. व्यावसायिक वर्गाला कामगारांची ज्यादा मदत घ्यावी लागेल; त्यासाठी आर्थिक नियोजन करावे. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी; रागावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांनी वाहन जपून वापरावे, महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावी.
धनु
या आठवड्यात मनावरील दडपण दूर होईल. नोकरदारांना नवीन नोकरीचे प्रस्ताव मिळतील; नवीन जबाबदारी येऊ शकते. तथापि, उधारी टाळा. व्यावसायिक वर्गाने शांत राहून सगळ्यांना सांभाळून निर्णय घ्यावे. महिलांचे निर्णय योग्य ठरतील; घरात आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील प्रगतीकडे लक्ष द्यावे. प्रदर्शन पाहायला जावे, त्यातून नवीन कल्पना सुचतील.
मकर
या आठवड्यात नवीन गोष्टी शिकायला मिळतील. नोकरदारांचा ताण कमी होईल; पण वरिष्ठांशी मतभेद संभवतात, आपली बाजू स्पष्टपणे मांडाल. व्यावसायिक वर्गाची जुनी येणी वसूल होतील; नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांना जुन्या मैत्रिणी भेटतील; ओळखीतून नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांना मेहनतीशिवाय पर्याय नाही.
कुंभ
या आठवड्यात स्वतःच्या कामावर लक्ष द्या; इतरांच्या गोष्टीत ढवळाढवळ करू नका. नोकरदारांनी स्वतःची कामे स्वतः करावी; इतरांकडे सोपवू नयेत. व्यावसायिक वर्गाने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी. प्रकृतीची काळजी घ्या. महिलांना नवीन मैत्रिणी मिळतील; मात्र, घरातील गोष्टी सर्वांना सांगू नका. विद्यार्थ्यांनी घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी; त्यांचा आशीर्वाद मिळतील.
हेही वाचा – अंतिम सत्य मात्र एकच!
मीन
या आठवड्यात मनाप्रमाणे कामे होतील. नोकरदारांना अधिकार पद मिळण्याची शक्यता आहे; नवीन नोकरीचे प्रस्तावही येतील. पण आर्थिक नियोजनावर भर द्या. व्यावसायिक वर्गाला ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल; व्यवसाय उत्तम होईल; आर्थिक नियोजन प्रभावी ठरेल. महिला समाजसेवेचे काम करतील; धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांनी शांततेत निर्णय घ्यावेत; कोणाला टोचून बोलू नये.


