Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    May 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Alcoholism : क्रांतिकारी शोधामागची कथा!
    आरोग्य

    Alcoholism : क्रांतिकारी शोधामागची कथा!

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 31, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, अल्कोहोलिझम, क्रांतिकारी शोध, मद्यपींची व्यसनाधीनता, मद्याने शारीरिक हानी, व्यसनमुक्ती, मॅग्नस हस, डॉक्टर मॅग्नस हस, संशोधक मॅग्नस हस,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    ओपीडीत एक महाशय स्वत:हूनच ‘मद्यपान बंद करण्याचं औषध’ घ्यायला आले होते. 99 टक्के ते सोडतीलही! पूर्वी हे इतकं सहजसोपं नव्हतं, कारण एक काळ होता जेव्हा मद्यपानाला जगभरात केवळ ‘नैतिक पतन’ किंवा ‘शाही शौक’ या दोनच दृष्टिकोनातून बघितलं जायचं. 19व्या शतकात स्वीडनच्या एका गावातल्या व्यक्तीने वैद्यकीय जगताला हादरवून टाकणारी संकल्पना मांडली, ती म्हणजे ‘अल्कोहोलिझम’ (Alcoholism)! हा शब्द आज आपल्या सर्वांना चिरपरिचित असला तरी, तो रुजवायला त्याचं अख्खं आयुष्य गेलं..

    त्याचा जन्म 1807 साली स्वीडनच्या मेडेलपॅड प्रांतातील तोर्प नामक एका छोट्याशा गावात झाला; त्याचे बाबा योहान धर्मगुरू होते तर, आई कॅथरिना मॅग्डालेना ही एक विदुषी होती. ग्रामीण भागात लहानाचं मोठं होतांना त्यानं मजूर आणि शेतकऱ्यांमधील मद्यपानाच्या समस्यांचा जवळून अनुभव घेतला; पण त्यांच्या आयुष्याला खरी दिशा मिळाली त्याच्या लाडक्या ‘विल्डहसन’ नामक काकामुळे…

    एरवी प्रेमळ असणारा त्याचा काका पंचक्रोशीत मात्र ‘जंगली’ म्हणून कुप्रसिद्ध होता, कारण होता त्याचा जुगार आणि मद्यपानाचा नाद. ज्यांच्या अतिरेकामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला. इकडे या लहानग्याच्या मनात मद्यपानाच्या विनाशकारी परिणामांबद्दल प्रश्न निर्माण केले अन् त्यांनी त्याला वैद्यकीय संशोधनाकडं वळवलं!

    उप्साला विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून 1834मध्ये त्यानं आपली कारकीर्द सुरू केली आणि 1847 साली तो स्टॉकहोममधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक बनला. त्याचं खरं योगदान इथून पुढं सुरू झालं; कारण एव्हाना त्यानं मद्यपानाला फक्त एक समस्या न मानता यथोचित वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहाण्यास सुरूवात केली होती. त्याकाळी नागरी भागात मद्यपानाला थेट सामाजिक कलंक मानलं जायचं! अतिमद्यपान करणाऱ्यांना “कमकुवत इच्छाशक्ती’ किंवा ‘अनैतिक’ ठरवलं जायचं आणि त्यांच्यावर उपदेश किंवा दंडात्मक उपाय लादले जायचे.

    हेही वाचा – Japanese story : मला ‘शांती’ हवी!

    पण यानं मात्र या बाबीकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं… स्टॉकहोममधील सेराफिमर रुग्णालयात रुग्णांचे निरीक्षण करताना त्याला लक्षात आलं की, दीर्घकालीन मद्यपानामुळं केवळ तात्पुरता नशेचा परिणाम होत नाही तर, शरीर आणि मनाला कायमस्वरूपी हानी पोहोचते. कंपवात, भ्रम, यकृत निकामी होणं, मज्जासंस्थेचं नुकसान हे सर्व त्यानं काळजीपूर्वक नोंदवून ठेवलं.

    1849 साली त्यानं आपलं पहिलं क्रांतीकारी पुस्तक ‘अल्कोहोलिझम क्रॉनिकस’ प्रकाशित केलं. ज्यामध्ये त्यानं पहिल्यांदाच ‘अल्कोहोलिझम’ हा शब्द आणि संकल्पना मांडली होती!

    त्यानं याला ‘एक विशिष्ट दीर्घकालीन विषबाधा’ असं संबोधलं होतं; जी सततच्या मद्यपानामुळं उद्भवते आणि शरीराच्या अनेक प्रणालींवर परिणाम करते. त्यानं अल्कोहोलिझमच्या अवस्थांचं तपशीलवार वर्गीकरण केले :

    • प्रारंभिक अवस्थेत पचनसंस्थेच्या समस्या, थकवा, काही मानसिक बदल.
    • मध्यम अवस्थेत यकृत आणि हृदयावर परिणाम, कंपवात, स्मरणशक्तीचा ऱ्हास.
    • गंभीर अवस्थेत तीव्र मानसिक अस्थिरता, मेंदूचं कायमस्वरूपी नुकसान आणि मृत्यू.

    त्यानं मद्यपानाला पहिल्यांदाचा कुठलाही दोष किंवा बढाई न मानता ‘वैद्यकीय अवस्था’ म्हणून परिभाषित केलं आणि उपचारांसाठी करुणा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला.

    हा विचार त्या काळात प्रचंड क्रांतिकारी होता, कारण यानं व्यसनाला पहिल्यांदाच वैद्यकीय समस्येच्या रूपात स्वीकारण्याचा मार्ग मोकळा केला. त्याचं संशोधन तत्कालीन वैद्यकीय पद्धतींच्या तुलनेत अत्यंत प्रगत होतं. त्यांनी यात अनेक पद्धतींचा वापर केला जसं :

    1. त्यानं रुग्णांचे वैद्यकीय इतिहास आणि लक्षणे काळजीपूर्वक नोंदवली. उदाहरणार्थ, जसं भावनिक बळी ठरलेल्या रुग्णात दिसणारी तीव्र भीती, भ्रम आणि शारीरिक कमजोरी यांचे तपशीलवार वर्णन केलं.
    2. मृत रुग्णांच्या शवविच्छेदनातून त्यानं यकृत सिरोसिस, मज्जासंस्थेचं नुकसान आणि हृदयाच्या समस्यांचा अभ्यास केला. यामुळं त्याला मद्यपानामुळं होणारे विशिष्ट शारीरिक बदल समजले.
    3. त्यानं मद्यपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत मद्यपान करणाऱ्यांच्या लक्षणांचा तुलनात्मक अभ्यास केला. ज्यामुळे त्याला अल्कोहोलिझमची वैशिष्ट्ये ओळखता आली.
    4. त्यानं केवळ वैद्यकीय लक्षणांवरच लक्ष केंद्रित केलं नाही तर, मद्यपानामुळे कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या परिणामांचाही विचार केला. अल्कोहोलिझममुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि सामाजिक स्थैर्य धोक्यात येते, याची पहिल्यांदाच औपचारिक नोंद झाली.

    अर्थात, आज वाटतं तेवढं, तेव्हा हे अजिबात सोपं नव्हतं. प्रारंभी सगळे हसले. काहींनी त्याच्यावर सामान्य सामाजिक मद्यपान अर्थात casual drinking ला थेट रोग वगैरे ठरवण्याचा आरोप केला तर, काहींना असं वाटलं की, ”यानं हा नवा धंदा काढला.” पण संयमवादी चळवळ अर्थातच टेम्परन्स मुव्हमेंटनं त्याचा कामाचं स्वागत केलं!

    हेही वाचा – विषाची परीक्षा…

    त्यानं कुणाच्याच टीकेला प्रत्युत्तर दिलं नाही तर, फक्त पुराव्यांनिशी सामोरं गेला आणि त्यांचे संशोधन हळूहळू स्वीकारलं गेलं. त्याच्या या अफलातून संशोधनानं ‘व्यसन वैद्यक’ या शाखेचा पाया घातला. त्यानं मांडलेला ‘अल्कोहोलिझम’ हा शब्द आजही वापरला जातो आणि आधुनिक निदान पद्धती जसं DSM-5मधील अल्कोहोल यूज डिसऑर्डर हे याच अभ्यासावर आधारित आहे. त्याच्या धडपडीमुळं अल्कोहोलिझमला आजार म्हणून स्वीकारल्यानं व्यसनाच्या उपचारांना वैद्यकीय आधार मिळाला!

    त्याच्या या आजन्म कार्याने मद्यपानाविरुद्धच्या कायद्यांना आणि सार्वजनिक आरोग्य धोरणांना प्रेरणा दिली. त्याचं संशोधन युरोप आणि अमेरिकेत पसरलं आणि 20व्या शतकातील अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस सारख्या संस्थांनी त्यांच्या कल्पनांचा स्वीकार केला.

    आज स्टॉकहोममध्ये त्याच्या नावाचा रस्ता आहे,’मॅग्नस हस रोड’!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026 आरोग्य

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026 आरोग्य

    लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 16, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    By रविंद्र परांजपेMay 23, 2026

    मागील दोन लेखांत आपण लेखनातून आणि वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या…

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 16, 2026

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    May 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    May 24, 2026

    अगतिक मातृत्व

    May 24, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 24 ते 30 मे 2026

    May 24, 2026

    Dnyaneshwari : परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही

    May 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 307
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 431
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 213
    • मैत्रीण 19
    • ललित 649
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    May 24, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.