Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 15 नोव्हेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 15 नोव्हेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 15, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 15 नोव्हेंबर 2025; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 24 कार्तिक शके 1947; तिथि : एकादशी 26:36; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 23:33
    • योग : विष्कंभ 30:45; करण : बव 13:39
    • सूर्य : तुळ; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:44; सूर्यास्त : 18:00
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    उत्पत्ति एकादशी / आळंदी यात्रा

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – कामाचे वेळापत्रक तुमच्या आनंद आणि शांतीवर परिणाम करेल. मानसिक आणि शारीरिक विश्रांती घेण्याची गरज वाढेल. समाजातील  मान्यवरांचा मोठा पाठिंबा मिळेल. नफ्यात वाढ होत राहील. नवीन उपक्रमांच्या संधी वाढतील. मनोकामना पूर्ण होतील. एक आनंददायी वातावरण तयार होईल. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.

    वृषभ – उत्पन्न आणि खर्चात समतोल राहील. व्यापार आणि व्यवसायाकडे लक्ष दिल्यास मोठे यश मिळेल. तुम्हाला प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल. जोडीदार आणि मुलांशी संबंधित काही बाबींनी चिंतीत व्हाल; गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील की, नाही याबद्दल शंका असेल. शैक्षणिक कामात सहज यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वाईट संगत टाळा.

    मिथुन – व्यापार आणि व्यावसायिक परिस्थिती अनुकूल राहील. पदोन्नती शक्य आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून फारसा पाठिंबा मिळणार नाही. मित्रांसोबत सावधगिरीने वागा. खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या. मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील.

    कर्क – सकाळी प्रथम लाभदायक कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे इतर अडथळे दूर होतील आणि प्रगतीचा मार्ग सापडेल. एखाद्या चांगल्या कामाचा अनुभव फायदेशीर ठरेल. आर्थिक संसाधने मर्यादित असतील. आरोग्याच्या लहानमोठ्या कुरबुरी असतील.

    सिंह – नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडण्याची शक्यता आहे. प्रवास फलदायी परिणाम देतील. संवादातून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, फायदेशीर ठरेल. यामुळे काम सुलभ होऊन प्रगती साधली जाईल. कामाला प्राधान्य द्या. व्यवसायातील अडथळे मानसिक अशांतता निर्माण करतील.

    हेही वाचा – स्त्री… एक आई आणि मुलगी

    कन्या – प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरतील. काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. तथापि, आशा आणि उत्साह तुमच्या कामाला हातभार लावेल. चांगल्या काळाची वाट पहा. कामावर लक्ष केंद्रित करण्याची मानसिकता ठेवा. तुम्हाला एखादी आवडती वस्तू भेट म्हणून मिळू शकते. धार्मिक श्रद्धा फलदायी ठरतील.

    तुळ – कामाचे स्वरूप दगदगीचे असेल. व्यग्र दिवस असेल. रखडलेले काम भविष्यात मोठा नफा मिळवून देऊ शकते. व्यापारात नफा होईल. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांसोबत भेटीगाठी होतील. दैनंदिन सुखसोयींमध्ये वाढ होईल.

    वृश्चिक – शत्रूंची भीती, मुलांची चिंता आणि अनावश्यक खर्च यामुळे प्रचंड चिडचिड होईल. व्यवसायातील परिस्थिती सामान्य राहील. मानसिकदृष्ट्या समाधानी राहिल्याने यश मिळेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर राहील. संघर्ष आणि वादात अडकणे धोक्याचे ठरेल.

    धनु – प्रवासामुळे भविष्यात मोठे फायदे होतील. कामातील अडथळे दूर करण्यात यशस्वी व्हाल. तांत्रिक सुविधा आणि समन्वयामुळे कामात प्रगती होईल, आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होण्यास मदत होईल. कामावर बारकाईने लक्ष ठेवा कारण विरोधक नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.

    मकर – सकाळपासून दुपारपर्यंतचा काळ अनुकूल राहील. व्यवसायात प्रगती होत राहील. व्यवहारात येणारे अडथळे दूर कराल. ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या परिश्रमांमुळे फायदा होईल. इतरांच्या गुंतागुंतीच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कालच्या कठोर परिश्रमाचे आज फायदे होतील.

    कुंभ – आळशी बनू नका. व्यवसायासाठी नवीन समन्वय आणि सहकार्य निर्माण करावे लागेल. मित्रांसोबत सहकार्य केल्याने नफा मिळेल. पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण होतील. जोखीम टाळणे शहाणपणाचे आहे. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे चांगले.

    हेही वाचा – केतनचा वाढदिवस… भैरवी!

    मीन – कुटुंबीय आणि सहकारी यांचा मोठा पाठिंबा मिळत राहील. ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या परिश्रमांचे आज फळ मिळेल. मात्र कठोर परिश्रमांना पर्याय नाही हे लक्षात ठेवा. कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर कराल. भावंडांमधील प्रेम वाढेल.


    दिनविशेष

    आदिवासी समाजक्रांतीचे जनक बिरसा मुंडा

    टीम अवांतर

    आदिवासी समाजक्रांतीचे जनक आणि स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात झाला. आदिवासी-हक्क, स्त्री-स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून बिरसा यांची ओळख आहे. बासरी आणि टुईला ही वाद्ये वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादींची आवड लहानपणापासून बिरसा यांनी होती. मुंडा जमातीच्या परंपरागत जीवनपद्धतीमध्ये, धर्मामध्ये परिवर्तन आणि सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लवकरच लक्षात आले. हिंदू, ख्रिश्चन आणि मुंडा आदिवासी या धर्मांतील चांगली तत्त्वे एकत्रित करून नव्या बिरसाईट (Birsaites) धर्माची स्थापना करून त्यांनी लोकसंघटन केले, तसेच मुंडा जमातीत एकता निर्माण केली. 1857 च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी मुंडा आदिवासींच्या शेतजमिनी हिरावून घेतल्या होत्या. त्या परत मिळविण्यासाठी मुंडांचे प्रमुख ‘सरदारʼ यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. तो ‘सरदारी लढा’ म्हणून प्रसिद्ध झाला. या आंदोलनात्मक लढाईचा बिरसांच्या मनावर मोठा प्रभाव पडला होता. त्यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळीला सुरुवात केली. त्यामुळे अनेक मुंडा आदिवासींनी बिरसांबरोबर सरदार आंदोलनात सहभाग घेतला. 1894 मध्ये आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. इंग्रजांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. उलट, इंग्रजांनी आदिवासींकडून जमीन महसूल ठरावीक तारखेलाच रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली.  त्यामुळे अनेक आदिवासींना आपल्या जमिनी सावकार आणि जमीनदार यांच्याकडे गहाण ठेवाव्या लागल्या. भरमसाठ व्याजदरांमुळे तारण जमिनी सोडवून घेणे आदिवासींना अशक्य बनले. याचवेळी बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढे सशक्त आव्हान निर्माण केले. त्यामुळे इंग्रज शासनाने बिरसा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 26 ऑगस्ट 1895 रोजी अटक केली. या अटकेमुळे  आदिवासी समाजात परत एकदा इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. अखेर 30 नोव्हेंबर 1897 रोजी बिरसांची सुटका झाली. कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवादलाची स्थापना केली.  त्यामध्ये सुमारे 5 हजार आदिवासी सामील झाले. बिरसांनी कायद्याची लढाई सोडून इंग्रज अधिकारी, इंग्रजधार्जिणे ठेकेदार, जमीनदार, सावकार आणि ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली. तर, बिरसांना जो कोणी पकडून देईल त्याला इंग्रजांकडून 500 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. पैशाच्या लालसेपोटी काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली. अखेरीस 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसांना पुन्हा पकडण्यात आले. रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला. तेथेच त्यांचे 9 जून 1900 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn