Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शोध अज्ञात रहस्याचा…
    ललित

    शोध अज्ञात रहस्याचा…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 22, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, गूढकथा, रहस्यकथा, शौनक, शाल्मली, चंदन नगर, डॉक्टर देवदत्त, श्लोक, चंदन नगर संस्थान, राजवर्धन, संघमित्रा, अहंकारा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रणाली वैद्य

    ‘रॉकेर्स ग्रुप’ चा आज ट्रेकला जाण्याचा दिवस होता..,. वर्षभर आधीच कॅलेंडर पाहून ट्रेकचे दिवस नक्की केले होते. बहुत करून सलग तीन-चार दिवस येणाऱ्या सुट्ट्या पाहून ठिकाण निश्चित केलं जायचं… आजही तसाच योग होता… अगदी चार दिवस लागून सुट्ट्या  होत्या…

    आजवर रॉकेर्स ग्रुपने बरेचसे किल्ले  आणि शिखरं पादाक्रांत केली होती, म्हणून यावेळेस जरा वेगळे काही पहावे अस सर्वसंमतीने ठरले होते. शौनक या ग्रुपचा म्होरक्या! सर्वांचा लाडकाच काय, ग्रुपच्या गळ्यातला ताईतच. पण ग्रुप वगळताही त्याच वागणं-बोलणं, त्याचं व्यक्तिमत्त्व सगळ्यांना भुरळ घालायचं… सावळा वर्ण 5’11 उंची,  व्यायामाने कमावलेलं शरीर, हास्य इतकं मोकळं की, पाहणाऱ्याच्याही चेहऱ्यावर एक हास्य झळके. श्रीमंत घरातून असला तरी आपल्या मित्रांत त्याचं वागणं सर्वसामान्य होत. कुठेही आपल्या श्रीमंतीचा बडेजाव नाही, का माज नाही!

    शौनकला फिरण्याचं वेड होतं. त्यामुळे आपल्यासारख्याच फिरण्याचं वेड असलेल्या मुलामुलींचा ‘रॉकेर्स’ हा ग्रुप त्याने निर्माण केला होता. एखाद्याला ट्रेकला यायला अडचण असेल तर, त्याचं कॉन्ट्रिब्युशनही तो द्यायचा. असा हा शौनक आणि शौनकला साजेशी अशी शाल्मली… लहानपणापासूनची मैत्री पुढे प्रेमात परावर्तित झालेली… दोन्हीकडच्या कुटुंबानी त्यांच्या या नात्यास आनंदाने स्वीकारलेलं!

    सण-समारंभात तर शाल्मलीशिवाय शौनकच्या कुटुंबाचं पान हलत नसे. शाल्मली होतीच तशी गोड… जशी दिसायला तशीच स्वभावाला! हसून-खेळून कोणालाही आपलंस करणारी एकुलती एक लाडाची असली तरी, सर्वांमध्ये मिळूनमिसळून वागणारी…

    आपल्या लाडक्या शौनकचं भटकंतीचं वेड कमी होऊन आपला बिझनेस त्याने सांभाळावा, असं महेशरावांचं आणि संध्याताईचं स्वप्न. या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी शाल्मलीची मदत घेतली खरी, परंतु शौनकने तिलाच आपल्या वेडात सामील करून घेतले…

    वर्षातले सुट्ट्यांचे काही दिवस शौनक, शाल्मली आपल्या ग्रुपला देत तर बाकी दिवस आपल्या आईवडिलांच्या इच्छेनुसार व्यतीत करत.

    हेही वाचा – स्वाभिमानी की हेकेखोर?

    शौनक, शाल्मली वगळता या ग्रुपमध्ये अजूनही काही जण होते, त्यापैकी 10 जण सुरुवातीपासूनच शौनकसोबत संलग्न होते… तर काही जण काळानुसार वाढत आणि कमी होत असत. या 10 जणांत रुपेश, निलेश, सचिन, मुकुंद, श्लोक हे शौनकचे कॉलेज फ्रेंड्स आणि रॉकेर्सचे संस्थापक होते. तर शाल्मलीबरोबर तिच्या मैत्रिणी नयना, स्वाती, श्रद्धा, नीता आणि कांचन या होत्या.

    यावेळच्या ट्रेकसाठी जवळपास 36 जण तयार होते. आधीच सांगितल्याप्रमाणे यावेळेस काही वेगळाच ट्रेक करावा, अशी शौनकची कल्पना होती आणि त्याला इतरांनीही दुजोरा दिला होता.  त्याप्रमाणे सर्वच्या सर्व 36 जण चार महिने कामाला लागले होते. प्रत्येकाने वेगवेगळी ठिकाणं शोधून काढली होती आणि तिथल्या वैशिष्ट्यांची माहिती, पोहोचायला लागणारा वेळ, राहण्याकरिता उपलब्ध असणारी सोय या सर्वांचाच अभ्यास प्रत्येकाने केला होता.

    मीटिंगच्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणाचा शोध सर्वांसमोर मांडला. पण त्यात श्लोकने सादर केलेला प्रस्ताव अगदीच वेगळा होता; चंदन नगर नावाचं गाव… काही कारणाने त्या गावाची दोन भागांत वाटणी झाली होती… गावाचा एक भाग सुजलाम सुफलाम होता आणि त्या गावाची मनुष्यवस्ती शेतीच्या आसपास होती… त्या भागातल्या शेतात एखादं पीक लावण्याची खोटी, अगदी भरभरून पीक येत होतं… संपूर्ण गाव तसा उत्तम होता… लोकं धनधान्य संपन्न होती! मात्र दुसरा भाग रखरखीत… कोणीही काहीही करू शकत नव्हतं… ना कोणतं पीक, ना काही! पूर्वापार आलेल्या अनुभवामुळे आता तो भाग दुर्लक्षित झाला होता. ना कोणाचं येणं-जाणं, ना काही संबंध…

    पण काही वेगळेपणा मात्र जाणवायचा. जणू काही त्या भागाची ही अवस्था होण्यामागे काही कारणे असावी… आजवर कित्येक लोकांचे प्रयत्न तिथे हरले होते… ना पाणी, ना वीज, ना मनुष्यवस्ती, ना शेत… फक्त उजाड रानमाळ! आणि या रानमाळात काही दगडी अवशेष दृष्टीस पडत… जणू जमिनीतून वर येऊन आपलं अस्तित्व नोंदवत… अगदी पूर्ण पावसाळ्याच्या दिवसांतही हा भाग कोरडा ठाकच असे!

    मात्र पौर्णिमेच्या रात्री तेथे आसमंतात एक सुगंध भरून राहात असे… कुठून? कसा? आजवर त्याचं गुपित मात्र कुणालाच कळलं नव्हतं… बरेच जणांनी त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कोणालाच आजवर त्यात यश आलं नव्हतं. फार फार तर, त्या दगडी शिलालेखांपर्यंत लोकांचा प्रवास होत होता, मात्र तिथे पोहोचल्यावर अनेकांना जमिनीत हादरे बसल्याचे अनुभव आले होते.

    हेही वाचा – शोध कळणाच्या भाकरीचा!

    श्लोकने आपण शोधलेल्या ठिकाणची इतकी माहिती दिली… काही फोटो दाखवले… मग त्याने आपली नजर सर्वांवरून फिरवली. एक अनामिक शांतता आणि नजरेत कुतुहल दिसत होते.

    न राहून शौनक म्हणाला… काय म्हणता मुलांनो?  काय करायचं? जायचं का चंदन नगरला?

    सगळे एकमुखाने ‘Yess’ म्हणून ओरडले!

    शौनकला खूपच इंटरेस्टिंग वाटत होतं हे ठिकाण. पण शाल्मलीला मात्र मनातून अस्वस्थ वाटू लागलं होतं. शौनकला नाही म्हणावं तर, तो ऐकण्यातला नव्हता आणि का कोणास ठाऊक आपल्याशिवाय त्याने तिथे जाऊ नये असंच तिला वाटत होतं… नाराजीनेच का होईना, तिने या ट्रेकला मान्यता दिली होती…

    क्रमशः

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026 ललित

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026 ललित

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ओम सोशल मीडियाय नमः

    By सुधीर करंदीकरJune 18, 2026

    बऱ्याच दिवसांत एका मित्राशी फोनवर बोलणं झालं नव्हतं, म्हणून विचार केला आज वेळ आहे तर…

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 332
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 458
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 715
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026
    Most Popular

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.