दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 17 ऑगस्ट 2025; वार : रविवार
भारतीय सौर : 26 श्रावण शके 1947; तिथि : नवमी 19:24; नक्षत्र : रोहिणी 27:17
योग : व्याघात 25:39; करण : तैतील 08:28, वणिज 30:21
सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:05
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
आदित्य पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – Unethical values of journalism : व्यवसायाची लाज घालविणारे वर्तन!
दिनविशेष
थोर हुतात्मा मदनलाल धिंग्रा
टीम अवांतर
भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील थोर हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 सप्टेंबर 1883 रोजी अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलाल धिंग्रा पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले आणि 1906 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात ते स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ अशा काही क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. ते होमरूल लीग आणि सावरकर यांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस आणि कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण त्यांनी घेतले. पुढे त्यांनी ब्रिटिश अधिकारी कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे 1 जुलै 1909 रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या वेळी पारशी डॉक्टर कोवास ललाकाका मधे आल्याने त्यांनाही गोळ्या लागल्या. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. मदनलाल यांना अटक होऊन फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्घोषात 17 ऑगस्ट 1901 रोजी फाशी गेले.
हेही वाचा – Unethical values of journalism : पाकिटातून रोख रक्कम देऊन लाच!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.